YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 शमु. 3:1-5

2 शमु. 3:1-5 IRVMAR

दावीद आणि शौल यांच्या घराण्यांमध्ये दीर्घकाळ युध्द चालू राहिले. काही दिवसानंतर दावीदाची ताकद वाढत चालली तर शौलाचे घराणे कमकुवत बनत गेले. हेब्रोन येथे दावीदाला पुत्र झाले, त्यांचा क्रम असा इज्रेलची अहीनवाम हिच्यापासून पाहिला मुलगा झाला तो अम्नोन. दुसरा मुलगा किलाब, हा कर्मेलची नाबालची विधवा अबीगईल हिचा मुलगा. अबशालोम तिसरा, गशूरचा राजा तलमय याची मुलगी माका ही याची आई. अदोनीया चौथा, हग्गीथ ही त्याची आई, शफाट्या पाचवा, त्याची आई अबीटल. दावीदाची पत्नी एग्ला हिच्यापासून सहावा इथ्राम झाला. हेब्रोनमध्ये जन्मलेले हे त्याचे सहा पुत्र.