YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 22:1-13

स्तोत्रसंहिता 22:1-13 MRCV

माझ्या परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला? मला वाचविण्यास तुम्ही एवढे दूर का राहिले, माझ्या विव्हळण्याची आरोळी तुम्हापासून दूर का? माझ्या परमेश्वरा, मी दिवसा तुम्हाला हाक मारतो, परंतु तुम्ही उत्तर देत नाही, रात्री पण मला कोणताही विसावा नाही. तरीपण तुम्ही पवित्र आहात; इस्राएलाच्या स्तवनांवर तुम्ही विराजमान आहात. तुमच्यावर आमच्या पूर्वजांनी भरवसा ठेवला; तुमच्यावर त्यांनी भरवसा ठेवला आणि तुम्ही त्यांना सोडविले. त्यांनी तुमचा धावा केला आणि तुम्ही त्यांना वाचविले; तुमच्यावरील विश्वासाने त्यांना लज्जित होऊ दिले नाही. परंतु मी तर कीटक आहे, मनुष्य नाही, मनुष्याकडून माझा तिरस्कार आणि अवहेलना झाली आहे. मला पाहून ते माझा उपहास करतात; ते माझा अपमान करतात, आपले डोके हालवीत, ते म्हणतात, “त्याने याहवेहवर आपला भरवसा ठेवला आहे, याहवेह त्याला मुक्त करो. तेच त्याची सुटका करो, कारण त्यांच्याठायी त्याला संतोष आहे.” तुम्हीच मला माझ्या आईच्या उदरातून सुखरुप बाहेर काढले; मी माझ्या आईच्या कुशीत होतो, तेव्हापासून मी तुमच्यावर भरवसा ठेवला आहे; मी जन्मापासून तुमच्या संरक्षणाखाली आहे. मी आईच्या उदरात असल्यापासून तुम्ही माझे परमेश्वर आहात. माझ्यापासून दूर राहू नका, कारण संकट जवळ आहे आणि मला साहाय्य करणारा कोणी नाही. अनेक बैलांनी मला घेरले; बाशानातील दांडग्या बैलांनी मला घेरलेले आहे. गर्जना करीत आपल्या भक्ष्यांवर तुटून पडणार्‍या सिंहाप्रमाणे उघड्या जबड्यांनी ते माझ्यावर चालून येत आहेत.