इब्री 11:20-40
इब्री 11:20-40 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इसहाकाने याकोबाला व एसावाला पुढे होणार्या गोष्टींविषयीसुद्धा विश्वासाने आशीर्वाद दिला. याकोबाने मरतेवेळेस योसेफाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला; आणि ‘आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाला नमन केले.’ योसेफाने मरतेवेळेस इस्राएलाच्या संतानाच्या निघून जाण्याचा उल्लेख विश्वासाने केला व आपल्या अस्थींविषयी आज्ञा केली. ‘मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला तीन महिने लपवून ठेवले,’ कारण ते मूल ‘सुंदर आहे असे त्यांनी पाहिले;’ व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही. ‘मोशे प्रौढ झाल्यावर’ त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. ‘ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे’ ही मिसर देशातील धनसंपत्तीपेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले; कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने मिसर देश सोडला; कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. त्याने ‘वल्हांडण सण’ व ‘रक्तसिंचन’ हे विधी विश्वासाने पाळले, ते अशा हेतूने की, प्रथमजन्मलेल्यांचा ‘नाश करणार्याने’ त्यांना शिवू नये. जसे कोरड्या भूमीवरून तसे ते विश्वासाने तांबड्या समुद्रातून पार गेले; मिसरी लोक तसेच करण्याचा प्रयत्न करत असता बुडून गेले. विश्वासाने यरीहोच्या गावकुसाभोवती सात दिवस फेर्या घालण्यात आल्यावर ते पडले. राहाब कसबिणीने स्नेहभावाने हेरांचा स्वीकार विश्वासाने केल्यामुळे अवज्ञा करणार्यांबरोबर तिचा नाश झाला नाही. आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल व संदेष्टे ह्यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. त्यांनी विश्वासाच्या द्वारे राज्ये जिंकली, नीतिमत्त्व आचरले, अभिवचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली, अग्नीची शक्ती नाहीशी केली; ते तलवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बळांचे सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये पळवली. स्त्रियांना त्यांची मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली. आणखी कित्येकांनी आपणांस अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून खंडणी भरून मिळणारी सुटका न स्वीकारता हालहाल सोसले. आणि इतरांना टवाळ्या, मारहाण ह्यांचा आणि बंधने व कैद ह्यांचाही अनुभव आला. त्यांना दगडमार केला, मोहपाशात टाकले, करवतीने चिरले, ते तलवारीच्या धारेने मेले; ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत; ते लाचार, पीडित, त्रासलेले असे होते; त्यांना जग योग्य नव्हते; ते अरण्यांतून, डोंगरांतून, गुहांतून व जमिनीतल्या विवरांतून भटकत राहत असत. ह्या सर्वांबाबत त्यांच्या विश्वासाविषयी चांगली साक्ष दिली असताही त्यांना अभिवचनानुसार फलप्राप्ती झाली नाही; त्यांनी आपणावाचून पूर्ण होऊ नये म्हणून देवाने जे अधिक चांगले ते आपल्यासाठी पूर्वीच नेमले होते.
इब्री 11:20-40 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
इसहाकाने, याकोबाला व एसावाला येणार्या गोष्टींविषयी विश्वासाने, आशीर्वाद दिला. याकोबाने मरतेवेळी योसेफाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने, आशीर्वाद दिला व आपल्या काठीच्या टोकावर टेकून नमन केले. विश्वासाने, योसेफाने, मरतेवेळी, इस्राएलाच्या संतानाच्या निघण्याविषयी सूचना केली व आपल्या अस्थींविषयी आज्ञा दिली. विश्वासाने, मोशे जन्मल्यावर, त्यास त्याच्या आई-वडीलांनी तीन महिने लपवून ठेवले; कारण मूल सुंदर आहे हे त्यांनी बघितले व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही. मोशेने, विश्वासाने, तो मोठा झाल्यावर फारोच्या कन्येचा मुलगा म्हणवण्याचे नाकबूल केले. पापांची क्षणिक सुखे भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे त्याने पसंत केले, आणि ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे हे मिसरातील भांडारापेक्षा मोठे धन मानले; कारण श्रमांबद्दल मिळणाऱ्या वेतनावर त्याची दृष्टी होती. विश्वासाने राजाच्या क्रोधाला न भिता त्याने मिसर देश सोडला; कारण जो अदृश्य आहे त्यास पाहत असल्याप्रमाणे तो ठाम राहिला. विश्वासाने त्याने वल्हांडण व रक्तसिंचन हे विधी पाळले, ते ह्यासाठी की, प्रथम जन्मलेल्यांना मारणार्याने त्यांना शिवू नये. विश्वासाने ते तांबड्या समुद्रामधून, कोरड्या जमिनीवरून गेल्याप्रमाणे गेले व मिसरी तसे करण्याच्या प्रयत्नात बुडून मरण पावले. विश्वासाने, त्यांनी सात दिवस, यरीहोच्या तटासभोवती फेऱ्या घातल्यावर ते तट पडले. विश्वासाने राहाब वेश्या ही अवज्ञा करणार्या इतरांबरोबर नाश पावली नाही; कारण तिने शांतीने हेरांचे स्वागत केले होते. आता मी अधिक काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन आणि इफ्ताह, तसेच दावीद व शमुवेल आणि संदेष्टे यांच्याविषयी मी सांगू लागलो तर मला वेळ अपुरा पडेल. विश्वासाने त्यांनी राज्ये जिंकली, नीतिमत्त्व आचरली, वचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली. त्यांनी अग्नीची शक्ती संपवली, तलवारीच्या धारेपासून ते निभावले, अशक्तपणात सशक्त झाले, युद्धात पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये पळवली. कित्येक स्त्रियांना त्यांचे मरण पावलेले, पुन्हा जिवंत होऊन, परत मिळाले आणि कित्येकांनी अधिक चांगले पुनरुत्थान मिळवण्यास आपली सुटका न पतकरल्यामुळे त्यांचे हाल हाल करण्यात आले. आणखी दुसर्यांनी टवाळक्यांचा व तसाच फटक्यांचा, शिवाय बेड्यांचा व बंदिवासाचा अनुभव घेतला. त्यांना दगडमार केला गेला, त्यांना करवतीने कापले, त्यांची परीक्षा केली गेली, ते तलवारीने मारले गेले आणि दुरावलेले, नाडलेले व पीडलेले होऊन ते मेंढरांची व शेरड्यांची कातडी पांघरून भटकले. जग त्यांच्यासाठी लायक नव्हते ते रानांमधून, डोंगरांमधून, गुहांमधून व जमिनीमधील खंदकामधून फिरत राहिले. या सर्वांनी विश्वासाद्वारे साक्ष मिळवली असे असता त्यांना वचन प्राप्त झाले नाही. कारण ते आपल्याशिवाय पूर्ण केले जाऊ नयेत अशी देवाच्या दृष्टीपुढे आपल्यासाठी अधिक चांगली गोष्ट होती.
इब्री 11:20-40 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
विश्वासाद्वारे इसहाकाने याकोब व एसाव या आपल्या दोन पुत्रांना त्यांच्या भावी काळासाठी आशीर्वाद दिला. याकोबानेही, तो वृद्ध झालेला व मृत्युशय्येवर असतानाही उठून व आपल्या काठीच्या टोकावर टेकून त्याने उपासना केली व विश्वासाने प्रार्थना करून योसेफाच्या दोन्ही मुलांना आशीर्वाद दिला. जेव्हा योसेफाचा शेवट जवळ आला, तेव्हा तोही विश्वासाद्वारे बोलला की परमेश्वर इस्राएली लोकांची इजिप्तमधून सुटका करतील; त्याने त्याच्या अस्थी संस्काराबद्दल सूचना दिली! विश्वासाद्वारे मोशेच्या जन्मानंतर त्याच्या आईवडिलांनीही त्याला तीन महिने लपवून ठेवले, कारण आपला पुत्र असामान्य आहे, हे पाहिल्यावर त्यांना राजाज्ञेचे भय वाटले नाही. मोशे मोठा झाल्यावर त्यानेही विश्वासाद्वारे फारोह राजाचा नातू म्हणवून घेण्यास नाकारले, व पापाची क्षणभंगुर सुखे उपभोगण्याऐवजी परमेश्वराच्या लोकांबरोबर त्यांना मिळत असलेल्या वाईट वागणुकीच्या दुःखात सहभागी होण्याचे विश्वासाने निवडले. इजिप्त देशामधील सर्व भांडाराचा मालक होण्यापेक्षा, ख्रिस्तासाठी दुःख सहन करणे अधिक चांगले, असे त्याने मानले, कारण परमेश्वराकडून मिळणार्या महान प्रतिफळाची तो वाट पाहत होता. विश्वासाद्वारे त्याने इजिप्त देश सोडला व राजाच्या क्रोधाला तो घाबरला नाही. मोशेने धीर धरला, कारण त्याने जे अदृश्य आहेत त्या परमेश्वराला पाहिले. म्हणूनच परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे त्यांनी वल्हांडण सण विश्वासाद्वारे साजरा केला आणि कोकराचे रक्त लावले, यासाठी की मृत्युदूताने इस्राएली लोकांच्या ज्येष्ठ मुलांना स्पर्श न करता निघून जावे. विश्वासाद्वारे इस्राएली लोक तांबड्या समुद्रातून कोरड्या जमिनीवरून चालत गेले. त्यांचा पाठलाग करणार्या इजिप्तच्या लोकांनी तसेच करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते सर्व बुडून मेले. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्राएली लोकांनी विश्वासाने यरीहो शहराच्या तटबंदीभोवती सात दिवस चालत फेर्या घातल्यावर, ती तटबंदी खाली कोसळली. विश्वासाद्वारे राहाब वेश्येने इस्राएली हेरांचा स्नेहभावाने पाहुणचार केला व त्यामुळे परमेश्वराची आज्ञा न पाळणार्या लोकांबरोबर तिचा अंत झाला नाही. तर मग, मी आणखी किती उदाहरणे सांगावी? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल आणि सर्व संदेष्ट्यांच्या विश्वासाबद्दलच्या कथा सांगण्यासाठी मला वेळ नाही. विश्वासाद्वारे या सर्व लोकांनी राज्ये जिंकली, न्यायीपणाने सत्ता गाजवली व वचनफळ प्राप्त केले; सिंहाची तोंडे बंद केली; आणि अग्निज्वालांच्या प्रकोपाला थंड केले; काहींचा तलवारीच्या धारेपासून बचाव झाला; काहीजण जे अशक्त होते, ते सबळ झाले; इतरांना लढाईमध्ये मोठे बळ प्राप्त झाले; त्यांनी परकीय सैन्ये परतवून व पळवून लावली. काही स्त्रियांना विश्वासाद्वारे त्यांचे मेलेले प्रियजन परत जिवंत मिळाले. पण दुसर्या काहींना विश्वासामुळे मरेपर्यंत छळ सोसावा लागला, तरीही सुटका करून घेण्यापेक्षा पुढे याहून चांगल्या जीवनात आपले पुनरुत्थान होईल, असा त्यांचा विश्वास होता. काहींची हेटाळणी झाली आणि त्यांना चाबकांचे फटके मारले गेले, तर इतरांना बेड्या ठोकून तुरुंगात टाकण्यात आले. काहींचा दगडमाराने मृत्यू झाला, तर काहींचे करवतीने दोन तुकडे करण्यात आले; काहींना तलवारीने ठार करण्यात आले, काहीजण मेंढरांची व बकर्याची कातडी पांघरूण वाळवंटात व पर्वतांवर भटकत असत. ते निराधार, पीडित व वाईट वागणूक मिळालेले होते. हे जग त्यांच्या योग्यतेचे नव्हते. ते वाळवंटात व पर्वतांवर भटकत असत व गुहेत आणि बिळात राहत असत. या माणसांनी विश्वासाद्वारे परमेश्वराची मान्यता मिळविली, तरीपण त्यांच्यापैकी कोणालाही परमेश्वराच्या वचनांची फळे मिळाली नाहीत; कारण परमेश्वराने आपल्यासाठी ज्या अधिक चांगल्या गोष्टी सिद्ध केल्या आहेत त्यामध्ये त्यांनीही वाटेकरी व्हावे, अशी परमेश्वराची योजना होती.
इब्री 11:20-40 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इसहाकाने याकोबाला व एसावाला पुढे होणार्या गोष्टींविषयीसुद्धा विश्वासाने आशीर्वाद दिला. याकोबाने मरतेवेळेस योसेफाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला; आणि ‘आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाला नमन केले.’ योसेफाने मरतेवेळेस इस्राएलाच्या संतानाच्या निघून जाण्याचा उल्लेख विश्वासाने केला व आपल्या अस्थींविषयी आज्ञा केली. ‘मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला तीन महिने लपवून ठेवले,’ कारण ते मूल ‘सुंदर आहे असे त्यांनी पाहिले;’ व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही. ‘मोशे प्रौढ झाल्यावर’ त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. ‘ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे’ ही मिसर देशातील धनसंपत्तीपेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले; कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने मिसर देश सोडला; कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. त्याने ‘वल्हांडण सण’ व ‘रक्तसिंचन’ हे विधी विश्वासाने पाळले, ते अशा हेतूने की, प्रथमजन्मलेल्यांचा ‘नाश करणार्याने’ त्यांना शिवू नये. जसे कोरड्या भूमीवरून तसे ते विश्वासाने तांबड्या समुद्रातून पार गेले; मिसरी लोक तसेच करण्याचा प्रयत्न करत असता बुडून गेले. विश्वासाने यरीहोच्या गावकुसाभोवती सात दिवस फेर्या घालण्यात आल्यावर ते पडले. राहाब कसबिणीने स्नेहभावाने हेरांचा स्वीकार विश्वासाने केल्यामुळे अवज्ञा करणार्यांबरोबर तिचा नाश झाला नाही. आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल व संदेष्टे ह्यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. त्यांनी विश्वासाच्या द्वारे राज्ये जिंकली, नीतिमत्त्व आचरले, अभिवचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली, अग्नीची शक्ती नाहीशी केली; ते तलवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बळांचे सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये पळवली. स्त्रियांना त्यांची मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली. आणखी कित्येकांनी आपणांस अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून खंडणी भरून मिळणारी सुटका न स्वीकारता हालहाल सोसले. आणि इतरांना टवाळ्या, मारहाण ह्यांचा आणि बंधने व कैद ह्यांचाही अनुभव आला. त्यांना दगडमार केला, मोहपाशात टाकले, करवतीने चिरले, ते तलवारीच्या धारेने मेले; ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत; ते लाचार, पीडित, त्रासलेले असे होते; त्यांना जग योग्य नव्हते; ते अरण्यांतून, डोंगरांतून, गुहांतून व जमिनीतल्या विवरांतून भटकत राहत असत. ह्या सर्वांबाबत त्यांच्या विश्वासाविषयी चांगली साक्ष दिली असताही त्यांना अभिवचनानुसार फलप्राप्ती झाली नाही; त्यांनी आपणावाचून पूर्ण होऊ नये म्हणून देवाने जे अधिक चांगले ते आपल्यासाठी पूर्वीच नेमले होते.
इब्री 11:20-40 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
इसहाकने याकोब व एसाव ह्यांना भविष्यासाठी विश्वासाने आशीर्वाद दिला. याकोबने मरते वेळेस योसेफच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाची आराधना केली. योसेफने मरतेवेळेस इस्राएलच्या संतानाच्या निर्गमनाचा उल्लेख विश्वासाने केला व आपल्या अस्थींविषयी निर्देश दिले. मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला तीन महिने लपवून ठेवले; कारण ते मूल गोंडस आहे, असे त्यांनी पाहिले व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही. मोशे प्रौढ झाल्यावर त्याने स्वतःला फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे विश्वासाने नाकारले; पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत केले; ख्रिस्तासाठी विटंबना सोसणे ही इजिप्त देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती, आहे असे त्याने मानले; कारण त्याची दृष्टी भावी फलप्राप्तीवर होती. त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने इजिप्त देश सोडला; कारण अदृश्य देवाला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. त्याने वल्हांडण सण व रक्त लावणे हे विधी विश्वासाने पाळले, ते अशा हेतूने की, इस्राएली लोकांच्या प्रथम जन्मलेल्यांचा नाश करणाऱ्याने त्यांना स्पर्श करू नये. तांबड्या समुद्रातून ते विश्वासाने जणू कोरड्या भूमीवरून जावे त्याप्रमाणे पार गेले; मिसरमधील लोक तसेच प्रयत्न करीत असता बुडून गेले. इस्राएली लोकांनी यरीहोच्या गावकुसाभोवती सात दिवस प्रदक्षिणा घातल्यावर त्यांच्या विश्वासामुळे ते नगर पडले. राहाब वेश्येने स्नेहभावाने व विश्वासाने इस्राएली हेरांचा स्वीकार केल्यामुळे अवज्ञा करणाऱ्यांबरोबर तिचा नाश झाला नाही. आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफताह, दावीद, शमुवेल व संदेष्टे, ह्यांचे वर्णन करू लागलो, तर वेळ पुरणार नाही. त्यांनी विश्वासाद्वारे राज्ये जिंकली, नीतिमत्त्व आचरणात आणले, अभिवचने मिळविली, सिंहाची तोंडे बंद केली, अग्नीची शक्ती नाहीशी केली; ते तलवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बल असता सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये धुळीला मिळवली. स्त्रियांना त्यांची मृत माणसे विश्वासामुळे पुनरुत्थान झालेली मिळाली. आणखी कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून स्वातंत्र्याचा त्याग करून हालअपेष्टा सोसल्या. काहींना टवाळ्या, मारहाण, बंधने व कैद ह्यांचाही अनुभव आला; त्यांच्यावर दगडफेक केली, त्यांना मोहपाशात टाकले, करवतीने कापले, तलवारीच्या धारेने त्यांचा वध करण्यात आला; ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत; ते लाचार, पीडित व त्रासलेले असे होते; त्यांना जगाचे आकर्षण नव्हते. ते अरण्यांतून, डोंगरांतून, गुहांतून व जमिनीतल्या विवरांतून निराश्रित म्हणून भटकत राहत असत. ह्या सर्वांबाबत त्यांच्या विश्वासाविषयी चांगली साक्ष दिली असताही त्यांना अभिवचनानुसार फलप्राप्ती झाली नाही; कारण देवाने आपणासाठी अधिक चांगली योजना आखली होती आणि ती म्हणजे त्यांना आपणासर्वांबरोबर पूर्णत्व प्राप्त व्हावे.