YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 103:13-18

स्तोत्रसंहिता 103:13-18 MRCV

जशी पित्याची करुणा त्याच्या लेकरांवर असते, तसे त्यांचे भय बाळगणार्‍यांसाठी याहवेह कोमलहृदयी व सहानुभूतीने भरलेले आहेत. कारण आम्ही कसे निर्माण झालो हे ते जाणतात, आम्ही धूळ आहोत याचे त्यांना स्मरण आहे. मर्त्यप्राण्याचे जीवन गवताप्रमाणे आहे, ते मैदानावर एखाद्या फुलासारखे फुलतात; परंतु उष्ण वारा त्यावर येताच ते कायमचे नाहीसे होते, ते स्थळ त्याचे स्मरण करीत नाही. परंतु याहवेहची प्रेममयदया त्यांचे भय धरणार्‍यांवर अनादि पासून अनंतकालापर्यंत तथा त्यांची नीतिमत्ता त्याच्या पुत्र पौत्रांना लाभते. जे त्यांच्या कराराशी प्रामाणिक राहतात, आणि त्यांच्या आज्ञा पाळण्याची आठवण ठेवतात.