स्तोत्रसंहिता 103:13-18
स्तोत्रसंहिता 103:13-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जसा पिता आपल्या मुलांवर करुणा करतो, तसा परमेश्वर आपला सन्मान करतात त्यावर करुणा करतो. कारण आम्ही कसे अस्तित्वात आलो हे तो जाणतो, आम्ही धुळ आहोत हे त्यास माहित आहे. मनुष्याच्या आयुष्याचे दिवस गवताप्रमाणे आहेत; शेतातील फुलासारखा तो फुलतो. वारा त्यावरून वाहून जातो आणि ते नाहीसे होते, आणि कोणीही सांगू शकत नाही की, ते एकदा कोठे वाढत होते. परंतु परमेश्वराची करार विश्वसनियता त्याचा आदर करणाऱ्यावर अनादिकालापासून अनंतकाळापर्यंत असते. त्याचा न्यायीपणाचा विस्तार त्यांच्या वंशजापर्यंत होतो. जे त्याचा करार पाळतात आणि त्यांच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो.
स्तोत्रसंहिता 103:13-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जशी पित्याची करुणा त्याच्या लेकरांवर असते, तसे त्यांचे भय बाळगणार्यांसाठी याहवेह कोमलहृदयी व सहानुभूतीने भरलेले आहेत. कारण आम्ही कसे निर्माण झालो हे ते जाणतात, आम्ही धूळ आहोत याचे त्यांना स्मरण आहे. मर्त्यप्राण्याचे जीवन गवताप्रमाणे आहे, ते मैदानावर एखाद्या फुलासारखे फुलतात; परंतु उष्ण वारा त्यावर येताच ते कायमचे नाहीसे होते, ते स्थळ त्याचे स्मरण करीत नाही. परंतु याहवेहची प्रेममयदया त्यांचे भय धरणार्यांवर अनादि पासून अनंतकालापर्यंत तथा त्यांची नीतिमत्ता त्याच्या पुत्र पौत्रांना लाभते. जे त्यांच्या कराराशी प्रामाणिक राहतात, आणि त्यांच्या आज्ञा पाळण्याची आठवण ठेवतात.
स्तोत्रसंहिता 103:13-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो, तसा परमेश्वर आपले भय धरणार्यांवर ममता करतो. कारण तो आमची प्रकृती जाणतो; आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवतो. मानवप्राण्यांचे आयुष्य गवतासारखे आहे; वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो. वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते, आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुन्हा संबंध येत नाही; परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणार्यांवर युगानुयुग असते, आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्यांच्या पुत्रपौत्रांना घडतो; म्हणजे त्याचा करार जे पाळतात आणि त्याच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो.