माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करण्यास तू जवळ नाहीस. माझ्या देवा, दिवसा मी धावा करतो तरी तू ऐकत नाहीस; रात्रीही धावा करतो तरी मला चैन पडत नाही. तरीपण, हे इस्राएलाच्या स्तवनात वसणार्या, तू पवित्र आहेस. आमचे पूर्वज तुझ्यावर भाव ठेवत; ते तुझ्यावर भाव ठेवत असत आणि तू त्यांना मुक्त करत होतास. ते तुझा धावा करत आणि मुक्त होत. ते तुझ्यावर भाव ठेवत, आणि निराश होत नसत. मी तर कीटक आहे, मानव नव्हे; मनुष्यांनी निंदलेला, लोकांनी धिक्कारलेला आहे. मला पाहणारे सर्व माझा उपहास करतात, वाकुल्या दाखवतात, थट्टेने डोके डोलवतात; ते म्हणतात, “त्याने परमेश्वरावर आपला हवाला टाकला आहे; तो त्याला मुक्त करो; तो त्याला सोडवो, कारण तो त्याचा आवडता आहे.” परंतु मला उदरातून बाहेर आणणारा तूच आहेस; मी आपल्या आईच्या अंगावर पीत होतो तेव्हा तू मला तुझ्यावर भाव ठेवण्याची स्फूर्ती दिलीस. मी जन्मलो तेव्हापासून मला तुझ्या हाती सोपवलेले आहे; मातेच्या उदरातून बाहेर पडलो तेव्हापासून तूच माझा देव आहेस. माझ्यापासून दूर राहू नकोस, कारण संकट येऊन ठेपले आहे; आणि साहाय्य करणारा कोणी नाही. पुष्कळ गोर्ह्यांनी मला वेढले आहे; बाशानातील दांडग्या गोर्ह्यांनी मला घेरले आहे. फाडून टाकणार्या व गर्जना करणार्या सिंहासारखे ते तोंड वासून माझ्यावर आले आहेत.
स्तोत्रसंहिता 22 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 22
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 22:1-13
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ