मग सातव्या दिवसानंतर परमेश्वर देवाचे वचन मला मिळाले, आणि म्हणाले, “मानवाच्या मुला, मी तुला इस्राएलाच्या घरण्यावर पहारा देण्यासाठी नेमलेले आहे, म्हणून माझ्या तोंडचा शब्द ऐकून घे व त्यांना सावध कर! ‘तू खातरीने मरशील’ असे मी पातक्यास म्हणालो असता तू जर त्यांना बजावले नाही व पातक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून, तू त्यास बजावून सांगितले नाहीस, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल; पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन. परंतू जर दुष्टाला त्याच्या मार्गापासून सावध केले, आणि तो आपल्या दुष्ट मार्गापासून किंवा कामापासून मागे वळला नाही तर तो त्याच्या पापात मरेल; मग त्याचा जाब तुझ्याकडे विचारला जाणार नाही. जर देवभीरु व्यक्ती आपल्या देवाच्या भयापासून व कार्यापासून अधम वागेल, तर मी त्याच्या पुढे अडखळण ठेवेल, आणि तो मरेल जर तू त्यास सावध केले नाही, तो त्याच्या पापात मरेल, आणि त्याने केलेले धार्मिक काम आठवले जाणार नाही, पण त्याच्या रक्ताचा जाब मी तुला विचारेन.” परंतू जर तू देवभीरु मनुष्यास पाप करण्यापासून सावध करशील, तो निश्चित वाचेल; आणि त्याचा जाब तुला विचारला जाणार नाही. मग परमेश्वर देवाचा हात माझ्यावर आला, आणि तो मला म्हणाला, “उठ आणि दरीत जा, तेथे मी तुझ्याशी बोलेन!” मी उठलो आणि दरीत खबार नदीजवळ गेलो, परमेश्वर देवाचे गौरव तेथे प्रकाशत होते; तेथे मी उपडा पडलो. देवाच्या आत्म्याने येऊन मला तेव्हा माझ्या पाया वर उभे केले; आणि माझ्याशी बोलला, व म्हणाला, जा आणि स्वतःला आपल्या घरात बंद करून ठेव, आता, मानवाच्या मुला, ते तुला दोरीने बांधतील म्हणून त्याच्यामध्ये तू बाहेर जाऊ शकणार नाही. तुझी जीभ टाळूला चिकटेल असे मी करेन आणि तू मुका होशील त्यांना धमकावु शकणार नाहीस, कारण ते फितुर घराणे आहे. पण जेव्हा मी तुझ्याशी बोलेन तेव्हा तुझे तोंड मी उघडीन व परमेश्वर देव असे म्हणतो त्यांना सांग, ज्याला ऐकायचे असेल त्याने ऐकावे ज्याला ऐकावयाचे नसेल त्याने ऐकू नये कारण ते फितुर घराणे आहे.
यहे. 3 वाचा
ऐका यहे. 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यहे. 3:16-27
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ