नहेम्या 11
11
यरुशलेमचे नवे रहिवासी
1आता लोकांचे अधिकारी यरुशलेममध्ये स्थायिक झाले. बाकीच्या लोकातील दहापैकी एकाने यरुशलेम, पवित्र नगरीत येऊन राहावे म्हणून चिठ्ठ्या टाकून त्यांची निवड करण्यात आली, व उरलेल्या नऊ लोकांनी स्वतःच्या नगरात राहावे. 2यावेळी यरुशलेमला जे स्वखुशीने गेले त्यांचा लोकांनी बहुमान केला.
3यरुशलेमला येणार्या प्रांताधिकार्यांच्या नावांची यादी पुढे दिली आहे (आता काही इस्राएली, याजक, लेवी, मंदिराचे सेवक व शलोमोनच्या सेवकांचे वंशज यहूदीयाच्या नगरात स्वतःच्या वतनांतच राहिले, प्रत्येकजण निरनिराळ्या नगरातील स्वतःच्या मालकीच्या भूमीवर स्थायी झाला. 4पण यहूदाह व बिन्यामीन यांच्या गोत्रातील इतर सर्व यरुशलेमात राहिले):
यहूदीयाच्या गोत्रातील:
अथायाह, हा उज्जीयाहचा पुत्र, तो जखर्याहचा पुत्र, तो अमर्याहचा पुत्र, तो शफाट्याहचा पुत्र, तो महलालेलाचा पुत्र, तो पेरेसाचा वंशज होता;
5मासेयाह, हा बारूखाचा पुत्र, तो कोल-होजेचा पुत्र, तो हजायाहचा पुत्र, तो अदायाहचा पुत्र, तो योयारीबचा पुत्र, तो जखर्याहचा पुत्र व तो शिलोनी वंशज होता.
6पेरेसाचे जे वंशज यरुशलेममध्ये राहत होते ते सर्व 468 वीरपुरुष होते.
7बिन्यामीनच्या गोत्रातील:
सल्लू, हा मशुल्लामाचा पुत्र, तो योएदाचा पुत्र, तो पदायाहचा पुत्र, तो कोलायाहचा पुत्र, तो मासेयाहचा पुत्र, तो इथिएलाचा पुत्र, तो यशायाहचा पुत्र होता. 8आणि त्याला अनुसरणारे, गब्बई व सल्लाइ 928 पुरुष.
9जिक्रीचा पुत्र योएल व हस्सनूआहाचा पुत्र यहूदाह हे शहराच्या नव्या भागावर त्यांचे प्रमुख होते.
10याजकांपैकी:
यदायाह, हा योयारीबाचा पुत्र होता; याखीन;
11सेरायाह, हा हिल्कियाहचा पुत्र, तो मशुल्लामाचा पुत्र, तो सादोकाचा पुत्र, तो मरायोथाचा पुत्र, जो अहीतूबाचा पुत्र होता. अहीतूब हा परमेश्वराच्या भवनाचा अधिकृत अधिकारी होता. 12आणि त्यांचे मदतनीस, जे मंदिराची सेवा करीत 822 पुरुष या पुढार्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असत.
अदायाह, हा यरोहामाचा पुत्र, तो पलल्याहचा पुत्र, तो मशुल्लामाचा पुत्र, तो अमसीचा पुत्र, तो जखर्याहचा पुत्र, तो पशहूराचा पुत्र, जो मल्कीयाहचा पुत्र, 13आणि त्याचे सहकारी, जे कुटुंबप्रमुख होते ते 242 पुरुष;
अमश्सइ, अजरएलाचा पुत्र, तो अहजईचा पुत्र, तो मेशिल्लेमोथाचा पुत्र, जो इम्मेराचा पुत्र होता. 14आणि त्याचे सहकारी, जे वीरपुरुष होते 128.
जब्दीएल, हगदोलीमाचा पुत्र हा मुख्य प्रधान होता.
15लेवी गोत्रातील:
शमायाह, हा हश्शूबचा पुत्र, तो अज्रीकामचा पुत्र, तो हशब्याहाचा पुत्र, जो बुन्नीचा पुत्र होता;
16शब्बथई व योजाबाद हे दोघे लेव्यांचे प्रमुख परमेश्वराच्या भवनाचा बाहेरील कामाचे अधिकारी होते;
17मत्तन्याह, हा मीखाहचा पुत्र, तो जब्दीचा पुत्र, जो आसाफाचा पुत्र, तो उपकारस्तुतीत व प्रार्थनेत नेतृत्व करणारा प्रमुख होता;
बकबुकियाह, त्याच्या सहकाऱ्यातील दुसरा;
आणि अब्दा, हा शम्मुवाचा पुत्र, तो गालालचा पुत्र, जो यदूथूनाचा पुत्र होता.
18पवित्र शहरामधील सर्व लेवी एकूण 284.
19द्वारपाल:
अक्कूब, तल्मोन व त्यांचे सहकारी, जे वेशींवर निगराणी ठेवीत ते 172 पुरुष.
20राहिलेले इस्राएली, याजक व लेवीसह यहूदीयाच्या सर्व नगरात, आपआपल्या घराण्यांची वतने जिथे होती, तिथे राहत असत.
21तरी मंदिराची सेवा करणारे, ज्यांचे पुढारी झीहा व गिश्पा होते, ते सर्वजण ओफेल येथे राहत.
22यरुशलेमच्या लेव्यांवर व परमेश्वराच्या भवनात सेवेकर्यांचा प्रमुख अधिकारी उज्जी, हा बानीचा पुत्र, तो हशब्याहाचा पुत्र, तो मत्तन्याहचा पुत्र, जो मीखाहचा पुत्र होता. उज्जी, हा आसाफाचा वंशज होता. त्याचे कूळ परमेश्वराच्या भवनातील संगीतकार म्हणून सेवा करीत होते. 23राजाने संगीतकार म्हणून त्यांची नेमणूक केली होती व त्यांचे दररोजचे कार्य निर्धारित केले होते.
24पथह्याह, तो मशेजबेलचा पुत्र, तो जेरहाचा वंशज, जो यहूदाहचा पुत्र होता, हा लोकसेवेच्या कामी राजाचा प्रतिनिधी होता.
25यहूदीयाचे लोक राहत असलेली काही गावे व शेती होती, काही लोक किर्याथ-अर्बा व त्यांच्या आसपासच्या वस्त्या, दिबोन व त्यांच्या आसपासच्या वस्त्या, यकब्सेल आणि त्यांच्या आसपासची गावे: 26येशूआ, मोलादाह, बेथ-पेलेट, 27हसर-शुआल, बेअर-शेबा, आणि त्यांची आसपासची गावे, 28सिकलाग, मकोनाह व त्यांची आसपासची गावे. 29एन-रिम्मोन, सोराह, यर्मूथ, 30जानोह, अदुल्लाम, आणि त्यांच्या आसपासची गावे, लाखीश व त्यांची जवळपासची शेते; अजेकाह, त्यांची गावे; लोकांनी बेअर-शेबापासून हिन्नोमाच्या खोर्यापर्यंत वस्ती केली.
31बिन्यामीन वंशातील लोक खालील ठिकाणी राहत होते: गेबा, मिकमाश, अय्याह, बेथेल, आणि त्यांच्या सभोवतालची गावे, 32अनाथोथ, नोब, अनन्याह, 33हासोर, रामाह, गित्ताइम, 34हादीद, सबोईम, नेबल्लाट, 35लोद व ओनो व गे-हाराशीम.
36यहूदीयामध्ये राहणारे काही लेवी बिन्यामीन गोत्राच्या लोकांबरोबर राहण्यासाठी गेले.
सध्या निवडलेले:
नहेम्या 11: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.