YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 37:23-40

स्तोत्रसंहिता 37:23-40 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो, आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे. तो पडला तरी सपशेल पडणार नाही; कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील. मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही. तो नेहमी उदार असतो, तो उसने देतो; त्याची संतती आशीर्वादित असते. वाइटापासून दूर राहा, बरे ते कर; म्हणजे तुझी वस्ती कायम राहील. कारण परमेश्वराला न्याय प्रिय आहे; तो आपल्या भक्तांना सोडत नाही; त्यांचे रक्षण सर्वकाळ होते; पण दुर्जनांच्या संततीचा उच्छेद होतो. नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील. नीतिमानाचे मुख सुज्ञान वदते, त्याची जीभ न्याय उच्चारते. त्याच्या देवाचे नियमशास्त्र त्याच्या हृदयात असते; त्याचे पाय घसरणार नाहीत. दुर्जन नीतिमानावर टपलेला असतो, व त्याला जिवे मारण्यास तो पाहत असतो. परमेश्वर त्याला त्याच्या हाती देणार नाही, त्याचा न्याय होईल तेव्हा तो त्याला दोषी ठरवणार नाही. परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल; दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील. मी एक निर्दय दुर्जन पाहिला, तो हिरव्यागार वृक्षासारखा आपल्या जागी विस्तारलेला दिसला; पण मी तिकडून गेलो तेव्हा त्याचा मागमूस राहिला नव्हता; मी त्याचा शोध केला तरी तो सापडला नाही. सात्त्विक मनुष्याकडे लक्ष दे, सरळ मनुष्याकडे पाहा; शांतिप्रिय मनुष्याचा वंश टिकून राहील. पातकी तर पूर्णपणे नष्ट होतील; दुर्जनांचा वंश छाटला जाईल; परंतु नीतिमानांचे तारण परमेश्वरापासून होते; संकटसमयी तोच त्यांचा दुर्ग आहे. परमेश्वर त्यांना साहाय्य करतो व त्यांना मुक्त करतो; त्यांना दुर्जनांपासून मुक्त करतो व तारतो, कारण त्यांनी त्याचा आश्रय घेतला आहे.

स्तोत्रसंहिता 37:23-40 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मनुष्याची पावले परमेश्वराकडून स्थिर केली जातात, असा मनुष्य ज्याचे मार्ग देवाच्या दृष्टीने प्रशंसनीय असतात. जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही. कारण परमेश्वर त्यास आपल्या हाताने सावरील. मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे; तरी नितीमान टाकलेला किंवा त्याच्या मुलांस भाकरी मागताना मी पाहिले नाही. सारा दिवस तो दयाळूपणाने वागतो आणि उसने देतो, त्याची संतती आशीर्वादित असते. वाईटापासून फिर आणि चांगले ते कर. तेव्हा तू सर्वकाळासाठी वाचवला जाशील. कारण परमेश्वरास न्याय प्रिय आहे आणि तो विश्वासाने त्याच्यामागे चालणाऱ्यांस सोडत नाही. ते सर्वकाळासाठी राखून ठेवलेले आहेत. परंतु दुष्टाचे वंशज छेदले जातील. नितीमान तर पृथ्वीचे वतन पावतील आणि सर्वकाळ त्यामध्ये वस्ती करतील. नितीमान मनुष्याचे मुख ज्ञान बोलते, आणि न्याय वाढवते. त्याच्या हृदयात त्याच्या देवाचे नियमशास्त्र असते, त्याचे पाय कधी घसरणार नाहीत. परंतु दुष्ट मनुष्य हा नितीमान मनुष्यास बघतो, आणि त्यास मारण्याच्या शोधात असतो. परंतु परमेश्वर त्यांना दुष्ट मनुष्याच्या हातात त्यागणार नाही. किंवा जेव्हा त्याचा न्याय होईल तेव्हा त्यास अपराधी ठरवणार नाही. परमेश्वराची वाट पाहा आणि त्याचे मार्ग पाळ. आणि तो तुला वर उचलणार म्हणजे तुला भूमी मिळेल. जेव्हा दुष्ट छेदला जाणार तेव्हा तू पाहशील. मी विस्तारलेल्या आणि सशक्त झाडासारखा एक दुष्ट मनुष्य पाहिला. जो आपले मूळ जमिनीत पसरवतो. परंतु जेव्हा मी त्याच्यापासून पुन्हा गेलो, तर तो तेथे नव्हता. मी त्यास शोधले पण तो मला सापडला नाही. प्रमाणिक माणसाकडे लक्ष लाव आणि सरळास निशाणी लाव. कारण शांततेत राहण्याऱ्या मनुष्याचे भविष्य चांगले असते. पापी तर पूर्णपणे नाश पावतील, परंतू दुष्टाचा भावीकाळ छेदून टाकला जाईल. नितीमानाचे तारण हे परमेश्वराकडून येते, संकटसमयी तो त्यांचे रक्षण करीन. परमेश्वर त्यांना मदत करील आणि त्यांना तारील, तो त्यांचा वाईट लोकांपासून बचाव करतो, कारण त्यांनी परमेश्वराच्याठायी आश्रय घेतला आहे.

स्तोत्रसंहिता 37:23-40 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

ज्याला याहवेह प्रिय वाटतात, त्या मनुष्याची पावले याहवेह स्थिर करतात; जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही, कारण याहवेह त्याला आपल्या हाताने सावरतील. मी तरुण होतो आणि आता प्रौढ झालो आहे, तरी आजपर्यंत नीतिमानाला टाकलेला किंवा त्याच्या संततीला भीक मागताना मी पाहिले नाही. ते नेहमी इतरांना उदारतेने दान आणि उसने देतात; त्यांची संतती आशीर्वाद असते. वाईटापासून दूर राहा आणि चांगले ते करा; म्हणजे तुम्ही या देशात कायमचे राहाल. कारण याहवेहस न्यायी प्रिय आहे; ते आपल्या विश्वासू भक्तांचा कधीही त्याग करणार नाही. दुष्टपणा करणारे लोक मात्र पूर्णपणे नाश पावतील, दुष्टांची संतती नष्ट होऊन जाईल. नीतिमानास पृथ्वीचे वतन मिळेल आणि आपल्या वतनात ते सर्वदा राहतील. नीतिमान आपल्या मुखाने ज्ञानाच्या गोष्टी बोलतो, त्याची जीभ जे न्याय्य आहे ते उच्चारते. परमेश्वराचे नियम त्याच्या अंतःकरणात असतात; त्याची पावले घसरणार नाही. दुष्ट लोक नीतिमानांवर टपलेले असतात, त्यांना जिवे मारण्याची वाट पाहत असतात. परंतु याहवेह त्यांना दुष्ट लोकांच्या हाती देणार नाही, किंवा न्यायालयात त्यांना ते दोषीही ठरविले जाऊ देणार नाही. याहवेहची प्रतीक्षा कर आणि त्यांच्या सन्मार्गाचे अवलंबन कर. तेच तुला उंच करून पृथ्वीचे अधिकारी करतील; दुष्ट लोक नष्ट झाल्याचे तू डोळ्यांनी पाहशील. मी एक वाईट व क्रूर मनुष्य पाहिला आहे. तो सुपीक जमिनीतील हिरव्यागार झाडासारखा पसरलेला होता. परंतु तो लवकरच नाहीसा झाला; मी त्याचा शोध घेतला, पण तो मला सापडला नाही. सात्विक मनुष्याकडे लक्ष लाव, सरळ मनुष्याकडे पाहा; शांतताप्रिय मनुष्याचा भावी काळ सुखाचा आहे. परंतु सर्व पापी लोक नष्ट केले जातील; आणि त्याची संतती छाटली जाईल. याहवेहद्वारे नीतिमानांचे तारण होते. संकटकाळी ते त्यांचे आश्रयदुर्ग असतात. याहवेह त्यांचे साहाय्य करतात आणि त्यांना मुक्त करतात; दुष्टांपासून सुटका करून त्यांचे रक्षण करतात, कारण त्यांनी याहवेहचा आश्रय घेतला आहे.