नहेम्या 12
12
याजक व लेवी यांची यादी
1शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल व येशूआसह आलेल्या याजकांची व लेव्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे:
सेरायाह, यिर्मयाह, एज्रा,
2अमर्याह, मल्लूख, हट्टूश,
3शखन्याह, रहूम, मरेमोथ,
4इद्दो, गिन्नथोई, अबीया,
5मियामीन, मादियाह, बिल्गाह,
6शमायाह, योयारीब, यदायाह,
7सल्लू, आमोक, हिल्कियाह व यदायाह.
हे येशूआच्या काळी असलेले याजक व त्यांचे सहकारी.
8लेवी हे होते, येशूआ, बिन्नुई, कदमीएल, शेरेब्याह, यहूदाह, मत्तन्याह व त्याचे सहकारी उपकारस्तुतीच्या उपासनेसाठी जबाबदार होते. 9बकबुकियाह व उन्नी यांचे सहकारी उपासनेच्या वेळी त्यांच्यासमोर उभे राहत असत.
10येशूआ योयाकिमाचा पिता होता;
योयाकीम एल्याशीबाचा पिता होता;
एल्याशीब यहोयादाचा पिता होता;
11यहोयादा योनाथानाचा पिता होता;
योनाथान यद्दूआचा पिता होता.
12मुख्य याजक योयाकीमच्या कार्यकालात, हे याजकांचे कुलप्रमुख होते.
मरायाह, सेरायाह कुळाचा प्रमुख;
हनन्याह, यिर्मयाह कुळाचा प्रमुख;
13मशुल्लाम, एज्रा कुळाचा प्रमुख;
यहोहानान, अमर्याह कुळाचा प्रमुख;
14योनाथान, मल्लूखी कुळाचा प्रमुख;
योसेफ, शबन्याह कुळाचा प्रमुख;
15अदना, हारीम कुळाचा प्रमुख;
हेलकइ, मरायोथ कुळाचा प्रमुख;
16जखर्याह, इद्दो कुळाचा प्रमुख;
मशुल्लाम, गिन्नथोन कुळाचा प्रमुख;
17जिक्री, अबीया कुळाचा प्रमुख;
पिल्तय, मोवद्याह व मिन्यामीन कुळाचा प्रमुख;
18शम्मुवा, बिल्गाह कुळाचा प्रमुख;
योनाथान, शमायाह कुळाचा प्रमुख;
19मत्तनई, योयारीब कुळाचा प्रमुख;
उज्जी, यदायाह कुळाचा प्रमुख;
20कल्लय, सल्लू कुळाचा प्रमुख;
एबर, आमोक कुळाचा प्रमुख;
21हशब्याह, हिल्कियाह कुळाचा प्रमुख;
नथानेल, यदायाह कुळाचा प्रमुख.
22एल्याशीबाच्या कार्यकालात सर्व लेवीचे कुलप्रमुख यहोयादा, योहानान व यद्दूआ होते, पर्शियाचा राजा दारयावेशच्या कारकिर्दीत याजक व लेवीच्या वंशावळी तयार करण्यात आल्या होत्या. 23इतिहासाच्या पुस्तकामध्ये एल्याशीबाचा पुत्र योहानानच्या काळापर्यंत लेवींच्या वंशजांची नावे नमूद केली होती. 24त्यावेळी लेवीचे कुलप्रमुख—हशब्याह, शेरेब्याह, व कदमीएलचा पुत्र येशूआ व त्यांचे सहकारी. परमेश्वराचा मनुष्य दावीदच्या आज्ञेप्रमाणे मंदिरात स्तवन व उपकारस्मरणाच्या वेळी त्यांचे कुलबांधव समोरासमोर उभे राहून एकमेकांना प्रतिसाद देत असत.
25मत्तन्याह, बकबुकियाह, ओबद्याह, मशुल्लाम, तल्मोन व अक्कूब हे द्वारपाल दरवाजांजवळ असलेल्या कोठारांचे संरक्षण करीत होते. 26योसादाकाचा पुत्र येशूआचा पुत्र योयाकीमच्या कार्यकालात म्हणजे जेव्हा नहेम्याह राज्यपाल होता व एज्रा याजक व नियमाचा शिक्षक होता, तेव्हा हे कामावर होते.
यरुशलेमच्या तटाचे समर्पण
27यरुशलेमच्या नवीन तटाच्या समर्पणविधीमध्ये भाग घेण्यासाठी देशातील सर्वच लेवी जिथे कुठे असतील तिथून शोधून यरुशलेम येथे पाचारण करण्यात आले, जेणेकरून या विधीमध्ये त्यांनी भाग घेऊन साह्य करावे, झांजा, सारंग्या, वीणा यांच्या संगीतासह गीते गाऊन उपकारस्तुती करावी आणि हा आनंदोत्सवाचा सोहळा साजरा करावा. 28संगीतकारांनाही यरुशलेम सभोवतालच्या प्रदेशातून व नटोफाथी प्रांतातून आणले. 29बेथ-गिलगाल, गेबाच्या प्रांतातून व अजमावेथ येथूनही हे संगीतकार आले, कारण त्यांनी यरुशलेमच्या सभोवती आपली उपनगरे बांधली होती. 30प्रथम याजक व लेवींनी स्वतःला शुद्ध करून घेतले. नंतर त्यांनी लोकांना, तटाला आणि वेशींना शुद्ध केले.
31मी यहूदाह पुढार्यांना तटावर नेले. धन्यवाद देण्याकरिता त्यांचे दोन मोठे गायकवृंद तयार केले. स्तुतिस्तोत्रे गात त्या रांगा एकमेकींच्या विरुद्ध दिशेने चालल्या. एक गायकवृंद तटाच्या वर उजवीकडे म्हणजे उकिरडा वेशीकडे चालली. 32होशयाह व यहूदाहच्या पुढार्यांपैकी अर्धे त्यांच्या मागोमाग चालले. 33अजर्याह सोबत, एज्रा, मशुल्लाम, 34यहूदाह, बिन्यामीन, शमायाह व यिर्मयाह यांचा त्यात समावेश होता. 35तसेच काही याजकांनी कर्णे वाजविले आणि जखर्याह, योनाथानाचा पुत्र, तो शमायाहचा पुत्र, तो मत्तन्याहचा पुत्र, तो मिखायाहचा पुत्र, तो जक्कूराचा पुत्र, तो आसाफाचा पुत्र होता, 36त्याचे सहकारी—शमायाह, अजरएल, मिललई, गिललई, माई, नथानेल, यहूदाह व हनानी—यांनी परमेश्वराचा मनुष्य दावीदाने नेमून दिलेली वाद्ये वापरली. एज्रा शास्त्राचा शिक्षक त्यांच्या अग्रभागी चालला होता. 37ते झरावेशीजवळ आले, तेव्हा ते सरळ पुढे गेले व दावीदाच्या नगराच्या पायर्यांवरून तटाच्या चढणीवर असलेल्या दावीदाच्या महालाच्या वरच्या भागाकडून पूर्वेकडे पाणीवेशीपर्यंत गेले.
38स्तुतिगान करणारे दुसरे गायकवृंद विरुद्ध दिशेने पुढे निघाले. मी वरच्या बाजूने त्यांच्यात सामील होण्यास दुसऱ्या अर्ध्या लोकांबरोबर निघालो—आम्ही भट्टीबुरुजापासून रुंद तटापर्यंत चालत गेलो. 39नंतर एफ्राईम वेशीपासून येशनाह वेस, मत्स्य वेस आणि हनानेल मनोरा पार करून शंभराचा बुरूजावरून आम्ही मेंढेवेशीपर्यंत गेलो आणि तिथून पुढे द्वारपालाच्या वेशीजवळ जाऊन थांबलो.
40नंतर धन्यवाद देणारे दोन्ही गायकवृंद परमेश्वराच्या भवनात जाऊन त्यांनी आणि अर्ध्या अधिकाऱ्यांसह मी देखील आपले नेमलेले स्थान ग्रहण केले. 41तसेच कर्णे वाजविणारे याजक—एल्याकीम, मासेयाह, मिन्यामीन, मिखायाह, एलिओएनाइ, जखर्याह, आणि हनन्याह. 42व मासेयाह, शमायाह, एलअज़ार, उज्जी, यहोहानान, मल्कीयाह, एलाम व एजेर यांनीही यझ्रहयाहच्या मार्गदर्शनाखाली गायकवृंदाने गाईले. 43या आनंदाच्या दिवशी अनेक मोठमोठी अर्पणे करण्यात आणली, कारण परमेश्वराने त्यांना फार मोठा हर्ष दिला होता. स्त्रिया व मुलांनी देखील आनंद व्यक्त केला. यरुशलेममधील लोकांच्या आनंदाचे निनाद दूरवर ऐकू आले.
44त्यावेळी प्रथम हंगामाची अर्पणे व दशांश या अर्पणांच्या भांडारावर पुरुष अधिकारी नेमण्यात आले. ही सर्व अर्पणे मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे सभोवतीच्या नगरींच्या शेतांप्रमाणे अर्पणे याजक व लेवींना नेमून देण्यात आली, त्यांनी ती गोळा करून भांडारात जमा करावयाची होती. कारण यहूदीयाच्या लोकांना लेवी व याजक आणि त्यांचे सेवाकार्य यांचे कौतुक वाटत होते. 45दावीद आणि त्याचा पुत्र शलोमोनाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे परमेश्वराच्या उपासनेत आणि शुद्धीकरणविधीमध्ये गायक व द्वारपाल हे सहकार्य करीत होते. 46दावीदाच्या व आसाफाच्या काळापासून संगीतकारांसाठी संचालक नेमण्याची व परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे व उपकारस्तुती गाण्यास सुरुवात झाली होती. 47म्हणून सर्व इस्राएली जरूब्बाबेल आणि नहेम्याहच्या काळात द्वारपाल, लेवी व संगीतकारांसाठी दररोज अन्नाचा वाटा आणत असत. ते आपल्याला मिळालेल्या हिश्शातील काही भाग इतर लेव्यांसाठी ठेवीत आणि लेवी आपल्यातील वाटा अहरोनाच्या वंशजांसाठी समर्पित करीत असत.
सध्या निवडलेले:
नहेम्या 12: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.