YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 22:17-29

नीतिसूत्रे 22:17-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ज्ञान्यांची वचने कान लावून ऐक, माझ्या ज्ञानाकडे चित्त लाव, कारण ती तू अंतर्यामी वागवली व आपल्या वाणीच्या ठायी स्थापली तर किती चांगले होईल! परमेश्वरावर तुझा भाव असावा, म्हणून मी तुला ती वचने आज कळवली आहेत. सत्याच्या वचनांचे तत्त्व तुला कळवावे, व तुला पाठवणार्‍यांना सत्याची वचने तू परत जाऊन सांगावीत म्हणून मसलती व ज्ञान ह्यांनी युक्त अशा उत्कृष्ट गोष्टी मी तुला लिहून दिल्या नाहीत काय? गरीब हा केवळ गरीब आहे म्हणून त्याला नाडू नकोस. आणि वेशीत विपन्नावर जुलूम करू नकोस; कारण परमेश्वर त्यांचा कैवार घेईल. आणि त्यांना नागवणार्‍यांचा जीव नागवील. रागीट मनुष्याशी मैत्री करू नकोस; कोपिष्ठाची संगत धरू नकोस; धरशील तर त्याची चालचलणूक शिकून तू आपला जीव पाशात घालशील. हातावर हात मारणारे व कर्जाला जामीन होणारे ह्यांच्यातला तू होऊ नकोस. तुझ्याजवळ कर्ज फेडण्यास काही नसले म्हणजे तुझ्या अंगाखालचे अंथरूण तो काढून नेईल अशी पाळी तू का येऊ द्यावीस? तुझ्या पूर्वजांनी घातलेली मेर सारू नकोस. आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला दिसतो काय? त्याचे स्थान राजांसमोर आहे; हलकट लोकांसमोर नाही.

सामायिक करा
नीतिसूत्रे 22 वाचा

नीतिसूत्रे 22:17-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

ज्ञानाची वचने ऐकून घे आणि त्याकडे लक्ष दे, आणि आपले मन माझ्या ज्ञानाकडे लाव. कारण ती जर तू आपल्या अंतर्यामात ठेवशील, आणि ती सर्व तुझ्या ओठावर तयार राहतील. तर किती बरे होईल. परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून मी तुला ती वचने आज शिकवली आहेत. मी तुझ्यासाठी शिक्षण व ज्ञान ह्यातल्या तीस म्हणी लिहिल्या नाहीत काय? या सत्याच्या वचनाचे विश्वासूपण तुला शिकवावे, ज्याने तुला पाठवले त्यास विश्वासाने उत्तरे द्यावीत म्हणून नाहीत काय? गरीब मनुष्यास लुटू नको, कारण तो गरीबच आहे, किंवा गरजवंतावर वेशीत जुलूम करू नकोस. कारण परमेश्वर त्यांचा कैवार घेईल, आणि ज्या कोणी त्यांना लुटले त्यांचे जिवन तो लुटेल. जो कोणी एक व्यक्ती रागाने राज्य करतो त्याची मैत्री करू नकोस, आणि जो कोणी संतापी आहे त्याच्याबरोबर जाऊ नकोस. तुम्ही त्याचे मार्ग शिकाल, आणि गेलात तर तुम्ही स्वतःला जाळ्यात अडकवून घ्याल. दुसऱ्याच्या कर्जाला जे जामीन होतात, आणि हातावर हात मारणारे त्यांच्यातला तू एक होऊ नको. जर तुझ्याकडे कर्ज फेडण्यास काही नसले, तर त्याने तुमच्या अंगाखालून तुझे अंथरुण का काढून घ्यावे? तुझ्या वडिलांनी जी प्राचीन सीमा घालून ठेवली आहे, तो दगड दूर करू नकोस. जो आपल्या कामात तरबेज अशा मनुष्यास तू पाहिले आहे का? तो राजासमोर उभा राहील; तो सामान्य लोकांसमोर उभा राहणार नाही.

सामायिक करा
नीतिसूत्रे 22 वाचा

नीतिसूत्रे 22:17-29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

लक्ष दे आणि सुज्ञानाचा बोलण्याकडे तुझे कान वळव; मी जे शिक्षण देतो त्याचे तुझ्या हृदयापासून पालन कर, जेव्हा तू ते आपल्या हृदयात ठेवशील आणि ते सर्व तुला मुखाग्र असतील तर तुला आनंद मिळेल. म्हणजे तुझा याहवेहवर विश्वास राहील, मी आज तुला शिकवितो, होय तुलासुद्धा. सल्लामसलत आणि ज्ञान याविषयी मी तीस वचने तुमच्यासाठी लिहिली नव्हती काय? प्रामाणिक असणे आणि सत्य बोलणे तुला शिकविले नाही काय म्हणजे ज्यांच्याकडे तू काम करतोस त्यांच्यासाठी खरा अहवाल आणू शकशील? गरिबांना ते गरीब आहेत म्हणून लुबाडू नका, आणि गरजवंतांना न्यायालयात चिरडू नका, कारण याहवेह त्यांचा खटला लढतील आणि जीवनासाठी जीवन घेतील. तापट माणसांची मैत्री करू नका, जो शीघ्रकोपी आहे त्याच्याबरोबर राहू नका, नाहीतर तुम्ही त्यांचाच कित्ता गिरवाल, आणि तुम्ही स्वतःच आपला जीव पाशात घालाल. वचन देऊन हात मिळवणी करणार्‍यासारखे तुम्ही होऊ नका किंवा कर्जाचे जामीन होऊ नका; जर तुमच्याकडे कर्ज फेडण्यास पैसे नसतील तर ते तुमचे अंथरूणसुद्धा काढून घेतील. ज्या तुमच्या पूर्वजांनी निश्चित केल्या आहेत त्या पुरातन सीमारेषांच्या खुणा बदलू नका. आपल्या कामात निपुण असणारी माणसे तू पाहिली आहे का? ते खालच्या श्रेणीच्या अधिकार्‍यांसमोर नाही तर राजांसमोर सेवा करतील.