YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 3:16-27

यहेज्केल 3:16-27 MRCV

सात दिवसांच्या शेवटी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले: “मानवपुत्रा, मी तुला इस्राएली लोकांचा पहारेकरी केले आहे; तर जे वचन मी सांगतो ते ऐक आणि माझ्यावतीने त्यांना सावध कर. जेव्हा मी दुष्टाला म्हणतो, ‘तू खचितच मरशील,’ आणि त्या व्यक्तीने आपल्या मार्गांपासून वळावे म्हणून तू त्यांना चेतावणी दिली नाहीस किंवा त्यांनी त्यांचे दुष्टमार्ग सोडून त्यांचा जीव वाचवावा म्हणून तू त्यांना सांगितले नाहीस, तर ते दुष्ट व्यक्ती त्यांच्या पापामुळे मरतील आणि त्यांच्या रक्तासाठी मी तुला दोषी ठरवेन. परंतु त्या दुष्ट व्यक्तीने त्याच्या दुष्टाईपासून व त्यांच्या कुमार्गापासून वळावे म्हणून तू त्याला सावध केलेस आणि ते तसे करीत नाहीत, तर ते त्यांच्या पापामुळे मरतील; परंतु तू स्वतः वाचशील. “त्याच प्रकारे, जेव्हा एखादा न्यायी आपल्या न्यायत्वापासून मागे फिरतो आणि जे वाईट ते करतो आणि मी त्यांच्यापुढे एक अडखळण ठेवेन आणि तो मरण पावेल. कारण तू त्याला चेतावणी दिली नाही, तो त्याच्या पापामुळे मरेल. जी न्यायीपणाची कृत्ये त्या व्यक्तीने केली ती आठवली जाणार नाहीत, आणि त्याच्या रक्तासाठी मी तुला दोषी ठरवेन. परंतु पाप करू नये म्हणून तू त्या न्यायी व्यक्तीला चेतावणी दिली आणि त्याने पाप केले नाही आणि त्याने ती चेतावणी स्वीकारली म्हणून तो खचितच जगेल आणि तू स्वतःला वाचवशील.” त्या ठिकाणी याहवेहचा हात माझ्यावर होता, आणि ते मला म्हणाले, “ऊठ आणि मैदानाकडे जा, तिथे मी तुझ्याशी बोलेन.” तेव्हा मी उठलो व मैदानाकडे गेलो. आणि मी खेबर नदीकाठी पाहिलेल्या वैभवासारखे याहवेहचे वैभव तिथे उभे होते आणि मी उपडा पडलो. नंतर आत्मा माझ्यामध्ये आला आणि मला माझ्या पायावर उभे केले. याहवेह माझ्याशी बोलले आणि म्हणाले: “जा, स्वतःला आपल्या घरात बंद करून घे. आणि तू हे मानवपुत्रा, ते तुला दोर्‍यांनी बांधतील; तू लोकांमध्ये बाहेर जाऊ नये म्हणून तुला बांधले जाईल. तू शांत असावे आणि त्यांचा निषेध करू नये म्हणून तुझी जीभ तुझ्या टाळूला चिकटेल असे मी करेन, कारण ते बंडखोर लोक आहेत. परंतु मी तुझ्याशी बोलेन, तेव्हा मी तुझे मुख उघडेन आणि तू त्यांना सांगशील, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात.’ ज्याला ऐकावयाचे आहे ते ऐकतील आणि ज्याला ऐकावयाचे नसेल त्याने ऐकू नये; कारण ते बंडखोर लोक आहेत.

यहेज्केल 3 वाचा