YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 3:1-5

२ शमुवेल 3:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

शौलाचे घराणे व दाविदाचे घराणे ह्यांच्यामध्ये फार दिवस युद्ध चालू राहिले; दावीद प्रबल होत गेला व शौलाचे घराणे निर्बल होत गेले. हेब्रोन येथे दाविदाला पुत्र झाले ते हे : इज्रेलीण अहीनवाम हिच्यापासून त्याला अम्नोन झाला; हा त्याचा ज्येष्ठ पुत्र; कर्मेली नाबालाची स्त्री अबीगईल हिच्यापासून त्याला किलाब झाला, हा त्याचा दुसरा पुत्र; गशूराचा राजा तलमय ह्याची कन्या माका हिच्यापासून त्याला तिसरा पुत्र अबशालोम झाला; हग्गीथीपासून चौथा पुत्र अदोनीया झाला; अबीटलेपासून पाचवा पुत्र शफाट्या झाला; आणि दाविदाची स्त्री एग्ला हिच्यापासून सहावा पुत्र इथ्राम झाला. हेब्रोन येथे दाविदाला जे पुत्र झाले ते हे. दाविदाबरोबर करायच्या कराराविषयी अबनेर वाटाघाट करतो

सामायिक करा
२ शमुवेल 3 वाचा

२ शमुवेल 3:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

दावीद आणि शौल यांच्या घराण्यांमध्ये दीर्घकाळ युध्द चालू राहिले. काही दिवसानंतर दावीदाची ताकद वाढत चालली तर शौलाचे घराणे कमकुवत बनत गेले. हेब्रोन येथे दावीदाला पुत्र झाले, त्यांचा क्रम असा इज्रेलची अहीनवाम हिच्यापासून पाहिला मुलगा झाला तो अम्नोन. दुसरा मुलगा किलाब, हा कर्मेलची नाबालची विधवा अबीगईल हिचा मुलगा. अबशालोम तिसरा, गशूरचा राजा तलमय याची मुलगी माका ही याची आई. अदोनीया चौथा, हग्गीथ ही त्याची आई, शफाट्या पाचवा, त्याची आई अबीटल. दावीदाची पत्नी एग्ला हिच्यापासून सहावा इथ्राम झाला. हेब्रोनमध्ये जन्मलेले हे त्याचे सहा पुत्र.

सामायिक करा
२ शमुवेल 3 वाचा

२ शमुवेल 3:1-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

शौलाचे घराणे आणि दावीदाचे घराणे यांच्यामधील युद्ध फार काळ चालू होते. दावीदाचे घराणे अधिक अधिक बलवान होत गेले आणि शौलाचे घराणे अधिक अधिक दुर्बल होत गेले. हेब्रोन येथे दावीदाचे जे पुत्र जन्मले ते हे: त्याचा ज्येष्ठपुत्र अम्नोन हा येज्रीली अहीनोअम हिच्यापासून झाला होता; त्याचा दुसरा पुत्र किलियाब, हा त्याला कर्मेलच्या नाबालाची विधवा अबीगईल हिच्यापासून झाला; तिसरा पुत्र अबशालोम हा गशूरचा राजा तलमय याची कन्या माकाह हिच्यापासून झाला; चौथा पुत्र अदोनियाह हा हग्गीथपासून जन्मला; पाचवा पुत्र शफाट्याह हा अबीटालपासून झाला; आणि सहावा पुत्र इथ्रियाम हा दावीदाची पत्नी एग्लाह हिच्यापासून झाला.