लक्ष दे आणि सुज्ञानाचा बोलण्याकडे तुझे कान वळव; मी जे शिक्षण देतो त्याचे तुझ्या हृदयापासून पालन कर, जेव्हा तू ते आपल्या हृदयात ठेवशील आणि ते सर्व तुला मुखाग्र असतील तर तुला आनंद मिळेल. म्हणजे तुझा याहवेहवर विश्वास राहील, मी आज तुला शिकवितो, होय तुलासुद्धा. सल्लामसलत आणि ज्ञान याविषयी मी तीस वचने तुमच्यासाठी लिहिली नव्हती काय? प्रामाणिक असणे आणि सत्य बोलणे तुला शिकविले नाही काय म्हणजे ज्यांच्याकडे तू काम करतोस त्यांच्यासाठी खरा अहवाल आणू शकशील? गरिबांना ते गरीब आहेत म्हणून लुबाडू नका, आणि गरजवंतांना न्यायालयात चिरडू नका, कारण याहवेह त्यांचा खटला लढतील आणि जीवनासाठी जीवन घेतील. तापट माणसांची मैत्री करू नका, जो शीघ्रकोपी आहे त्याच्याबरोबर राहू नका, नाहीतर तुम्ही त्यांचाच कित्ता गिरवाल, आणि तुम्ही स्वतःच आपला जीव पाशात घालाल. वचन देऊन हात मिळवणी करणार्यासारखे तुम्ही होऊ नका किंवा कर्जाचे जामीन होऊ नका; जर तुमच्याकडे कर्ज फेडण्यास पैसे नसतील तर ते तुमचे अंथरूणसुद्धा काढून घेतील. ज्या तुमच्या पूर्वजांनी निश्चित केल्या आहेत त्या पुरातन सीमारेषांच्या खुणा बदलू नका. आपल्या कामात निपुण असणारी माणसे तू पाहिली आहे का? ते खालच्या श्रेणीच्या अधिकार्यांसमोर नाही तर राजांसमोर सेवा करतील.
नीतिसूत्रे 22 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 22:17-29
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ