शौलाचे घराणे आणि दावीदाचे घराणे यांच्यामधील युद्ध फार काळ चालू होते. दावीदाचे घराणे अधिक अधिक बलवान होत गेले आणि शौलाचे घराणे अधिक अधिक दुर्बल होत गेले. हेब्रोन येथे दावीदाचे जे पुत्र जन्मले ते हे: त्याचा ज्येष्ठपुत्र अम्नोन हा येज्रीली अहीनोअम हिच्यापासून झाला होता; त्याचा दुसरा पुत्र किलियाब, हा त्याला कर्मेलच्या नाबालाची विधवा अबीगईल हिच्यापासून झाला; तिसरा पुत्र अबशालोम हा गशूरचा राजा तलमय याची कन्या माकाह हिच्यापासून झाला; चौथा पुत्र अदोनियाह हा हग्गीथपासून जन्मला; पाचवा पुत्र शफाट्याह हा अबीटालपासून झाला; आणि सहावा पुत्र इथ्रियाम हा दावीदाची पत्नी एग्लाह हिच्यापासून झाला.
2 शमुवेल 3 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 2 शमुवेल 3:1-5
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ