शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल व येशूआसह आलेल्या याजकांची व लेव्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे:
सेरायाह, यिर्मयाह, एज्रा,
अमर्याह, मल्लूख, हट्टूश,
शखन्याह, रहूम, मरेमोथ,
इद्दो, गिन्नथोई, अबीया,
मियामीन, मादियाह, बिल्गाह,
शमायाह, योयारीब, यदायाह,
सल्लू, आमोक, हिल्कियाह व यदायाह.
हे येशूआच्या काळी असलेले याजक व त्यांचे सहकारी.
लेवी हे होते, येशूआ, बिन्नुई, कदमीएल, शेरेब्याह, यहूदाह, मत्तन्याह व त्याचे सहकारी उपकारस्तुतीच्या उपासनेसाठी जबाबदार होते. बकबुकियाह व उन्नी यांचे सहकारी उपासनेच्या वेळी त्यांच्यासमोर उभे राहत असत.
येशूआ योयाकिमाचा पिता होता;
योयाकीम एल्याशीबाचा पिता होता;
एल्याशीब यहोयादाचा पिता होता;
यहोयादा योनाथानाचा पिता होता;
योनाथान यद्दूआचा पिता होता.
मुख्य याजक योयाकीमच्या कार्यकालात, हे याजकांचे कुलप्रमुख होते.
मरायाह, सेरायाह कुळाचा प्रमुख;
हनन्याह, यिर्मयाह कुळाचा प्रमुख;
मशुल्लाम, एज्रा कुळाचा प्रमुख;
यहोहानान, अमर्याह कुळाचा प्रमुख;
योनाथान, मल्लूखी कुळाचा प्रमुख;
योसेफ, शबन्याह कुळाचा प्रमुख;
अदना, हारीम कुळाचा प्रमुख;
हेलकइ, मरायोथ कुळाचा प्रमुख;
जखर्याह, इद्दो कुळाचा प्रमुख;
मशुल्लाम, गिन्नथोन कुळाचा प्रमुख;
जिक्री, अबीया कुळाचा प्रमुख;
पिल्तय, मोवद्याह व मिन्यामीन कुळाचा प्रमुख;
शम्मुवा, बिल्गाह कुळाचा प्रमुख;
योनाथान, शमायाह कुळाचा प्रमुख;
मत्तनई, योयारीब कुळाचा प्रमुख;
उज्जी, यदायाह कुळाचा प्रमुख;
कल्लय, सल्लू कुळाचा प्रमुख;
एबर, आमोक कुळाचा प्रमुख;
हशब्याह, हिल्कियाह कुळाचा प्रमुख;
नथानेल, यदायाह कुळाचा प्रमुख.
एल्याशीबाच्या कार्यकालात सर्व लेवीचे कुलप्रमुख यहोयादा, योहानान व यद्दूआ होते, पर्शियाचा राजा दारयावेशच्या कारकिर्दीत याजक व लेवीच्या वंशावळी तयार करण्यात आल्या होत्या. इतिहासाच्या पुस्तकामध्ये एल्याशीबाचा पुत्र योहानानच्या काळापर्यंत लेवींच्या वंशजांची नावे नमूद केली होती. त्यावेळी लेवीचे कुलप्रमुख—हशब्याह, शेरेब्याह, व कदमीएलचा पुत्र येशूआ व त्यांचे सहकारी. परमेश्वराचा मनुष्य दावीदच्या आज्ञेप्रमाणे मंदिरात स्तवन व उपकारस्मरणाच्या वेळी त्यांचे कुलबांधव समोरासमोर उभे राहून एकमेकांना प्रतिसाद देत असत.
मत्तन्याह, बकबुकियाह, ओबद्याह, मशुल्लाम, तल्मोन व अक्कूब हे द्वारपाल दरवाजांजवळ असलेल्या कोठारांचे संरक्षण करीत होते. योसादाकाचा पुत्र येशूआचा पुत्र योयाकीमच्या कार्यकालात म्हणजे जेव्हा नहेम्याह राज्यपाल होता व एज्रा याजक व नियमाचा शिक्षक होता, तेव्हा हे कामावर होते.