YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 6:17-30

शास्ते 6:17-30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तो त्याला म्हणाला, “तुझी माझ्यावर कृपादृष्टी झाली असल्यास तूच माझ्याशी बोलत आहेस ह्याचे मला काही चिन्ह दाखव. मी आपले अर्पण आणून तुझ्यासमोर सादर करीपर्यंत कृपया येथून तू जाऊ नकोस.” तो म्हणाला, “तू परत येईपर्यंत मी येथेच थांबेन.” गिदोनाने आत जाऊन एक करडू सिद्ध केले व एफाभर सपिठाच्या बेखमीर भाकरी केल्या; त्याने मांस टोपलीत घालून आणि रस्सा पातेल्यात घालून ते एला वृक्षाखाली आणून त्याला सादर केले. तेव्हा देवाचा दूत त्याला म्हणाला, “मांस व बेखमीर भाकरी घेऊन ह्या खडकावर ठेव व त्यावर रस्सा ओत.” त्याप्रमाणे त्याने केले. मग परमेश्वराच्या दूताने आपला हात पुढे करून हातातल्या काठीच्या टोकाने त्या मांसाला व बेखमीर भाकरींना स्पर्श केला, तेव्हा खडकातून अग्नी निघाला, आणि त्याने ते मांस व त्या बेखमीर भाकरी भस्म केल्या; ह्यानंतर परमेश्वराचा दूत त्याच्यापुढून अंतर्धान पावला. हा परमेश्वराचा दूत होता हे गिदोनाच्या लक्षात आले तेव्हा तो म्हणाला, “हाय, हाय, हे प्रभू परमेश्वरा! खरोखरच परमेश्वराचा दूत मी प्रत्यक्ष पाहिला आहे.” परमेश्वर त्याला म्हणाला, “तुझे क्षेम असो; भिऊ नकोस, तू मरायचा नाहीस.” मग गिदोनाने तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधली व तिचे नाव याव्हे-शालोम (शांतिदाता परमेश्वर) असे ठेवले; अबियेजर्‍यांच्या अक्रा येथे ती आजपर्यंत आहे. त्याच रात्री परमेश्वराने गिदोनाला म्हटले, “आपल्या बापाचा गोर्‍हा म्हणजे दुसरा गोर्‍हा जो सात वर्षांचा आहे तो घे; तुझ्या बापाची बआल देवाची वेदी पाडून टाक व तिच्याजवळ असलेली अशेरा मूर्ती तोडून टाक. मग त्या खडकाच्या उच्चभागी आपला देव परमेश्वर ह्याच्यासाठी विहित केलेल्या पद्धतीप्रमाणे वेदी बांध आणि तू फोडलेल्या अशेरा मूर्तीची लाकडे तिच्यावर ठेवून त्यावर त्या दुसर्‍या गोर्‍ह्याचे हवन कर.” गिदोनाने आपल्याबरोबर आपल्या नोकरांपैकी दहा जणांना घेऊन परमेश्वराने त्याला सांगितल्याप्रमाणे केले, पण आपल्या बापाचे घराणे व नगरचे लोक ह्यांच्या भीतीने ते काम दिवसा न करता त्याने ते रात्री केले. नगरवासी मोठ्या पहाटेस उठून पाहतात तर बआल देवाची वेदी मोडून पडली आहे आणि तिच्याजवळ असलेली अशेरा मूर्ती तोडून टाकलेली आहे आणि तो दुसरा गोर्‍हा नवीन बांधलेल्या वेदीवर अर्पण केला आहे. ते एकमेकांना विचारू लागले, “हे काम कोणी केले असावे?” विचारपूस व बारीक चौकशी केल्यावर ते म्हणाले, “हे काम योवाशाचा मुलगा गिदोन ह्याचेच आहे.” मग नगरवासी योवाशाला म्हणू लागले, “तुझ्या मुलाला बाहेर आण; त्याला मारून टाकायचे आहे, कारण त्याने बआल देवाची वेदी पाडून टाकली आहे आणि तिच्याजवळची अशेरा मूर्ती तोडून टाकली आहे.”

सामायिक करा
शास्ते 6 वाचा

शास्ते 6:17-30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

गिदोन त्यास बोलला, “तुझी कृपादृष्टी माझ्यावर असली तर तूच माझ्याशी बोलत आहेस याविषयी मला काही चिन्ह दाखव. मी तुला विनंती करतो, मी तुझ्याकडे येईपर्यंत तू येथून जाऊ नको; म्हणजे मी आपली भेट आणून तुझ्यापुढे ठेवीन.” तेव्हा तो बोलला, “तू परत येईपर्यंत मी येथेच थांबतो.” गिदोनाने जाऊन एक करडू व एफाभर सपिठाच्या बेखमीर भाकरी तयार केल्या; त्याने मांस टोपलीत घातला आणि रस्सा पातेल्यात घातला, मग त्याच्याजवळ एला झाडाखाली नेऊन ते सादर केले. तेव्हा देवाच्या दूताने त्यास सांगितले, “तू मांस व बेखमीर भाकरी या खडकावर आणून ठेव, आणि त्यावर रस्सा ओत.” मग गिदोनाने तसे केले. तेव्हा परमेश्वराच्या दूताने आपल्या हातातल्या काठीच्या टोकाने मांसास व बेखमीर भाकरीला स्पर्श केला; मग खडकातून अग्नी निघाला आणि त्याने ते मांस व बेखमीर भाकरी भस्म केल्या; परमेश्वराचा दूतही निघून गेला आणि यापुढे गिदोन त्यास पाहू शकला नाही. तेव्हा गिदोनाला समजले की तो परमेश्वराचा दूत होता; गिदोन म्हणाला, हाय हाय, “हे प्रभू देवा! कारण मी परमेश्वराचा दूत समोरासमोर, पाहिला आहे!” परमेश्वर त्यास म्हणाला, “तुला शांती असो! भिऊ नको, तू मरणार नाहीस.” तेव्हा गिदोनाने तेथे परमेश्वरासाठी वेदी बांधली, त्याचे नाव परमेश्वर शांती आहे, असे ठेवले; ती आजपर्यंत अबियेजेऱ्यांच्या अफ्रा येथे अजून आहे. आणि असे झाले की, त्याच रात्री परमेश्वराने त्यास सांगितले की, “तू आपल्या पित्याचा गोऱ्हा घे आणि सात वर्षांचा दुसरा गोऱ्हा घे आणि आपल्या बापाची बआल देवासाठीची वेदी ती मोडून टाक आणि तिच्याजवळची अशेरा कापून टाक. मग या खडकाच्या उच्चस्थानी आपला देव परमेश्वर याच्यासाठी वेदी बांध आणि योग्य मार्गाने बांधणी कर. त्या दुसऱ्या गोऱ्ह्याचे होमार्पण, अशेराच्या तोडलेल्या लाकडाचा उपयोग करून कर.” तेव्हा गिदोनाने आपल्या चाकरातील दहा माणसे बरोबर घेऊन जसे परमेश्वराने त्यास सांगितले होते तसे केले; परंतु असे झाले की, दिवस असता ते करायला तो आपल्या वडिलाच्या घराण्याला व त्या नगराच्या मनुष्यांना घाबरला, यास्तव रात्री त्याने केले. मग सकाळी त्या नगराची माणसे उठली तर पाहा, बआलाची वेदी मोडलेली होती तिच्याजवळची अशेराही तोडलेली होते आणि बांधलेल्या वेदीवर दुसऱ्या गोऱ्ह्याचा होम केलेला होता. तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, “ही गोष्ट कोणी केली? मग त्यांनी विचारपूस व शोध केल्यावर म्हटले, योवाशाचा पुत्र गिदोन, याने ही गोष्ट केली आहे.” नंतर त्या नगराच्या मनुष्यांनी योवाशाला सांगितले, “तू आपल्या पुत्राला बाहेर आण, त्यास तर मारावयाचे आहे, कारण त्याने बआलाची वेदी मोडून टाकली आणखी तिच्याजवळची अशेराची मूर्ती तोडून टाकली आहे.”

सामायिक करा
शास्ते 6 वाचा

शास्ते 6:17-30 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

गिदोनाने प्रत्युत्तर दिले, “जर तुम्ही माझ्यावर संतुष्ट झाले असाल तर ते सिद्ध करण्यासाठी मला एखादे चिन्ह दाखवा. मी परत येऊन माझे अर्पण तुमच्यापुढे ठेवीपर्यंत कृपा करून जाऊ नका.” आणि याहवेह म्हणाले, “तू परत येईपर्यंत मी वाट पाहीन.” गिदोन आत गेला, त्याने एक करडू कापून कालवण तयार केले आणि पिठाच्या एक एफापासून खमीर नसलेली भाकर केली. टोपलीत मांस आणि त्याचा रस्सा एका भांड्यात ठेवून त्याने ते बाहेर आणले आणि एलाच्या वृक्षाखाली त्याला अर्पण केले. परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला, “मांस व बेखमीर भाकरी त्या तिथे असलेल्या खडकावर ठेव आणि रस्सा त्यावर ओत.” गिदोनाने सूचनांप्रमाणे केले, तेव्हा याहवेहच्या दूताने आपल्या हातातील काठीने त्या मांसास व बेखमीर भाकरीस स्पर्श केला, त्याबरोबर खडकातून अग्नी निघाला व त्या अग्नीने ते मांस व त्या भाकरी भस्म करून टाकल्या. आणि याहवेहचा तो दूत एकाएकी अंतर्धान पावला. जेव्हा गिदोनाच्या लक्षात आले की तो खरोखर याहवेहचा दूत होता, तेव्हा तो मोठ्याने म्हणाला, “अरेरे, अहो सार्वभौम याहवेह! मी तर मरणार, कारण मी याहवेहच्या दूताला समोरासमोर पाहिले आहे!” परंतु याहवेहने त्याला उत्तर दिले, “शांती असो! भिऊ नकोस. तू मरणार नाहीस.” म्हणून गिदोनाने तिथे याहवेहसाठी एक वेदी बांधली आणि तिला याहवेह शालोम, याहवेह शांती देतात असे नाव दिले. ही वेदी अद्यापही अबियेजरीकरांच्या मुलुखातील ओफराह या गावी आहे. त्याच रात्री याहवेहने त्याला म्हटले, “वडिलांच्या कळपातील उत्तम सात वर्षांचा दुसरा गोर्‍हा घे. तुझ्या पित्याची बआल दैवताची वेदी पाडून टाक आणि तिच्याजवळ असणार्‍या अशेरा देवीचा खांब तोडून टाक. नंतर या उंचवट्यावर याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी योग्य प्रकारची वेदी बांधा. तू तोडलेल्या अशेरा खांबाच्या लाकडाचा वापर करून, होमार्पण म्हणून दुसरा गोर्‍हा अर्पण कर.” यास्तव गिदोनाने आपल्या नोकरांपैकी दहा नोकर बरोबर घेतले आणि याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणे सर्वकाही केले. परंतु आपल्या पित्याच्या परिवारातील माणसांच्या व गावातील लोकांच्या भीतीने त्याने ते हवन दिवसाच्या ऐवजी रात्री केले. दुसर्‍या दिवशी पहाटेस गाव जागे होऊ लागले, तेव्हा बआल दैवताची वेदी मोडून पडलेली, तिच्याजवळच असलेला अशेराचा खांब नाहीसा झालेला, नवीन वेदी बांधलेली व तिच्यावर दुसर्‍या गोर्‍ह्याचे होमार्पण झालेले दृष्टीस पडले! ते एकमेकांना विचारू लागले, “हे कोणी केले असावे?” शोध घेतल्यावर त्यांना सांगण्यात आले, “योआशाचा पुत्र गिदोनाने ते केले होते.” योआशाला नगरवासी मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागले, “तुझ्या पुत्राला बाहेर आण; बआल दैवताच्या वेदीचा अपमान केल्याबद्दल व तिच्याजवळील अशेरामूर्ती फोडल्याबद्दल त्याने मेलेच पाहिजे.”