जसा पिता आपल्या मुलांवर करुणा करतो, तसा परमेश्वर आपला सन्मान करतात त्यावर करुणा करतो. कारण आम्ही कसे अस्तित्वात आलो हे तो जाणतो, आम्ही धुळ आहोत हे त्यास माहित आहे. मनुष्याच्या आयुष्याचे दिवस गवताप्रमाणे आहेत; शेतातील फुलासारखा तो फुलतो. वारा त्यावरून वाहून जातो आणि ते नाहीसे होते, आणि कोणीही सांगू शकत नाही की, ते एकदा कोठे वाढत होते. परंतु परमेश्वराची करार विश्वसनियता त्याचा आदर करणाऱ्यावर अनादिकालापासून अनंतकाळापर्यंत असते. त्याचा न्यायीपणाचा विस्तार त्यांच्या वंशजापर्यंत होतो. जे त्याचा करार पाळतात आणि त्यांच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो.
स्तोत्र. 103 वाचा
ऐका स्तोत्र. 103
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्र. 103:13-18
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ