YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 9:1-17

लूक 9:1-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग त्याने बारा प्रेषितांना एकत्र बोलावून त्यांना सर्व भुते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला; आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करण्यास व रोग्यांना बरे करण्यास पाठवले. त्याने त्यांना सांगितले, “वाटेसाठी काही घेऊ नका. काठी, झोळी, भाकरी किंवा पैका घेऊ नका; अंगरखेही दोन-दोन घेऊ नका. ज्या कोणत्या घरात तुम्ही जाल, तेथेच राहा व तेथूनच निघून जा. जे कोणी तुमचे स्वागत करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध साक्ष व्हावी म्हणून तुम्ही त्या गावातून निघतेवेळेस आपल्या पायांची धूळ झाडून टाका.” मग ते निघून सर्वत्र सुवार्ता सांगत व रोग बरे करत गावोगावी फिरू लागले. तेव्हा घडत असलेल्या सर्व गोष्टींविषयी मांडलिक हेरोदाने ऐकले; आणि तो मोठ्या घोटाळ्यात पडला, कारण योहान मेलेल्यातून उठला आहे असे कित्येक जण म्हणत होते; कित्येक ‘एलीया प्रकट झाला आहे’ असे म्हणत होते व कित्येक ‘प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे’ असे म्हणत होते. पण हेरोद म्हणाला, “मी योहानाचा शिरच्छेद केला, तर मग ज्याच्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो आहे, तो कोण?” म्हणून त्याला पाहण्याची तो संधी पाहत होता. नंतर प्रेषितांनी परत येऊन आपण जे जे केले होते ते ते त्याला सविस्तर सांगितले; तेव्हा तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या गावाकडे एकान्त स्थळी गेला. हे समजल्यावर लोकसमुदाय त्याच्यामागून गेले; तेव्हा त्यांचे स्वागत करून तो त्यांच्याबरोबर देवाच्या राज्याविषयी बोलत होता, आणि ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना तो बरे करत होता. दिवस उतरू लागला तेव्हा ते बारा प्रेषित जवळ येऊन त्याला म्हणाले, “लोकसमुदायाला निरोप द्या, म्हणजे ते भोवतालच्या गावांत व शेतामळ्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहोत.” पण तो त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते म्हणाले, “आम्ही जाऊन ह्या लोकांसाठी अन्न विकत आणले नाही तर पाच भाकरी व दोन मासे एवढ्याशिवाय आमच्याजवळ काही नाही.” कारण ते सुमारे पाच हजार पुरुष होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “सुमारे पन्नास-पन्नास जणांच्या पंक्ती करून त्यांना बसवा.” त्यांनी त्याप्रमाणे करून सर्वांना बसवले. तेव्हा त्याने त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिले. तेव्हा सर्व जण जेवून तृप्त झाले, आणि उरलेले बारा टोपल्या तुकडे त्यांनी उचलून घेतले.

सामायिक करा
लूक 9 वाचा

लूक 9:1-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग त्याने त्या बारा शिष्यांस एकत्र बोलावून त्यांना सर्व भूतांवर आणि रोग बरे करायला, सामर्थ्य व अधिकार दिला, आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याविषयीचा संदेश जाहीर करायला व रोग्यांना बरे करायला पाठवले. तो त्यांना म्हणाला, “वाटेसाठी काही घेऊ नका; काठी किंवा झोळी किंवा भाकर किंवा पैसा घेऊ नका आणि दोन दोन अंगरखेही घेवू नका. आणि ज्या कोणत्याही घरात तुम्ही जाल, तेथेच राहा व तेथूनच निघून जा. जितके तुम्हास अंगीकारीत नाहीत तितक्यांच्याविरुद्ध साक्ष व्हावी म्हणून तुम्ही त्या नगरातून निघते वेळी आपल्या पायांची धूळ झाडून टाका.” तेव्हा ते निघाले आणि सर्व ठिकाणी सुवार्ता सांगत व रोग बरे करीत गांवोगांवी फिरत गेले. घडत असलेल्या सर्व गोष्टी ऐकून हेरोद राजा फार घोटाळ्यात पडला, कारण “योहान मरण पावलेल्यांमधून उठला आहे.” असे कित्येक म्हणत होते; आणि कित्येक म्हणत होते की “एलीया प्रकट झाला आहे” आणि दुसरे म्हणत होते की “पुरातन संदेष्ट्यातील कोणीएक उठला आहे.” तेव्हा हेरोद म्हणाला, “योहानाचे शीर मी तोडले, पण ज्याच्याविषयी अशा गोष्टी मी ऐकतो तो हा कोण आहे?” आणि तो त्यास भेटायला पाहत होता. मग प्रेषितांनी परत येऊन आपण जे काही केले होते ते त्यास सविस्तर सांगितले. मग तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या नगराकडे एकीकडे गेला. परंतु याविषयी लोकांनी ऐकल्यावर ते त्याच्यामागे गेले. तेव्हा तो त्यांचे स्वागत करून त्यांच्याशी देवाच्या राज्याविषयी बोलू लागला आणि ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना त्याने बरे केले. दिवस संपत आला, तेव्हा बारा जण जवळ येऊन त्यास म्हणाले, “समुदायाला निरोप दे, म्हणजे ते आसपासच्या गावांत व खेड्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहो.” पण तो त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते म्हणाले, “आम्ही जाऊन या लोकांसाठी अन्न विकत आणले नाही, तर पाच भाकरी व दोन मासे एवढ्याशिवाय आम्हाजवळ काही नाही.” कारण ते सुमारे पाच हजार पुरूष होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “पन्नास पन्नास जणांच्या पंक्ती करून त्यास बसवा,” मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे करून सर्वांस बसवले. त्याने त्या पांच भाकरी व ते दोन मासे घेतले आणि वर स्वर्गाकडे पाहून त्यास आशीर्वाद दिला आणि त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिले. तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले; आणि त्यांनी मोडलेल्या तुकड्यांतले उरले ते बारा टोपल्या भरून त्यांनी उचलून घेतले.

सामायिक करा
लूक 9 वाचा

लूक 9:1-17 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जेव्हा येशूंनी त्यांच्या बारा जणांना एकत्र बोलावले, तेव्हा त्यांना अशुद्ध आत्म्यांना घालवून देण्याचा व प्रत्येक रोग व दुःखणी बरे करण्याचा अधिकार दिला. नंतर त्यांनी आपल्या बारा शिष्यांना परमेश्वराच्या राज्याची घोषणा करण्यास व आजार्‍यांना बरे करण्यास पाठविले. येशूंनी त्यांना सांगितले, “प्रवासाला जाताना बरोबर काही घेऊ नका, काठी, झोळी, अन्न किंवा पैसा, अधिक अंगरखा घेऊ नका. एखाद्या घरामध्ये प्रवेश कराल, तेव्हा ते गाव सोडेपर्यंत तेथेच राहा. जर एखाद्या गावातील लोक तुमचे स्वागत करत नाहीत, तर त्या गावातून बाहेर पडा आणि ही त्यांच्याविरुद्ध साक्ष राहील म्हणून तुमच्या पायांची धूळ तेथेच झटकून टाका.” त्याप्रमाणे शिष्य शुभवार्ता गाजवीत आणि सर्वत्र आजार्‍यांना बरे करीत गावोगाव फिरू लागले. येशूंबद्दल शासक हेरोद याने सर्वकाही ऐकले. तेव्हा तो घोटाळ्यात पडला. कारण काही लोक म्हणत होते, “हा बाप्तिस्मा करणारा योहान पुन्हा जिवंत झाला आहे.” आणखी दुसरे म्हणत होते की एलीया प्रकट झाला आहे, तर आणखी काही प्राचीन संदेष्ट्यांसारखा एक संदेष्टा मृतातून उठून उदय पावला आहे असे म्हणत होते. पण हेरोद म्हणाला, “मी तर योहानाचा शिरच्छेद केला होता, मग हा माणूस कोण ज्याच्याबद्दल मी ऐकत आहे?” आणि तो येशूंना भेटण्याचा प्रयत्न करू लागला. नंतर प्रेषित परत आले आणि आपण काय केले याचा सर्व वृतांत त्यांनी सादर केला, येशू त्यांना घेऊन बेथसैदा या शहराकडे एकांतस्थळी निघून गेले. परंतु समुदायाला हे कळले व ते त्यांच्यामागे गेले. येशूंनी त्यांचे स्वागत केले व त्यांना परमेश्वराच्या राज्याविषयी शिक्षण दिले आणि बरे होण्याची ज्यांना गरज होती त्यांना बरे केले. दुपार टळल्यानंतर बारा शिष्य त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, “लोकांना पाठवून द्या म्हणजे ते आजूबाजूच्या खेड्यांमध्ये व गावांमध्ये जातील व आणि त्यांच्या खाण्याची व राहण्याची व्यवस्था करतील, कारण आपण येथे दूर ठिकाणी आहोत.” त्यांनी उत्तर दिले, “तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.” यावर ते म्हणाले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत—तर या सर्व लोकांस पुरेल इतके अन्न आम्ही जाऊन विकत आणले तर हे शक्य आहे” तेथे पुरुषांचीच संख्या जवळजवळ पाच हजार होती. येशू शिष्यांना म्हणाले, “जवळजवळ पन्नास लोक अशाप्रकारे गटागटाने त्यांना खाली बसू द्या.” तेव्हा शिष्यांनी त्याप्रमाणे केले आणि सर्व लोक खाली बसले. येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले आणि स्वर्गाकडे पाहून आभार मानले आणि त्या भाकरीचे तुकडे केले. नंतर त्यांनी ते शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले. ते सर्वजण जेवले आणि समाधानी झाले आणि शिष्यांनी जेवणानंतर उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या बारा टोपल्या उचलल्या.

सामायिक करा
लूक 9 वाचा

लूक 9:1-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

नंतर येशूने त्याच्या बारा प्रेषितांना एकत्र बोलावून त्यांना भुते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सर्व सामर्थ्य व अधिकार दिला. देवाच्या राज्याची घोषणा करायला व रोग्यांना बरे करायला पाठवताना त्याने त्यांना सांगितले, “वाटेसाठी काही घेऊ नका. काठी, झोळी, भाकर किंवा पैसे घेऊ नका. दोन दोन अंगरखे घेऊ नका. ज्या घरात तुम्ही जाल, तेथेच राहा. तेथून निघेपर्यंत तिथेच मुक्काम करा. जे कोणी तुमचे स्वागत करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध साक्ष म्हणून त्या नगरातून निघते वेळेस तुमच्या पायांची धूळ झटकून टाका.” ते निघून सर्वत्र शुभवर्तमान जाहीर करीत व रोग बरे करीत गावोगावी फिरू लागले. त्या वेळी घडत असलेल्या सर्व गोष्टींविषयी राज्यकर्त्या हेरोदने ऐकले आणि तो फार संभ्रमात पडला; कारण योहान मेलेल्यातून उठला आहे, असे कित्येक लोक म्हणत होते. आणखी काही लोक एलिया प्रकट झाला आहे, असे म्हणत होते व इतर काही लोक प्राचीन संदेष्ट्यांपैकी एखादा पुन्हा उठला आहे, असे म्हणत होते. हेरोद म्हणाला, “मी योहानचा शिरच्छेद केला असताना ज्याच्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो आहे, तो कोण असावा?” म्हणून त्याला भेटण्याची तो संधी शोधू लागला. प्रेषितांनी परत येऊन आपण जे जे केले होते ते ते येशूला सविस्तर सांगितले. तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या नगरात एकांत स्थळी गेला. हे समजल्यावर लोकसमुदाय त्याच्यामागून गेले. त्यांचे स्वागत करून तो त्यांच्याबरोबर देवाच्या राज्याविषयी बोलत होता. ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना तो बरे करत होता. दिवस उतरू लागला, तेव्हा बारा प्रेषित जवळ येऊन त्याला म्हणाले, “लोकांना निरोप द्या, म्हणजे ते भोवतालच्या गावांत व शेतामळ्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे निर्जन ठिकाणी आहोत.” परंतु तो त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते म्हणाले, “आम्ही जाऊन ह्या सर्व लोकांसाठी अन्न विकत आणले नाही तर पाच भाकरी व दोन मासे ह्यांव्यतिरिक्त आमच्याजवळ काही नाही.” तेथे सुमारे पाच हजार पुरुष होते. त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “सुमारे पन्नास पन्नास जणांचे गट करून त्यांना बसवा.” त्यांनी त्याप्रमाणे सर्वांना बसवले. त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून त्यांना आशीर्वाद दिला. त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिले. सर्व जण जेवून तृप्त झाले आणि शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या.

सामायिक करा
लूक 9 वाचा