YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 21:1-14

प्रेषितांची कृत्ये 21:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग असे झाले की, आमचा व त्यांचा वियोग झाल्यानंतर आम्ही तारवातून कोसास नीट गेलो, व दुसर्‍या दिवशी रुदास व तेथून पातर्‍यास गेलो. नंतर पलीकडे फेनिकेस जाणारे तारू मिळाल्यावर आम्ही त्यात बसून निघालो. मग कुप्र दृष्टीस पडले तेव्हा ते डावीकडे टाकून आम्ही सूरियाकडे जाऊन सोरास उतरलो, कारण तेथे तारवातील माल उतरवायचा होता. आणि शोध केल्यावर आम्हांला शिष्य भेटले म्हणून आम्ही तेथे सात दिवस राहिलो. त्यांनी आत्म्याच्या द्वारे पौलाला म्हटले, “तुम्ही यरुशलेमेत पाऊल टाकू नका.” मग असे झाले की, ते दिवस संपल्यावर आम्ही तेथून निघून मार्गस्थ झालो; तेव्हा स्त्रिया व मुले ह्यांच्यासह सर्वांनी आम्हांला नगराबाहेर पोहचवले. तेथे समुद्राच्या किनार्‍यावर आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली. आणि एकमेकांचा निरोप घेतल्यावर आम्ही तारवात बसलो आणि ते आपल्या घरी माघारी गेले. मग आम्ही आपला सोरापासूनचा जलप्रवास संपवला आणि प्तलमैसास येऊन व बंधुजनांना भेटून त्यांच्या येथे एक दिवस राहिलो. मग दुसर्‍या दिवशी [पौल व त्याचे सोबती] आम्ही निघून कैसरीयास आलो आणि सुवार्तिक फिलिप्प ह्याच्या घरी जाऊन उतरलो; हा सातांपैकी एक होता. त्याला चार अविवाहित मुली होत्या. त्या ईश्वरी संदेश देत असत. तेथे आम्ही पुष्कळ दिवस राहिलो असता अगब नावाचा कोणीएक संदेष्टा यहूदीयाहून खाली आला. त्याने आमच्याकडे येऊन व पौलाचा कमरबंद घेऊन आपले हातपाय बांधून म्हटले, “पवित्र आत्मा असे म्हणतो की, ‘हा कमरबंद ज्या माणसाचा आहे त्याला यरुशलेमेत यहूदी लोक ह्याप्रमाणे बांधून परराष्ट्रीयांच्या हाती देतील.”’ हे ऐकून आम्ही व तेथल्या लोकांनीही ‘तुम्ही यरुशलेमेस जाऊ नका,’ अशी त्याला गळ घातली. तेव्हा पौलाने उत्तर दिले, “तुम्ही रडून माझे मन खचवता, हे काय? मी नुसता बंधनात पडायलाच नाही, तर प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलेमेत मरायलादेखील तयार आहे.” तो ऐकत नाही हे पाहून “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो,” असे म्हणून आम्ही स्वस्थ राहिलो.

प्रेषितांची कृत्ये 21:1-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

त्यांचा निरोप घेतल्यानंतर आम्ही समुद्रमार्गे निघालो आणि सरळ प्रवास करीत कोस बेटास आलो, दुसऱ्या दिवशी आम्ही रुद बेटास गेलो, तेथून आम्ही पातरा शहरास गेलो. तेथे फेनीकेला जाणारे जहाज आम्हास आढळले, तेव्हा आम्ही जहाजात बसून पुढे निघालो. तेव्हा कुप्र आमच्या नजरेत आले, परंतु ते डाव्या अंगाला टाकून आम्ही सरळ सिरीया प्रांताला रवाना झालो व सोर येथे उतरलो, कारण तेथे जहाजातील माल उतरावयाचा होता. तेथे येशूचे काही शिष्य आम्हास आढळले आणि आम्ही त्यांच्याबरोबर सात दिवस राहिलो, पवित्र आत्म्याच्या सूचनेवरून त्यांनी पौलाला असे सांगितले की, त्याने यरूशलेम शहरास जाऊ नये. आमच्या भेटीचे दिवस संपत आल्यावर आम्ही तेथून निघून आमचा पुढील प्रवास परत सुरू केला, त्यावेळी तेथील बंधुजन आपल्या पत्नी, मुलांच्याबरोबर आमच्यासह शहराबाहेर आले व तेथील समुद्रकिनाऱ्यावर आम्ही गुडघे टेकले व प्रार्थना केली. मग एकमेकांचा निरोप घेऊन आम्ही जहाजात बसलो व ते लोक आपापल्या घरी गेले. सोरापासून आम्ही आमचा प्रवास सुरू केला व पोलेमा येथे उतरलो आणि तेथील बंधुजनांना भेटलो, त्यांच्याबरोबर एक दिवस राहिलो. आणि दुसऱ्या दिवशी निघून आम्ही कैसरीयास आलो व सुवार्तिक फिलिप्प याच्या घरी जाऊन राहिलो, तो निवडलेल्या सात सेवकांपैकी एक होता. त्यास चार मुली होत्या, त्यांची लग्ने झालेली नव्हती, या मुलींना देवाच्या गोष्टी सांगण्याचे दान होते. त्या बंधूच्या बरोबर बरेच दिवस राहिल्यावर अगब नावाचा संदेष्टा यहूदीयाहून तेथे आला. त्याने आमची भेट घेऊन पौलाच्या कमरेचा पट्टा मागून घेतला, त्याने स्वतःचे हात व पाय बांधले आणि तो म्हणाला, “पवित्र आत्मा असे म्हणतो; हा पट्टा ज्या मनुष्याच्या कमरेचा आहे, त्यास यरूशलेम शहरातील यहूदी लोक असेच बांधतील व परराष्ट्रीयांच्या हाती देतील.” आम्ही व तेथील सर्वांनी ते शब्द ऐकले, तेव्हा आम्ही व इतर लोकांनी पौलाला कळकळीची विनंती केली की, त्याने यरूशलेम शहरास जाऊ नये. पण पौल म्हणाला, “तुम्ही हे काय करीत आहा, असे रडून तुम्ही माझे मन खचवीत आहात काय? मी फक्त बांधून घेण्यासाठी नव्हे तर प्रभू येशूच्या नावासाठी यरूशलेम शहरामध्ये मरायलादेखील तयार आहे.” यरूशलेम शहरापासून दूर राहण्यासाठी आम्ही त्याचे मन वळवू शकलो नाही, म्हणून आम्ही त्यास विनंती करायची सोडली आणि म्हटले, “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो.”

प्रेषितांची कृत्ये 21:1-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

शेवटी आम्ही अतिदुःखाने रडून त्यांचा निरोप घेतल्यावर, जहाजातून प्रवास करीत सरळ कोस येथे गेलो. दुसर्‍या दिवशी आम्ही रुदा येथे गेलो आणि तिथून पातराला गेलो. तिथे आम्हाला फेनिके प्रांताकडे जाणारे जहाज दिसल्यावर, आम्ही त्या जहाजात बसून पुढे प्रवासाला निघालो. जाताना आम्हाला सायप्रस बेट दिसले आणि त्याच्या दक्षिणेकडे जाऊन आम्ही पुढे सीरियातील सोर बंदरात उतरलो, कारण तिथे जहाजातील सामान खाली करावयाचे होते. तिथे आम्ही शिष्यांना शोधून काढले, मग तिथे त्यांच्याबरोबर आम्ही सात दिवस राहिलो. त्यांनी आत्म्याद्वारे पौलाला यरुशलेमकडे न जाण्याचा आग्रह केला. परंतु जेव्हा आम्हाला जाण्याची वेळ आली, तेव्हा तेथील सर्वजण पत्नी आणि लेकरांसोबत आमच्याबरोबर चालत शहराच्या सीमेपर्यंत आले आणि तिथे समुद्रकिनार्‍यावर आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली. एकमेकांचा निरोप घेतल्यानंतर आम्ही जहाजात चढलो आणि ते घरी परत गेले. सोरापासूनचा जलप्रवास आम्ही चालू ठेवला व त्यानंतर आम्ही प्टोलेमाईस येथे उतरलो. तेथील बंधू, भगिनींची आम्ही भेट घेतली आणि एक दिवस त्यांच्याबरोबर राहिलो. दुसर्‍या दिवशी आम्ही निघालो व कैसरीया येथे पोहोचलो आणि सुवार्तिक फिलिप्पाच्या घरी राहिलो, तो सात जणांपैकी एक होता. त्याला चार अविवाहित कन्या होत्या, त्या भविष्यवाणी करीत असत. आम्ही अनेक दिवस तिथे राहिल्यानंतर, एक अगब नावाचा संदेष्टा यहूदीया येथून तिथे आला. आम्हाकडे येऊन त्याने पौलाचा कमरबंद घेतला व स्वतःचे हातपाय बांधून तो म्हणाला, “पवित्र आत्मा म्हणतो, ‘हा कमरबंद ज्या मनुष्याचा आहे त्याला यरुशलेममधील यहूदी पुढारी असेच बांधून गैरयहूदीयांच्या हाती देतील.’ ” हे ऐकल्यानंतर आम्ही आणि लोकांनी पौलाला यरुशलेमला न जाण्याची विनंती केली. पौल म्हणाला, “तुम्ही रडून माझे हृदय का तोडता? यरुशलेममध्ये केवळ तुरुंगात पडण्याचीच माझी तयारी नाही, तर प्रभू येशूंच्या नावासाठी मरण्यास देखील मी तयार आहे.” त्याचे मन वळत नाही हे पाहून आम्ही म्हणालो, “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो.”

प्रेषितांची कृत्ये 21:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग असे झाले की, आमचा व त्यांचा वियोग झाल्यानंतर आम्ही तारवातून कोसास नीट गेलो, व दुसर्‍या दिवशी रुदास व तेथून पातर्‍यास गेलो. नंतर पलीकडे फेनिकेस जाणारे तारू मिळाल्यावर आम्ही त्यात बसून निघालो. मग कुप्र दृष्टीस पडले तेव्हा ते डावीकडे टाकून आम्ही सूरियाकडे जाऊन सोरास उतरलो, कारण तेथे तारवातील माल उतरवायचा होता. आणि शोध केल्यावर आम्हांला शिष्य भेटले म्हणून आम्ही तेथे सात दिवस राहिलो. त्यांनी आत्म्याच्या द्वारे पौलाला म्हटले, “तुम्ही यरुशलेमेत पाऊल टाकू नका.” मग असे झाले की, ते दिवस संपल्यावर आम्ही तेथून निघून मार्गस्थ झालो; तेव्हा स्त्रिया व मुले ह्यांच्यासह सर्वांनी आम्हांला नगराबाहेर पोहचवले. तेथे समुद्राच्या किनार्‍यावर आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली. आणि एकमेकांचा निरोप घेतल्यावर आम्ही तारवात बसलो आणि ते आपल्या घरी माघारी गेले. मग आम्ही आपला सोरापासूनचा जलप्रवास संपवला आणि प्तलमैसास येऊन व बंधुजनांना भेटून त्यांच्या येथे एक दिवस राहिलो. मग दुसर्‍या दिवशी [पौल व त्याचे सोबती] आम्ही निघून कैसरीयास आलो आणि सुवार्तिक फिलिप्प ह्याच्या घरी जाऊन उतरलो; हा सातांपैकी एक होता. त्याला चार अविवाहित मुली होत्या. त्या ईश्वरी संदेश देत असत. तेथे आम्ही पुष्कळ दिवस राहिलो असता अगब नावाचा कोणीएक संदेष्टा यहूदीयाहून खाली आला. त्याने आमच्याकडे येऊन व पौलाचा कमरबंद घेऊन आपले हातपाय बांधून म्हटले, “पवित्र आत्मा असे म्हणतो की, ‘हा कमरबंद ज्या माणसाचा आहे त्याला यरुशलेमेत यहूदी लोक ह्याप्रमाणे बांधून परराष्ट्रीयांच्या हाती देतील.”’ हे ऐकून आम्ही व तेथल्या लोकांनीही ‘तुम्ही यरुशलेमेस जाऊ नका,’ अशी त्याला गळ घातली. तेव्हा पौलाने उत्तर दिले, “तुम्ही रडून माझे मन खचवता, हे काय? मी नुसता बंधनात पडायलाच नाही, तर प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलेमेत मरायलादेखील तयार आहे.” तो ऐकत नाही हे पाहून “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो,” असे म्हणून आम्ही स्वस्थ राहिलो.

प्रेषितांची कृत्ये 21:1-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

आमचा व त्यांचा वियोग झाल्यानंतर आम्ही तारवातून सरळ कोसा या ठिकाणी गेलो व दुसऱ्या दिवशी रुदास व तेथून पातरा येथे गेलो. नंतर पलीकडे फेनीके येथे जाणारे तारू मिळाल्यावर आम्ही त्यात बसून निघालो. पुढे कुप्र दृष्टीस पडले, तेव्हा त्याच्या दक्षिणेकडे आम्ही सूरियाकडे जाऊन सोर येथे उतरलो कारण तेथे तारवातील माल उतरावयाचा होता. तेथे शोध घेतल्यावर आम्हांला काही शिष्य भेटले म्हणून आम्ही त्या ठिकाणी सात दिवस राहिलो. त्यांनी पवित्र आत्म्याद्वारे पौलाला म्हटले, “तुम्ही यरुशलेममध्ये पाऊल टाकू नका.” परंतु सात दिवसांनंतर आम्ही तेथून निघून मार्गस्थ झालो. स्त्रिया व मुले ह्यांच्यासह सर्वांनी आम्हांला शहराबाहेर पोहचविले. तेथे समुद्राच्या किनाऱ्यावर आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली. नंतर एकमेकांचा निरोप घेतल्यावर आम्ही तारवात बसलो आणि ते आपल्या घरी परत गेले. आम्ही आमचा सोरपासूनचा जलप्रवास संपविला आणि प्‍तलमैस येथे येऊन व बंधुजनांस भेटून त्यांच्याजवळ एक दिवस राहिलो. दुसऱ्या दिवशी आम्ही निघून कैसरिया येथे आलो आणि शुभवर्तमान प्रचारक फिलिप ह्याच्या घरी उतरलो, यरुशलेममध्ये ज्या सात लोकांना साहाय्यक म्हणून निवडले होते, त्यांच्यापैकी हा होता. त्याला चार अविवाहित मुली होत्या. त्या ईश्वरी संदेश देत असत. तेथे आम्ही अनेक दिवस राहिलो असता अगब नावाचा एक संदेष्टा यहुदियाहून आला. त्याने आमच्याकडे येऊन पौलाच्या कमरबंदाने स्वतःचे हातपाय बांधले व म्हटले, पवित्र आत्मा असे म्हणतो की, “हा कमरबंद ज्या माणसाचा आहे, त्याला यरुशलेममध्ये यहुदी लोक ह्याप्रमाणे बांधून यहुदीतरांच्या हाती देतील.” हे ऐकून आम्ही व तेथल्या लोकांनीही “तुम्ही यरुशलेममध्ये जाऊ नका”, अशी पौलाला गळ घातली. पौलाने उत्तर दिले, “तुम्ही रडून माझे मन खचविता काय? मी नुसता तुरुंगात पडण्यासच नव्हे, तर प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलममध्ये मरावयासदेखील तयार आहे.” तो ऐकत नाही, हे पाहून “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो”, असे म्हणून आम्ही त्याचे मन वळवणे सोडून दिले.