यहेज्केल 3:16-27
यहेज्केल 3:16-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग ते सात दिवस लोटल्यावर परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते असे : “मानवपुत्रा, मी तुला इस्राएल घराण्यावर पहारेकरी नेमले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यांना बजावून सांग. ‘तू खातरीने मरशील’ असे मी पातक्यास म्हणालो असता तू जर त्याला बजावले नाही व पातक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून तू त्याला बजावून सांगितले नाहीस, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल; पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन. तू त्या पातक्यास बजावले असून त्याने आपली दुष्टाई व कुमार्ग ही सोडली नाहीत, तर तो आपल्या दुष्टाईमुळे मरेल आणि तू आपला जीव वाचवला असे होईल. तसेच नीतिमान आपली नीतिमत्ता सोडून अधर्म करू लागला व मी त्याच्यापुढे अडथळा ठेवला तर तो मरेल; तू त्याला बजावले नसल्यास तो आपल्या पातकामुळे मरेल व त्याने केलेली नीतिमत्ता जमेस धरण्यात येणार नाही; पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन. पाप करू नये असे तू त्या नीतिमानास बजावले, व त्याने पाप केले नाही, तर त्याने बोध घेतल्यामुळे तो जगेल आणि तू आपला जीव वाचवला असे होईल.” तेव्हा तेथे परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला व तो मला म्हणाला, “ऊठ, खोर्यात जा; तेथे मी तुझ्याबरोबर बोलेन.” मग मी उठून खोर्यात गेलो तेव्हा खबार नदीजवळ मी पाहिले होते तसे परमेश्वराचे तेज तेथेही माझ्यासमोर उभे होते; तेव्हा मी उपडा पडलो. नंतर आत्म्याने माझ्या ठायी प्रवेश करून मला माझ्या पायांवर उभे केले; त्याने माझ्याबरोबर भाषण करून म्हटले, जा, तू स्वतःला आपल्या घरात कोंडून घे. हे मानवपुत्रा, पाहा, तुला बंधनांनी जखडून बांधतील आणि तुला बाहेर त्या लोकांमध्ये जाता येणार नाही; तुझी जीभ तुझ्या टाळूस चिकटेल असे मी करीन, म्हणजे तू मुका होशील आणि तू त्यांचा निषेधकर्ता होणार नाहीस; कारण ते फितुरी घराणे आहे. तरीपण मी तुझ्याबरोबर बोलेन, तेव्हा मी तुझे तोंड उघडीन, मग तू त्यांना सांग की, ‘प्रभू परमेश्वर म्हणतो’; ज्याला ऐकायचे असेल तो ऐको, ज्याला ऐकायचे नसेल, तो न ऐको; ते तर फितुरी घराणे आहे.
यहेज्केल 3:16-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग सातव्या दिवसानंतर परमेश्वर देवाचे वचन मला मिळाले, आणि म्हणाले, “मानवाच्या मुला, मी तुला इस्राएलाच्या घरण्यावर पहारा देण्यासाठी नेमलेले आहे, म्हणून माझ्या तोंडचा शब्द ऐकून घे व त्यांना सावध कर! ‘तू खातरीने मरशील’ असे मी पातक्यास म्हणालो असता तू जर त्यांना बजावले नाही व पातक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून, तू त्यास बजावून सांगितले नाहीस, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल; पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन. परंतू जर दुष्टाला त्याच्या मार्गापासून सावध केले, आणि तो आपल्या दुष्ट मार्गापासून किंवा कामापासून मागे वळला नाही तर तो त्याच्या पापात मरेल; मग त्याचा जाब तुझ्याकडे विचारला जाणार नाही. जर देवभीरु व्यक्ती आपल्या देवाच्या भयापासून व कार्यापासून अधम वागेल, तर मी त्याच्या पुढे अडखळण ठेवेल, आणि तो मरेल जर तू त्यास सावध केले नाही, तो त्याच्या पापात मरेल, आणि त्याने केलेले धार्मिक काम आठवले जाणार नाही, पण त्याच्या रक्ताचा जाब मी तुला विचारेन.” परंतू जर तू देवभीरु मनुष्यास पाप करण्यापासून सावध करशील, तो निश्चित वाचेल; आणि त्याचा जाब तुला विचारला जाणार नाही. मग परमेश्वर देवाचा हात माझ्यावर आला, आणि तो मला म्हणाला, “उठ आणि दरीत जा, तेथे मी तुझ्याशी बोलेन!” मी उठलो आणि दरीत खबार नदीजवळ गेलो, परमेश्वर देवाचे गौरव तेथे प्रकाशत होते; तेथे मी उपडा पडलो. देवाच्या आत्म्याने येऊन मला तेव्हा माझ्या पाया वर उभे केले; आणि माझ्याशी बोलला, व म्हणाला, जा आणि स्वतःला आपल्या घरात बंद करून ठेव, आता, मानवाच्या मुला, ते तुला दोरीने बांधतील म्हणून त्याच्यामध्ये तू बाहेर जाऊ शकणार नाही. तुझी जीभ टाळूला चिकटेल असे मी करेन आणि तू मुका होशील त्यांना धमकावु शकणार नाहीस, कारण ते फितुर घराणे आहे. पण जेव्हा मी तुझ्याशी बोलेन तेव्हा तुझे तोंड मी उघडीन व परमेश्वर देव असे म्हणतो त्यांना सांग, ज्याला ऐकायचे असेल त्याने ऐकावे ज्याला ऐकावयाचे नसेल त्याने ऐकू नये कारण ते फितुर घराणे आहे.
यहेज्केल 3:16-27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सात दिवसांच्या शेवटी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले: “मानवपुत्रा, मी तुला इस्राएली लोकांचा पहारेकरी केले आहे; तर जे वचन मी सांगतो ते ऐक आणि माझ्यावतीने त्यांना सावध कर. जेव्हा मी दुष्टाला म्हणतो, ‘तू खचितच मरशील,’ आणि त्या व्यक्तीने आपल्या मार्गांपासून वळावे म्हणून तू त्यांना चेतावणी दिली नाहीस किंवा त्यांनी त्यांचे दुष्टमार्ग सोडून त्यांचा जीव वाचवावा म्हणून तू त्यांना सांगितले नाहीस, तर ते दुष्ट व्यक्ती त्यांच्या पापामुळे मरतील आणि त्यांच्या रक्तासाठी मी तुला दोषी ठरवेन. परंतु त्या दुष्ट व्यक्तीने त्याच्या दुष्टाईपासून व त्यांच्या कुमार्गापासून वळावे म्हणून तू त्याला सावध केलेस आणि ते तसे करीत नाहीत, तर ते त्यांच्या पापामुळे मरतील; परंतु तू स्वतः वाचशील. “त्याच प्रकारे, जेव्हा एखादा न्यायी आपल्या न्यायत्वापासून मागे फिरतो आणि जे वाईट ते करतो आणि मी त्यांच्यापुढे एक अडखळण ठेवेन आणि तो मरण पावेल. कारण तू त्याला चेतावणी दिली नाही, तो त्याच्या पापामुळे मरेल. जी न्यायीपणाची कृत्ये त्या व्यक्तीने केली ती आठवली जाणार नाहीत, आणि त्याच्या रक्तासाठी मी तुला दोषी ठरवेन. परंतु पाप करू नये म्हणून तू त्या न्यायी व्यक्तीला चेतावणी दिली आणि त्याने पाप केले नाही आणि त्याने ती चेतावणी स्वीकारली म्हणून तो खचितच जगेल आणि तू स्वतःला वाचवशील.” त्या ठिकाणी याहवेहचा हात माझ्यावर होता, आणि ते मला म्हणाले, “ऊठ आणि मैदानाकडे जा, तिथे मी तुझ्याशी बोलेन.” तेव्हा मी उठलो व मैदानाकडे गेलो. आणि मी खेबर नदीकाठी पाहिलेल्या वैभवासारखे याहवेहचे वैभव तिथे उभे होते आणि मी उपडा पडलो. नंतर आत्मा माझ्यामध्ये आला आणि मला माझ्या पायावर उभे केले. याहवेह माझ्याशी बोलले आणि म्हणाले: “जा, स्वतःला आपल्या घरात बंद करून घे. आणि तू हे मानवपुत्रा, ते तुला दोर्यांनी बांधतील; तू लोकांमध्ये बाहेर जाऊ नये म्हणून तुला बांधले जाईल. तू शांत असावे आणि त्यांचा निषेध करू नये म्हणून तुझी जीभ तुझ्या टाळूला चिकटेल असे मी करेन, कारण ते बंडखोर लोक आहेत. परंतु मी तुझ्याशी बोलेन, तेव्हा मी तुझे मुख उघडेन आणि तू त्यांना सांगशील, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात.’ ज्याला ऐकावयाचे आहे ते ऐकतील आणि ज्याला ऐकावयाचे नसेल त्याने ऐकू नये; कारण ते बंडखोर लोक आहेत.