YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 81

81
स्तोत्र 81
संगीत निर्देशकाकरिता. “गित्तीथ” वर आधारित.#81:0 शीर्षक: बहुतेक एक संगीत संज्ञा आसाफाची रचना.
1परमेश्वर, जे आमचे सामर्थ्य आहेत, त्यांच्यासाठी हर्षाने गा;
याकोबाच्या परमेश्वरासाठी जयघोष करा!
2खंजिरीच्या तालावर संगीताचा प्रारंभ करा,
वीणा व सतारीवर मधुर स्वर वाजवा.
3नवचंद्राच्या समयी आणि पौर्णिमेच्या सणांच्या दिवशी,
आमच्या आनंदोत्सवाच्या वेळी कर्णा वाजवा;
4इस्राएलसाठी हे विधी आहेत,
हे याकोबाच्या परमेश्वराचे नियम आहेत.
5जेव्हा परमेश्वराने इजिप्त देशाचा प्रतिकार केला,
तेव्हा त्यांनी योसेफाला हे नियम नेमून दिले.
मी एक अज्ञात वाणी ऐकली व ती म्हणाली:
6“आता मी त्यांच्या खांद्यावरील भार काढून टाकला आहे;
मी त्यांचे हात भार्‍याच्या ओझ्यापासून मुक्त केले आहेत.
7तू संकटाच्या वेळी माझा धावा केलास आणि मी तुला सोडविले;
मेघगर्जनेतून मी तुला उत्तर दिले;
मरीबाह येथे मी तुझ्या विश्वासाची परीक्षा पाहिली. सेला
8माझ्या लोकांनो, माझे ऐका, आणि मी तुम्हाला सावध करेन—
हे इस्राएला, तू केवळ माझे ऐकशील तर किती बरे होईल!
9तू कोणत्याही परराष्ट्रीय दैवताची कधीही उपासना करू नकोस;
माझ्याशिवाय तू इतर कोणत्याही दैवताला वंदन करू नकोस.
10मी याहवेह, तुझा परमेश्वर आहे,
ज्याने तुला इजिप्तच्या भूमीतून सोडवून आणले.
तू आपले मुख पूर्ण उघड आणि ते मी भरेन.”
11परंतु माझ्या लोकांनी माझे ऐकले नाही;
इस्राएलने माझी आज्ञा पाळली नाही.
12म्हणूनच त्यांच्या मनास येईल तसे हट्टीपणाने मी त्यांना वागू दिले,
ते स्वतःची इच्छापूर्ती करत राहिले.
13“परंतु माझ्या लोकांनी केवळ माझे ऐकले असते,
जर इस्राएल माझ्या मार्गाने चालले असते तर,
14मी त्याच्या शत्रूंचा किती त्वरेने पाडाव केला असता,
आणि त्याच्या विरोधकांवर माझ्या हाताचा प्रहार केला असता!
15जे याहवेहचा तिरस्कार करतात,
ते दबकून गेले असते आणि त्यांना मिळालेली शिक्षा सर्वकाळ टिकली असती.
16मग मी तुला उत्तमोत्तम गहू खाऊ घातले असते;
तुला डोंगरातील उत्कृष्ट मधाने मी तुला तृप्त केले असते.”

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 81: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन