YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 12

12
याजक व लेवी
1शल्तीएलाचा पुत्र जरूब्बाबेल व येशूवा ह्यांच्याबरोबर जे याजक व लेवी वर आले ते हे : सराया, यिर्मया, एज्रा, 2अमर्‍या, मल्लूख, हट्टूश,
3शखन्या, रहूम, मरेमोथ, 4इद्दो, गिन्नथोई, अबीया, 5मियामीन, माद्या, बिल्गा, 6शमया, योयारीब, यदया, 7सल्लू, आमोक, हिल्कीया व यदया; हे येशूवाच्या काळात याजकांतले व त्यांच्या बांधवांतले मुख्य होते.
8लेवी : येशूवा, बिन्नुई, कदमीएल, शेरेब्या, यहूदा, मत्तन्या व त्याचे भाऊबंद स्तुतिगायनाच्या कामावर होते;
9आणि त्यांचे भाऊबंद बकबुक्या व उन्नो त्यांच्याबरोबर पहार्‍यावर होते.
10येशूवाला योयाकीम झाला, योयाकीमाला एल्याशीब झाला, एल्याशीबाला योयादा झाला,
11योयादाला योनाथान झाला, व योनाथानाला यद्दूवा झाला.
12योयाकीमाच्या दिवसांत याजक पितृकुळातले मुख्य होते, ते हे : सरायापासून मराया, यिर्मयापासून हनन्या,
13एज्रापासून मशुल्लाम, अमर्‍यापासून यहोहानान,
14मल्लूखीपासून योनाथान, शबन्यापासून योसेफ,
15हारीमापासून अदना, मरायोथापासून हेलकइ,
16इद्दोपासून जखर्‍या, गिन्नथोनापासून मशुल्लाम,
17अबीयापासून जिख्री, मिन्यामिनापासून, मोवद्या-पासून पिल्तय,
18बिल्गापासून शम्मूवा, शमयापासून यहोनाथान,
19योयारीबापासून मत्तनई, यदयापासून उज्जी,
20सल्लाइपासून कल्लय, आमोकापासून एबेर,
21हिज्कीयापासून हशब्या व यदायापासून नथनेल.
22एल्याशीब, योयादा, योहानान व यद्दूवा ह्यांच्या काळात लेवी आणि दारयावेश पारसाच्या कारकिर्दीतले याजक हे त्यांच्या पितृकुळाचे मुख्य होते.
23लेव्यांचे वंशज, आपापल्या पितृकुळांचे मुख्य, इतिहासाच्या पुस्तकात, एल्याशिबाचा पुत्र योहानान ह्याच्या काळापर्यंत नमूद केले होते;
24आणि लेव्यांतले मुख्य हशब्या, शेरेब्या व कदमीएलाचा पुत्र येशूवा व त्यांच्यासमोर त्यांचे भाऊबंद असे गटागटाने देवाचा मनुष्य दावीद ह्याच्या आज्ञेप्रमाणे स्तवन व ईशोपकारस्मरण करायला होते.
25मत्तन्या, बकबुक्या, ओबद्या, मशुल्लाम, तल्मोन व अक्कूब हे द्वारपाळ वेशींवरील कोठ्यांचे रक्षण करीत असत;
26हे योयाकीम बिन येशूवा बिन योसादाक ह्याच्या दिवसांत व नहेम्या प्रांताधिकारी व लेखक एज्रा याजक ह्यांच्या दिवसांत होते.
कोटाचे समर्पण
27यरुशलेमेच्या कोटाच्या समर्पणाच्या वेळी लेव्यांनी आनंद व धन्यवाद करून झांजा, सारंग्या व वीणा वाजवून आणि गाऊन तो प्रसंग साजरा करावा म्हणून त्यांना यरुशलेमेत पोचवण्यासाठी त्यांच्या-त्यांच्या स्थानांतून शोधून काढले.
28यरुशलेमेच्या चोहोकडल्या प्रांतांतून नटोफाथीच्या खेड्यापाड्यांतून,
29बेथ-गिलगाल येथून आणि गेबा व अजमावेथ येथल्या शेतवाडीतून गायकांचे वंशज एकत्र झाले; त्यांनी यरुशलेमेच्या आसपास खेडी वसवली होती.
30मग याजक व लेवी ह्यांनी स्वतःस शुद्ध करून लोकांची, वेशींची व कोटाची शुद्धी केली.
31मी यहूदाच्या सरदारांना कोटावर चढवले आणि त्यांच्या दोन टोळ्या केल्या; त्या स्तोत्रे गात मिरवत चालल्या; त्यांची एक टोळी दक्षिण दिशेने म्हणजे उकिरडावेशीकडे चालली;
32आणि तिच्यामागून होशया, यहूदाचे अर्धे अधिकारी,
33अजर्‍या, एज्रा, मशुल्लाम,
34यहूदा बन्यामीन, शमया, यिर्मया,
35व कित्येक याजकांचे पुत्र कर्णे घेऊन चालले; जखर्‍या बिन योनाथान बिन शमया बिन मत्तन्या बिन मीखाया बिन जक्कूर बिन आसाफ,
36आणि त्याचे भाऊबंद शमया, अजरेल, मिललई, गिललई, माई, नथनेल, यहूदा व हनानी हे देवाचा मनुष्य दावीद ह्याची वाद्ये घेऊन चालले आणि त्यांच्यापुढे एज्रा शास्त्री चालला;
37ते झरावेशीकडून नीट दावीदपुराच्या पायर्‍यांवरून कोटाच्या चढणीवर दाविदाच्या मंदिराच्या वरल्या भागाकडून पूर्वेस पाणीवेशीपर्यंत गेले.
38स्तोत्रे म्हणणारी व मिरवत जाणारी दुसरी टोळी त्यांना येऊन मिळण्यास पुढे चालली, आणि तिच्यामागून मी व अर्धे लोक कोटावरील भट्टीबुरुजावरून रुंद कोटापर्यंत,
39आणि एफ्राईम वेशीपासून जुन्या वेशीवरून मत्स्यवेस, हनानेल बुरूज व हमया बुरूज ह्यांवरून मेंढेवेशीपर्यंत गेलो; गारद्यांच्या वेशीत ते जाऊन उभे राहिले.
40अशा प्रकारे स्तोत्रे म्हणणार्‍या दोन्ही टोळ्या देवाच्या मंदिरात उभ्या राहिल्या; मी व माझ्याबरोबर अर्धे अधिपतीही उभे राहिले;
41याजक एल्याकीम, मासेया, मिन्यामीन, मीखाया, एल्योवेनय, जखर्‍या व हनन्या ह्यांनी कर्णे हाती घेतले;
42आणि मासेया, शमाया, एलाजार, उज्जी, यहोहानान, मल्खीया, एलाम व एजेर ह्यांनीही कर्णे हाती घेतले; गायकांनी उंच स्वराने गाइले; यिज्रह्या त्यांचा अध्यक्ष होता.
43त्या दिवशी लोकांनी मोठे यज्ञ करून आनंद केला, कारण त्यांनी आनंदीआनंद करावा असे देवाने केले होते; बायकामुलांनीही आनंद केला; यरुशलेमेचा आनंदध्वनी दूर जाऊन पोहचला.
याजक व लेवी ह्यांच्यासाठी तरतूद
44याजक व लेवी ह्यांचे ठरलेले वाटे नगरोनगरीच्या शेतांप्रमाणे गोळा करावेत म्हणून त्या दिवशी भांडारे, परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित अंश, प्रथमफळे व दशमांश ह्यांच्या कोठड्यांवर लोक नेमण्यात आले; कारण याजक व लेवी हे हजर राहिल्याकारणाने यहूदास आनंद झाला होता.
45दाविदाच्या व त्याचा पुत्र शलमोन ह्याच्या आज्ञेप्रमाणे ते आपल्या देवाच्या मंदिराचे व शुद्धीकरणाचे काम करीत; तसेच गायक व द्वारपाळ हेही करीत.
46प्राचीन काळी म्हणजे दावीद व आसाफ ह्यांच्या दिवसांत एक मुख्य गायक व देवाची स्तुतिस्तोत्रे ह्यांची योजना केली होती.
47जरूब्बाबेल व नहेम्या ह्यांच्या दिवसांत सर्व इस्राएल लोक गायकांना व द्वारपाळांना दर दिवसाचा शिधा देत असत; ते लेव्यांचे वाटे काढून ठेवत आणि लेवी अहरोनाच्या वंशजांचे वाटे काढून ठेवत.

सध्या निवडलेले:

नहेम्या 12: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन