YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 11

11
यरुशलेमेतील रहिवासी
(१ इति. 9:1-34)
1लोकांचे अधिपती यरुशलेमेत राहत असत; वरकड लोकांपैकी दहांतल्या एकाने पवित्र नगर यरुशलेम येथे राहावे आणि नऊ जणांनी इतर नगरांत वस्ती करावी हे ठरवण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.
2जे स्वसंतोषाने यरुशलेमेत राहण्यास कबूल झाले त्या सर्वांना लोकांनी धन्य म्हटले.
3यरुशलेमेत राहणारे प्रांतांचे प्रमुख हेच होत; पण इस्राएल लोक, याजक, लेवी, नथीनीम व शलमोनाच्या सेवकांचे वंशज यरुशलेमेत व यहूदातील आपापल्या नगरांत व वतनांत राहत होते.
4यरुशलेमेत काही यहूदी व काही बन्यामिनी राहत होते. यहूदाचे वंशज हे : पेरेसाच्या संततीपैकी अथाया बिन उज्जीया बिन जखर्‍या बिन अमर्‍या बिन शफाट्या बिन महललेल;
5मासेया, बिन बारूख बिन कोल-होजे बिन हजाया बिन अदाया बिन योयारीब बिन जखर्‍या बिन शिलोनी.
6पेरेसाचे जे वंशज यरुशलेमेत राहत होते ते सर्व चारशे अडुसष्ट वीर पुरुष होते.
7तसेच बन्यामिनाचे वंशज : सल्लू बिन मशुल्लाम बिन योएद बिन पदाया बिन कोलाया बिन मासेया बिन इथीएल बिन यशाया 8आणि त्याच्यामागून गब्बई व सल्लाइ ह्यांचे वंशज नऊशे अठ्ठावीस होते.
9ह्यांचा अधिकारी जिख्रीचा पुत्र योएल होता, आणि हसनूवाचा पुत्र यहूदा नगराचा दुय्यम अधिकारी होता.
10याजकांतले : यदया बिन योयारीब व याखीन,
11सराया बिन हिल्कीया बिन मशुल्लाम बिन सादोक बिन मरायोथ बिन अहीटूब हा देवमंदिराचा अधिकारी होता;
12आणि त्यांचे जे भाऊबंद मंदिरातले काम करीत ते आठशे बावीस होते; अदाया बिन यहोराम बिन पलल्या बिन अस्सी बिन जखर्‍या बिन पश्हूर बिन मल्कीया;
13आणि त्याचे भाऊबंद पितृकुळांचे प्रमुख दोनशे बेचाळीस आणि अमशसइ बिन अजरेल बिन अहजई बिन मशिल्लेमोथ बिन इम्मेर;
14आणि त्यांचे भाऊबंद एकशे अठ्ठावीस बलवान वीर; आणि त्यांचा अधिकारी हगदोलीमाचा पुत्र जब्दीएल हा होता.
15आणि लेव्यांतले शमया बिन हश्शूब बिन अज्रीकाम बिन हशब्या बिन बुन्नी;
16आणि लेव्यांच्या मुख्यांपैकी शब्बथई व योजाबाद हे देवाच्या मंदिराच्या बाहेरच्या कामावर होते;
17आणि प्रार्थनेच्या वेळी ईशोपकारस्मरण आरंभण्याच्या कामी मत्तन्या बिन मीखा बिन जब्दी बिन आसाफ हा मुख्य होता व बकबुक्या आपल्या भाऊबंदातला दुसरा होता; आणि अब्दा बिन शम्मूवा बिन गालाल बिन यदूथून हाही होता.
18पवित्र नगरातले सर्व लेवी दोनशे चौर्‍याऐंशी होते.
19द्वारपाळ अक्कूब व तल्मोन आणि दरवाजे राखणारे त्यांचे भाऊबंद एकशे बहात्तर होते.
20वरकड इस्राएल लोक, याजक व लेवी यहूदाच्या सर्व नगरांत आपापल्या वतनात होते;
21पण नथीनीम ओफेलात राहत; सीहा व गिश्पा हे नथीनीमांवर नेमले होते.
22उज्जी बिन बानी बिन हशब्या बिन मत्तन्या बिन मीखा हा यरुशलेमेतल्या लेव्यांचा अधिकारी होता; आसाफाच्या वंशातले जे गाणारे ते देवाच्या मंदिरातील कामावर होते;
23कारण त्यांच्यासंबंधाने राजाची आज्ञा होती व रोजच्या जरुरीप्रमाणे गाणार्‍यांची व्यवस्था ठरली होती.
24यहूदाचा पुत्र जेरह ह्याच्या वंशजांतला मशेजबेल ह्याचा पुत्र पथह्या लोकांसंबधांच्या सर्व गोष्टींच्या बाबतीत राजाच्या हाताशी होता.
यरुशलेमेबाहेरची वसाहत
25खेडीपाडी व त्यांच्या शेतवाड्या ह्यांविषयी यहूदाच्या वंशातल्या कित्येकांनी किर्याथ-आर्बात व त्याच्या खेड्यांत, दिबोनात व त्याच्या खेड्यांत आणि यकब्सेलात व त्याच्या खेड्यांत
26येशूवात, मोलादात व बेथ-पलेतात,
27हसर-शूवालात, बैर-शेब्यात व त्याच्या खेड्यांत,
28सिकलागात, मकोनात व त्याच्या खेड्यांत
29एन्-रिम्मोनात, सारयात, यर्मूथात,
30जानोहात, अदुल्लामात व त्याच्या खेड्यांत, लाखीशात व त्याच्या शेतवाड्यांत, अजेकात व त्याच्या खेड्यांत वस्ती केली. त्यांनी बैर-शेबापासून हिन्नोमाच्या खोर्‍यापर्यंत वस्ती केली.
31गेबातले बन्यामिनाचे वंश मिखमाशात व अयात, बेथेलात व त्याच्या खेड्यांत,
32अनाथोथात, नोबात, अनन्यात,
33हासोरात, रामात, गित्तइमात,
34हादीदात, सबोइमात, नबल्लाटात,
35लोदात व कारागिरांच्या खोर्‍यातल्या ओनात राहू लागले.
36लेव्यांपैकी यहूदातले काही वर्ग बन्यामिनाकडे होते.

सध्या निवडलेले:

नहेम्या 11: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन