YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 81

81
देवाचा चांगुलपणा व इस्राएलाचा बंडखोरपणा
मुख्य गवयासाठी; गित्ती चालीवर गायचे आसाफाचे स्तोत्र.
1देव जो आमचे सामर्थ्य, त्याचे मोठ्याने गुणगान करा; याकोबाच्या देवाचा जयजयकार करा.
2सुरावर गीत म्हणा, आणि खंजिरी वाजवा; मंजुळ वीणा व सतार वाजवा.
3शुक्ल प्रतिपदेस, पौर्णिमेस, आमच्या सणाच्या दिवशी कर्णा वाजवा.
4कारण हा इस्राएलासाठी नियम आहे; हा याकोबाच्या देवाचा निर्बंध आहे.
5तो मिसर देशावरून गेला, तेव्हा त्याने योसेफवंशात हाच निर्बंध साक्षीसाठी नेमला; ज्याला मी ओळखले नव्हते त्याचे भाषण मी ऐकले; ते असे की,
6“मी त्याच्या खांद्यावरील भार काढला आहे; त्याच्या हातांतला हारा दूर केला आहे.
7तू संकटात असता आरोळी केली तेव्हा मी तुला सोडवले; मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थलातून उत्तर दिले; मरीबाच्या जलांजवळ मी तुला पारखले.
(सेला)
8अहो माझ्या लोकांनो, ऐका, मी तुम्हांला बोध करतो; हे इस्राएला, तू माझे ऐकशील तर बरे होईल!
9तुला अन्य देव नसावा, तू परक्या देवाच्या पाया पडू नये.
10मीच तुझा देव परमेश्वर आहे, मीच तुला मिसर देशातून बाहेर काढले, तू आपले तोंड चांगले उघड म्हणजे मी ते भरीन;
11परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही; इस्राएलाने माझे ऐकले नाही.
12ह्यामुळे मी त्यांना त्यांच्या हृदयाच्या दुराग्रहाप्रमाणे वागू दिले; ते आपल्याच संकल्पाप्रमाणे चालले.
13माझे लोक माझे ऐकतील, इस्राएल माझ्या मार्गांनी चालेल, तर बरे होईल!
14मी तेव्हाच त्यांच्या वैर्‍यांचा मोड करीन, त्यांच्या शत्रूंवर मी आपला हात चालवीन;
15परमेश्वराचे द्वेष्टे त्याला वश होतील, आणि ते सतत धाकात राहतील2
16मी त्याला गव्हाचे सत्त्व खाऊ घालीन आणि पहाडातल्या मधाने मी तुला तृप्त करीन.”

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 81: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन