YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 22:17-29

नीतिसूत्रे 22:17-29 MARVBSI

ज्ञान्यांची वचने कान लावून ऐक, माझ्या ज्ञानाकडे चित्त लाव, कारण ती तू अंतर्यामी वागवली व आपल्या वाणीच्या ठायी स्थापली तर किती चांगले होईल! परमेश्वरावर तुझा भाव असावा, म्हणून मी तुला ती वचने आज कळवली आहेत. सत्याच्या वचनांचे तत्त्व तुला कळवावे, व तुला पाठवणार्‍यांना सत्याची वचने तू परत जाऊन सांगावीत म्हणून मसलती व ज्ञान ह्यांनी युक्त अशा उत्कृष्ट गोष्टी मी तुला लिहून दिल्या नाहीत काय? गरीब हा केवळ गरीब आहे म्हणून त्याला नाडू नकोस. आणि वेशीत विपन्नावर जुलूम करू नकोस; कारण परमेश्वर त्यांचा कैवार घेईल. आणि त्यांना नागवणार्‍यांचा जीव नागवील. रागीट मनुष्याशी मैत्री करू नकोस; कोपिष्ठाची संगत धरू नकोस; धरशील तर त्याची चालचलणूक शिकून तू आपला जीव पाशात घालशील. हातावर हात मारणारे व कर्जाला जामीन होणारे ह्यांच्यातला तू होऊ नकोस. तुझ्याजवळ कर्ज फेडण्यास काही नसले म्हणजे तुझ्या अंगाखालचे अंथरूण तो काढून नेईल अशी पाळी तू का येऊ द्यावीस? तुझ्या पूर्वजांनी घातलेली मेर सारू नकोस. आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला दिसतो काय? त्याचे स्थान राजांसमोर आहे; हलकट लोकांसमोर नाही.