नहेम्या 12:1-26
नहेम्या 12:1-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शल्तीएलाचा पुत्र जरूब्बाबेल व येशूवा ह्यांच्याबरोबर जे याजक व लेवी वर आले ते हे : सराया, यिर्मया, एज्रा, अमर्या, मल्लूख, हट्टूश, शखन्या, रहूम, मरेमोथ, इद्दो, गिन्नथोई, अबीया, मियामीन, माद्या, बिल्गा, शमया, योयारीब, यदया, सल्लू, आमोक, हिल्कीया व यदया; हे येशूवाच्या काळात याजकांतले व त्यांच्या बांधवांतले मुख्य होते. लेवी : येशूवा, बिन्नुई, कदमीएल, शेरेब्या, यहूदा, मत्तन्या व त्याचे भाऊबंद स्तुतिगायनाच्या कामावर होते; आणि त्यांचे भाऊबंद बकबुक्या व उन्नो त्यांच्याबरोबर पहार्यावर होते. येशूवाला योयाकीम झाला, योयाकीमाला एल्याशीब झाला, एल्याशीबाला योयादा झाला, योयादाला योनाथान झाला, व योनाथानाला यद्दूवा झाला. योयाकीमाच्या दिवसांत याजक पितृकुळातले मुख्य होते, ते हे : सरायापासून मराया, यिर्मयापासून हनन्या, एज्रापासून मशुल्लाम, अमर्यापासून यहोहानान, मल्लूखीपासून योनाथान, शबन्यापासून योसेफ, हारीमापासून अदना, मरायोथापासून हेलकइ, इद्दोपासून जखर्या, गिन्नथोनापासून मशुल्लाम, अबीयापासून जिख्री, मिन्यामिनापासून, मोवद्या-पासून पिल्तय, बिल्गापासून शम्मूवा, शमयापासून यहोनाथान, योयारीबापासून मत्तनई, यदयापासून उज्जी, सल्लाइपासून कल्लय, आमोकापासून एबेर, हिज्कीयापासून हशब्या व यदायापासून नथनेल. एल्याशीब, योयादा, योहानान व यद्दूवा ह्यांच्या काळात लेवी आणि दारयावेश पारसाच्या कारकिर्दीतले याजक हे त्यांच्या पितृकुळाचे मुख्य होते. लेव्यांचे वंशज, आपापल्या पितृकुळांचे मुख्य, इतिहासाच्या पुस्तकात, एल्याशिबाचा पुत्र योहानान ह्याच्या काळापर्यंत नमूद केले होते; आणि लेव्यांतले मुख्य हशब्या, शेरेब्या व कदमीएलाचा पुत्र येशूवा व त्यांच्यासमोर त्यांचे भाऊबंद असे गटागटाने देवाचा मनुष्य दावीद ह्याच्या आज्ञेप्रमाणे स्तवन व ईशोपकारस्मरण करायला होते. मत्तन्या, बकबुक्या, ओबद्या, मशुल्लाम, तल्मोन व अक्कूब हे द्वारपाळ वेशींवरील कोठ्यांचे रक्षण करीत असत; हे योयाकीम बिन येशूवा बिन योसादाक ह्याच्या दिवसांत व नहेम्या प्रांताधिकारी व लेखक एज्रा याजक ह्यांच्या दिवसांत होते.
नहेम्या 12:1-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शल्तीएलाचा पुत्र जरुब्बाबेल आणि येशूवा यांच्याबरोबर ते जे याजक आणि लेवी आले ते हे आहेतः सराया, यिर्मया, एज्रा, अमऱ्या, मल्लूख हत्तूश, शखन्या, रहूम मरेमोथ. इद्दो, गिन्नथोई, अबीया, मियामीन, माद्या, बिलगा, शमाया, योयारीब, यदया. सल्लू आमोक, हिल्कीया, यदया, हे लोक येशूवाच्या कारकिर्दीत, याजक आणि त्यांचे नातलग यांचे प्रमुख होते. लेवी असेः येशूवा, बिन्नुई, कदमीएल, शेरेब्या, यहूदा, आणि मत्तन्या, हे लोक तसेच मत्तन्याचे नातेवाईक देवाच्या स्तुती स्तोत्रांचे प्रमुख होते. बकबुक्या आणि उन्नी हे त्यांचे नातलग होते. देवाच्या स्तुतीस्तोत्रांच्या वेळी हे दोघे त्यांच्या पलीकडे उभे राहत. येशूवा योयाकीमचा पिता. योयाकीम एल्याशीबाचा जन्मदाता. एल्याशीबाचा पुत्र योयादा. योयादाने योनाथानाला जन्म दिला आणि योनाथानाने यद्दवाला. योयाकीमच्या काळात याजकांच्या घराण्यांचे मुख्य असलेले लोक पुढील प्रमाणे:सरायाच्या घराण्याचा प्रमुख मराया. यिर्मयाच्या घराण्याचा प्रमुख हनन्या एज्राच्या घराण्याचा प्रमुख मशुल्लाम. अमऱ्याच्या घराण्याचा प्रमुख यहोहानान. मल्लूखीच्या घराण्याचा प्रमुख योनाथान शबन्याच्या घराण्याचा प्रमुख योसेफ. हारीमच्या घराण्याचा प्रमुख अदना. मरामोथच्या घराण्याचा प्रमुख हेलकइ. इद्दोच्या घराण्याचा प्रमुख जखऱ्या. गिन्नथोनच्या घराण्याचा प्रमुख मशुल्लाम. अबीयाच्या घराण्याचा प्रमुख जिख्री. मिन्यामीन आणि मोवद्या यांच्या घराण्याचा प्रमुख पिल्तय. बिलगाच्या घराण्याचा प्रमुख शम्मूवा शमायाच्या घराण्याचा प्रमुख यहोनाथान. योयारीबच्या घराण्याचा प्रमुख मत्तनय. यदयाच्या घराण्याचा प्रमुख उज्जी. सल्लू याच्या घराण्याचा प्रमुख कल्लय आमोकच्या घराण्याचा प्रमुख एबेर हिल्कीयाच्या घराण्याचा प्रमुख हशब्या यदयाच्या घराण्याचा प्रमुख नथनेल. एल्याशीब, योयादा, योहानान व यद्दवा यांच्या काळात जे लेव्यांच्या आणि याजकांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांची नावे पारसी राजा दारयावेश याच्या कारकिर्दीत लिहून ठेवलेली आहेत. लेवी घराण्यातील वंशजांच्या कुटुंबप्रमुखांची नावे एल्याशीबाचा पुत्र योहानान याच्या काळापर्यंत इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत. लेव्यांचे प्रमुख असे होतेः हशब्या, शेरेब्या, कदमीएलचा पुत्र येशूवा, आणि त्यांचे भाऊ देवाची गौरव गीते आणि स्तोत्रे गाण्यासाठी त्यांच्या पलीकडे उभे राहत. समूह समुहाने दाद देत कारण देवाचा मनुष्य दावीद याची तशीच आज्ञा होती. दरवाजांच्या पलीकडच्या कोठारांवर पहारे करणाऱ्या द्वारपालांची नावे अशी: मत्तन्या, बकबुक्या, ओबद्या, मशुल्लाम, तल्मोन अक्कूब, हे द्वारपाल योयाकीमच्या कारकिर्दीत सेवेत होते. योयाकीम हा येशूवाचा पुत्र आणि येशूवा योसादाकाचा. नहेम्या हा अधिकारी आणि एज्रा हा याजक व लेखक यांच्याच काळात द्वारपाल होते.
नहेम्या 12:1-26 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल व येशूआसह आलेल्या याजकांची व लेव्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे: सेरायाह, यिर्मयाह, एज्रा, अमर्याह, मल्लूख, हट्टूश, शखन्याह, रहूम, मरेमोथ, इद्दो, गिन्नथोई, अबीया, मियामीन, मादियाह, बिल्गाह, शमायाह, योयारीब, यदायाह, सल्लू, आमोक, हिल्कियाह व यदायाह. हे येशूआच्या काळी असलेले याजक व त्यांचे सहकारी. लेवी हे होते, येशूआ, बिन्नुई, कदमीएल, शेरेब्याह, यहूदाह, मत्तन्याह व त्याचे सहकारी उपकारस्तुतीच्या उपासनेसाठी जबाबदार होते. बकबुकियाह व उन्नी यांचे सहकारी उपासनेच्या वेळी त्यांच्यासमोर उभे राहत असत. येशूआ योयाकिमाचा पिता होता; योयाकीम एल्याशीबाचा पिता होता; एल्याशीब यहोयादाचा पिता होता; यहोयादा योनाथानाचा पिता होता; योनाथान यद्दूआचा पिता होता. मुख्य याजक योयाकीमच्या कार्यकालात, हे याजकांचे कुलप्रमुख होते. मरायाह, सेरायाह कुळाचा प्रमुख; हनन्याह, यिर्मयाह कुळाचा प्रमुख; मशुल्लाम, एज्रा कुळाचा प्रमुख; यहोहानान, अमर्याह कुळाचा प्रमुख; योनाथान, मल्लूखी कुळाचा प्रमुख; योसेफ, शबन्याह कुळाचा प्रमुख; अदना, हारीम कुळाचा प्रमुख; हेलकइ, मरायोथ कुळाचा प्रमुख; जखर्याह, इद्दो कुळाचा प्रमुख; मशुल्लाम, गिन्नथोन कुळाचा प्रमुख; जिक्री, अबीया कुळाचा प्रमुख; पिल्तय, मोवद्याह व मिन्यामीन कुळाचा प्रमुख; शम्मुवा, बिल्गाह कुळाचा प्रमुख; योनाथान, शमायाह कुळाचा प्रमुख; मत्तनई, योयारीब कुळाचा प्रमुख; उज्जी, यदायाह कुळाचा प्रमुख; कल्लय, सल्लू कुळाचा प्रमुख; एबर, आमोक कुळाचा प्रमुख; हशब्याह, हिल्कियाह कुळाचा प्रमुख; नथानेल, यदायाह कुळाचा प्रमुख. एल्याशीबाच्या कार्यकालात सर्व लेवीचे कुलप्रमुख यहोयादा, योहानान व यद्दूआ होते, पर्शियाचा राजा दारयावेशच्या कारकिर्दीत याजक व लेवीच्या वंशावळी तयार करण्यात आल्या होत्या. इतिहासाच्या पुस्तकामध्ये एल्याशीबाचा पुत्र योहानानच्या काळापर्यंत लेवींच्या वंशजांची नावे नमूद केली होती. त्यावेळी लेवीचे कुलप्रमुख—हशब्याह, शेरेब्याह, व कदमीएलचा पुत्र येशूआ व त्यांचे सहकारी. परमेश्वराचा मनुष्य दावीदच्या आज्ञेप्रमाणे मंदिरात स्तवन व उपकारस्मरणाच्या वेळी त्यांचे कुलबांधव समोरासमोर उभे राहून एकमेकांना प्रतिसाद देत असत. मत्तन्याह, बकबुकियाह, ओबद्याह, मशुल्लाम, तल्मोन व अक्कूब हे द्वारपाल दरवाजांजवळ असलेल्या कोठारांचे संरक्षण करीत होते. योसादाकाचा पुत्र येशूआचा पुत्र योयाकीमच्या कार्यकालात म्हणजे जेव्हा नहेम्याह राज्यपाल होता व एज्रा याजक व नियमाचा शिक्षक होता, तेव्हा हे कामावर होते.