स्तोत्रसंहिता 22:1-13
स्तोत्रसंहिता 22:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करण्यास तू जवळ नाहीस. माझ्या देवा, दिवसा मी धावा करतो तरी तू ऐकत नाहीस; रात्रीही धावा करतो तरी मला चैन पडत नाही. तरीपण, हे इस्राएलाच्या स्तवनात वसणार्या, तू पवित्र आहेस. आमचे पूर्वज तुझ्यावर भाव ठेवत; ते तुझ्यावर भाव ठेवत असत आणि तू त्यांना मुक्त करत होतास. ते तुझा धावा करत आणि मुक्त होत. ते तुझ्यावर भाव ठेवत, आणि निराश होत नसत. मी तर कीटक आहे, मानव नव्हे; मनुष्यांनी निंदलेला, लोकांनी धिक्कारलेला आहे. मला पाहणारे सर्व माझा उपहास करतात, वाकुल्या दाखवतात, थट्टेने डोके डोलवतात; ते म्हणतात, “त्याने परमेश्वरावर आपला हवाला टाकला आहे; तो त्याला मुक्त करो; तो त्याला सोडवो, कारण तो त्याचा आवडता आहे.” परंतु मला उदरातून बाहेर आणणारा तूच आहेस; मी आपल्या आईच्या अंगावर पीत होतो तेव्हा तू मला तुझ्यावर भाव ठेवण्याची स्फूर्ती दिलीस. मी जन्मलो तेव्हापासून मला तुझ्या हाती सोपवलेले आहे; मातेच्या उदरातून बाहेर पडलो तेव्हापासून तूच माझा देव आहेस. माझ्यापासून दूर राहू नकोस, कारण संकट येऊन ठेपले आहे; आणि साहाय्य करणारा कोणी नाही. पुष्कळ गोर्ह्यांनी मला वेढले आहे; बाशानातील दांडग्या गोर्ह्यांनी मला घेरले आहे. फाडून टाकणार्या व गर्जना करणार्या सिंहासारखे ते तोंड वासून माझ्यावर आले आहेत.
स्तोत्रसंहिता 22:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास? मला तारायला आणि माझ्या वेदनांचा शब्द ऐकायला तू दूर का आहेस? माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली परंतु तू उत्तर दिले नाहीस, आणि मी रात्रीही गप्प बसलो नाही. तरी तू पवित्र आहेस, जो इस्राएलाच्या स्तवनामध्ये वसतोस. आमच्या पूर्वजांनी तुझ्यावर विश्वास ठेवला. होय देवा, त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना वाचवलेस. देवा आमच्या पूर्वजांनी तुला मदतीसाठी आरोळी केली आणि त्यांना तू सोडवले, त्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांची निराशा झाली नाही. परंतू मी किटक आहे, मी मनुष्य नाही, जो मनुष्यांनी निंदिलेला आणि लोकांनी तिरस्कार केलेला आहे. सर्व माझ्याकडे बघणारे माझा उपहास करतात; ते माझा अपमान करतात, ते त्यांचे डोके हलवतात. ते म्हणतात “तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तर परमेश्वर त्यास सोडवो. त्याने त्यास वाचवावे, कारण तो त्याच्याठायी हर्ष पावतो.” परंतु मला उदरांतून बाहेर काढणारा तुच आहेस, मी माझ्या आईच्या स्तनांवर असता, तू मला तुझ्यावर विश्वास ठेवायला शिकवले. मी गर्भातूनच तुझ्यावर सोपवून दिलेला होतो. माझ्या आईच्या उदरात असतानाच तू माझा देव आहेस. माझ्यापासून दूर नको राहू, कारण संकट जवळच आहे. आणि मला मदत करायला कोणीही नाही. खुप बैलांनी मला वेढले आहे, बाशानाच्या बळकट बैलांनी मला वेढले आहे. जसा सिंह आपले तोंड त्याच्या भक्ष्यास फाडण्यास उघडतो, तसे त्यांनी आपले तोंड माझ्या विरूद्ध उघडले आहे.
स्तोत्रसंहिता 22:1-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझ्या परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला? मला वाचविण्यास तुम्ही एवढे दूर का राहिले, माझ्या विव्हळण्याची आरोळी तुम्हापासून दूर का? माझ्या परमेश्वरा, मी दिवसा तुम्हाला हाक मारतो, परंतु तुम्ही उत्तर देत नाही, रात्री पण मला कोणताही विसावा नाही. तरीपण तुम्ही पवित्र आहात; इस्राएलाच्या स्तवनांवर तुम्ही विराजमान आहात. तुमच्यावर आमच्या पूर्वजांनी भरवसा ठेवला; तुमच्यावर त्यांनी भरवसा ठेवला आणि तुम्ही त्यांना सोडविले. त्यांनी तुमचा धावा केला आणि तुम्ही त्यांना वाचविले; तुमच्यावरील विश्वासाने त्यांना लज्जित होऊ दिले नाही. परंतु मी तर कीटक आहे, मनुष्य नाही, मनुष्याकडून माझा तिरस्कार आणि अवहेलना झाली आहे. मला पाहून ते माझा उपहास करतात; ते माझा अपमान करतात, आपले डोके हालवीत, ते म्हणतात, “त्याने याहवेहवर आपला भरवसा ठेवला आहे, याहवेह त्याला मुक्त करो. तेच त्याची सुटका करो, कारण त्यांच्याठायी त्याला संतोष आहे.” तुम्हीच मला माझ्या आईच्या उदरातून सुखरुप बाहेर काढले; मी माझ्या आईच्या कुशीत होतो, तेव्हापासून मी तुमच्यावर भरवसा ठेवला आहे; मी जन्मापासून तुमच्या संरक्षणाखाली आहे. मी आईच्या उदरात असल्यापासून तुम्ही माझे परमेश्वर आहात. माझ्यापासून दूर राहू नका, कारण संकट जवळ आहे आणि मला साहाय्य करणारा कोणी नाही. अनेक बैलांनी मला घेरले; बाशानातील दांडग्या बैलांनी मला घेरलेले आहे. गर्जना करीत आपल्या भक्ष्यांवर तुटून पडणार्या सिंहाप्रमाणे उघड्या जबड्यांनी ते माझ्यावर चालून येत आहेत.