YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 37:23-40

स्तोत्र. 37:23-40 IRVMAR

मनुष्याची पावले परमेश्वराकडून स्थिर केली जातात, असा मनुष्य ज्याचे मार्ग देवाच्या दृष्टीने प्रशंसनीय असतात. जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही. कारण परमेश्वर त्यास आपल्या हाताने सावरील. मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे; तरी नितीमान टाकलेला किंवा त्याच्या मुलांस भाकरी मागताना मी पाहिले नाही. सारा दिवस तो दयाळूपणाने वागतो आणि उसने देतो, त्याची संतती आशीर्वादित असते. वाईटापासून फिर आणि चांगले ते कर. तेव्हा तू सर्वकाळासाठी वाचवला जाशील. कारण परमेश्वरास न्याय प्रिय आहे आणि तो विश्वासाने त्याच्यामागे चालणाऱ्यांस सोडत नाही. ते सर्वकाळासाठी राखून ठेवलेले आहेत. परंतु दुष्टाचे वंशज छेदले जातील. नितीमान तर पृथ्वीचे वतन पावतील आणि सर्वकाळ त्यामध्ये वस्ती करतील. नितीमान मनुष्याचे मुख ज्ञान बोलते, आणि न्याय वाढवते. त्याच्या हृदयात त्याच्या देवाचे नियमशास्त्र असते, त्याचे पाय कधी घसरणार नाहीत. परंतु दुष्ट मनुष्य हा नितीमान मनुष्यास बघतो, आणि त्यास मारण्याच्या शोधात असतो. परंतु परमेश्वर त्यांना दुष्ट मनुष्याच्या हातात त्यागणार नाही. किंवा जेव्हा त्याचा न्याय होईल तेव्हा त्यास अपराधी ठरवणार नाही. परमेश्वराची वाट पाहा आणि त्याचे मार्ग पाळ. आणि तो तुला वर उचलणार म्हणजे तुला भूमी मिळेल. जेव्हा दुष्ट छेदला जाणार तेव्हा तू पाहशील. मी विस्तारलेल्या आणि सशक्त झाडासारखा एक दुष्ट मनुष्य पाहिला. जो आपले मूळ जमिनीत पसरवतो. परंतु जेव्हा मी त्याच्यापासून पुन्हा गेलो, तर तो तेथे नव्हता. मी त्यास शोधले पण तो मला सापडला नाही. प्रमाणिक माणसाकडे लक्ष लाव आणि सरळास निशाणी लाव. कारण शांततेत राहण्याऱ्या मनुष्याचे भविष्य चांगले असते. पापी तर पूर्णपणे नाश पावतील, परंतू दुष्टाचा भावीकाळ छेदून टाकला जाईल. नितीमानाचे तारण हे परमेश्वराकडून येते, संकटसमयी तो त्यांचे रक्षण करीन. परमेश्वर त्यांना मदत करील आणि त्यांना तारील, तो त्यांचा वाईट लोकांपासून बचाव करतो, कारण त्यांनी परमेश्वराच्याठायी आश्रय घेतला आहे.