YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 17:15-29

२ शमुवेल 17:15-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग हूशयाने सादोक व अब्याथार याजक ह्यांना सांगितले की, “अहीथोफेलाने अबशालोमाला व इस्राएलाच्या वडील जनांना अशी मसलत दिली होती, पण मी अशी मसलत दिली. तर लवकर जासूद पाठवून दाविदाला सांग की, आज रात्री रानातील नदीच्या उताराजवळ राहू नका; कसेही करून पार उतरून जा, नाहीतर राजा व त्याच्याबरोबरचे सर्व लोक नष्ट होतील.” योनाथान व अहीमास हे एन-रोगेल येथे राहत होते; ते शहरात आहेत हे कोणास कळू नये म्हणून एक दासी जाऊन त्यांना खबर देत असे; त्यांनी जाऊन दावीद राजाला हे वर्तमान सांगितले. पण एका पोराने त्यांना पाहून अबशालोमाला जाऊन सांगितले; तेव्हा ते त्वरेने निघून बहूरीमातील एका मनुष्याच्या घरी गेले; त्याच्या चौकात एक विहीर होती तिच्यात ते उतरले. तेव्हा एका स्त्रीने एक चादर घेऊन विहिरीच्या तोंडावर पसरली व तिच्यावर काही भरडलेले धान्य पसरले, त्यामुळे कोणाच्या काही लक्षात आले नाही. अबशालोमाचे चाकर त्या घरी त्या बाईकडे आले; ते तिला म्हणाले, “अहीमास व योनाथान कोठे आहेत?” तेव्हा त्या स्त्रीने त्यांना म्हटले, “ते ओहळाच्या पलीकडे गेले आहेत.” त्यांनी पुष्कळ शोध केला, पण ते सापडले नाहीत, म्हणून ते परत यरुशलेमेला गेले. ते निघून गेल्यावर ते पुरुष विहिरीतून बाहेर निघाले; त्यांनी जाऊन दावीद राजाला खबर दिली, आणि ते दाविदाला म्हणाले, “उठा, नदीचा पार उतरून लवकर पलीकडे जा; अहीथोफेलाची तुमच्याविरुद्ध अमुक अमुक मसलत आहे.” तेव्हा दावीद व त्याच्याबरोबरचे सर्व लोक यार्देनेपार गेले. सकाळी उजाडले तेव्हा यार्देनेच्या पलीकडे गेला नाही असा कोणीच मागे राहिला नाही. आपल्या मसलतीप्रमाणे काम झाले नाही हे अहीथोफेलाने पाहिले तेव्हा तो आपल्या गाढवावर खोगीर घालून आपल्या नगरास आपल्या घरी गेला, आणि आपल्या घराची सर्व व्यवस्था लावून त्याने गळफास घेतला; तो मृत्यू पावला, व त्याला त्याच्या बापाच्या थडग्यात पुरले. मग दावीद महनाइमाला गेला. इकडे अबशालोम इस्राएल लोकांसह यार्देनेपार गेला. अबशालोमाने यवाबाच्या जागी अमासा ह्याला सेनापती नेमले. यवाबाची आई सरूवा हिची नाहाश म्हणून एक बहीण होती; हिच्या अबीगल नावाच्या कन्येपाशी इथ्रा नावाचा एक इस्राएली पुरुष गेला होता, त्याचा पुत्र हा अमासा होय. इस्राएल लोकांनी व अबशालोमाने गिलाद देशात तळ दिला. दावीद महनाईम येथे आला तेव्हा अम्मोन्यांच्या राब्बातला नाहाशाचा पुत्र शोबी व लो-दबारातील अम्मीएलाचा पुत्र माखीर आणि रोगलीम येथील बर्जिल्लय गिलादी ह्यांनी दाविदासाठी व त्याच्याबरोबरच्या माणसांसाठी खाटा, भांडीकुंडी, गहू, जव, हुरडा, शेंगा, वाटाणे, फुटाणे, मध, लोणी, मेंढरे व गाईच्या दुधाचा खवा आणला; हे लोक रानात असून भुकेले, तान्हेले व थकलेले असतील असे त्यांना वाटले.

सामायिक करा
२ शमुवेल 17 वाचा

२ शमुवेल 17:15-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हूशयने हे सर्व सादोक आणि अब्याथार या याजकांच्या कानावर घातले. अबशालोम आणि इस्राएलमधील वडील मंडळी यांना अहिथोफेलने जे सुचवले ते हूशयने या दोघांना सांगितले. तसेच आपण काय सुचवले तेही सविस्तर सांगितले. हूशय म्हणाला, आता त्वरा करा ताबडतोब दावीदा कडे निरोप जाऊ द्या नदीच्या उताराजवळ राहू नका असे त्यांना सांगा. ताबडतोब यार्देन नदी ओलांडून जायला सांगा म्हणजे ते आणि त्यांच्या बरोबरची माणसे पकडली जाणार नाहीत. योनाथान आणि अहीमास ही याजकांची मुले एन-रोगेल येथे थांबली त्यांना गावात शिरताना कुणी पाहू नये म्हणून एक दासी त्यांच्याकडे आली तिने त्यांना निरोप सांगितला तो त्यांनी राजा दावीदाकडे पोचवला. पण एका मुलाने योनाथान आणि अहीमास यांना पाहिले हे अबशालोमला सांगायला तो धावत निघाला. योनाथान आणि अहीमास तेथून चटकन् निघाले. ते बहूरीम येथे एकाच्या घरी पोचले. त्याच्या घराच्या अंगणात एक विहीर होती. त्यामध्ये उतरून ते लपले. त्या मनुष्याच्या पत्नीने आडावर एक चादर पसरून वर धान्य ओतले. त्यामुळे तिथे धान्याची रास आहे असे दिसू लागले. तेव्हा तिथे योनाथान आणि अहीमास लपले असतील अशी शंकाही कोणाला आली नाही. अबशालोमाकडील नोकर त्या घरातल्या स्त्रीकडे आले. त्यांनी योनाथान आणि अहीमासचा ठावठिकाणा विचारला. ते थोड्या वेळापूर्वीच ओहळ ओलांडून गेल्याचे तिने त्यांना सांगितले. मग अबशालोमचे ते नोकर योनाथान आणि अहीमास यांच्या शोधार्थ निघाले. पण ते कुठेच न सापडल्यामुळे हे नोकर यरूशलेमेला परत गेले. इकडे अबशालोमचे नोकर निघून जातात, तो योनाथान आणि अहीमास विहिरीतून बाहेर पडले. तडक राजा दावीदाकडे जाऊन ते त्यास म्हणाले, असाल तसे निघा आणि नदी ओलांडून पलीकडे जा. अहिथोफेलने तुमच्याविरुध्द असे सांगितले आहे. तेव्हा दावीदाने आपल्या बरोबरच्या लोकांसह यार्देन नदी ओलांडली सूर्य वर यायच्या आत सर्वजण पलीकडे पोहोंचले होते. इस्राएल लोकांनी आपला सल्ला मानला नाही हे अहिथोफेलच्या लक्षात आले. त्याने गाढवावर खोगीर टाकले आणि आपल्या गावाकडे प्रयाण केले. घरच्यांची पुढली तरतूद केली आणि स्वत:ला फास लावून घेतला. त्याच्या मृत्यूनंतर लोकांनी त्याचे त्याच्या वडीलांच्या कबरेतच दफन केले. दावीद महनाईम येथे आला अबशालोमने सर्व इस्राएलीं समवेत यार्देन नदी ओलांडली. अबशालोमने अमासा याला सेनापती केले. यवाबाची जागा अमासाने घेतली. अमासा इस्राएली इथ्राचा पुत्र. अमासाची आई अबीगईल. सरुवेची बहीण नाहाश हिची ही अबीगल कन्या. सरुवे यवाबाची आई. अबशालोम आणि त्याच्या बरोबरचे इस्राएल लोकांनी गिलाद प्रांतात मुक्काम केला. दावीद महनाईम येथे आला शोबी, माखीर आणि बर्जिल्लय तेथेच होते. नाहाशचा मुलगा शोबी हा अम्मोन्यांच्या राब्बा नगरातला होता. अम्मीएलचा मुलगा माखीर हा लो-दबार तर बर्जिल्ल्य गिलाद येथील रोगलीमचा होता. ते म्हणाले, हे वाळवंटातील लोक थकले भागलेले आणि तहानलेले भुकेलेले असे आहेत. त्यांनी दावीद आणि इतर सर्वजणांसाठी बरेचसे खायचे प्यायचे पदार्थ आणले. तसेच बिछाने, भांडीकुंडी सुध्दा ते घेऊन आले. गहू जव, कणीक, हुरडा, शेंगा, डाळी, वाटाणे, मध, लोणी, मेंढरे तसेच गाईच्या दुधाचे पनीर याही वस्तू त्यांनी आणल्या.

सामायिक करा
२ शमुवेल 17 वाचा

२ शमुवेल 17:15-29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

हूशाईने सादोक आणि अबीयाथार याजकांना सांगितले, “अहीथोफेलने अबशालोम आणि इस्राएलच्या वडीलजनास अमुक करण्याचा सल्ला दिला होता, परंतु मी त्यांना असे करण्याचा सल्ला दिला आहे. आता लवकर निरोप पाठवा आणि दावीदाला सांगा, ‘आजची रात्र रानाच्या उतारावर घालवू नको; तर लवकर पलीकडे जा, नाहीतर राजा आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व लोक नष्ट केले जातील.’ ” आपण शहरात जाताना कोणी पाहून धोका देऊ नये, म्हणून योनाथान आणि अहीमाज एन-रोगेल येथे राहत होते. त्यांनी ही सूचना दावीद राजाला द्यावी म्हणून त्यांच्याकडे एक दासी पाठवली गेली. परंतु एका तरुण मनुष्याने त्यांना पाहिले आणि त्याने जाऊन अबशालोमला सांगितले. तेव्हा दोघेजण त्वरित बहूरीम येथे एका माणसाच्या घरी गेले. त्याच्या घराच्या अंगणात एक विहीर होती, तिच्यात ते उतरले. त्याच्या पत्नीने विहिरीच्या तोंडावर एक झाकण टाकले व त्यावर धान्य पसरले. त्याबद्दल कोणालाही काहीही कळले नाही. अबशालोमाच्या माणसांनी जेव्हा त्या बाईच्या घरी येऊन विचारपूस केली, “अहीमाज व योनाथान कुठे आहेत?” तिने उत्तर दिले, “ते ओढ्यापलीकडे गेले आहेत.” त्या माणसांनी शोध केला, पण त्यांना ते सापडले नाही. म्हणून ते यरुशलेमास परत गेले. ते तिथून निघून गेल्यानंतर, दोघेजण विहिरीतून बाहेर आले आणि दावीद राजाला जाऊन सांगितले, ते त्याला म्हणाले, “लवकर निघा आणि नदी पार करा; अहीथोफेलने तुमच्याविरुद्ध अमुक सल्ला दिला आहे.” तेव्हा दावीद आणि त्याच्या बरोबरच्या सर्व लोकांनी यार्देन नदी पार केली. दिवस उजाडेपर्यंत यार्देन पार केली नाही असा कोणीही मागे राहिला नाही. इकडे अबशालोमने आपल्या सल्ल्यानुसार केले नाही असे अहीथोफेलने पाहिले, तेव्हा त्याने आपल्या गाढवावर खोगीर घातले आणि आपल्या जन्मगावी, आपल्या घराकडे निघून गेला. त्याने आपले घर नीटनेटके करून फाशी घेतली. तो मरण पावला आणि त्याला त्याच्या पित्याच्या कबरेत पुरले. नंतर दावीद महनाईम येथे गेला आणि अबशालोम सर्व इस्राएली सैन्यासह यार्देन पार करून गेला. अबशालोमने योआबाच्या जागी अमासाची सेनापती म्हणून नेमणूक केली. अमासा हा इथ्रा इश्माएली याचा पुत्र असून, नाहाशाची कन्या, जेरुइयाहची बहीण योआबाची आई अबीगईल हिच्याशी त्याचा विवाह झाला होता. अबशालोम व इस्राएली सैन्याने गिलआद देशात तळ दिला. दावीद जेव्हा महनाईम येथे पोहोचला, तेव्हा अम्मोन्यांच्या राब्बाह येथील नाहाशाचा पुत्र शोबाई आणि लो-देबार येथील अम्मीएलाचा पुत्र माखीर आणि रोगलीम येथील गिलआदी बारजिल्लई यांनी दावीद आणि त्याच्या लोकांसाठी बिछाने आणि पात्रे, मातीची भांडी आणली. त्यांना खाण्यासाठी गहू व जव, पीठ आणि भाजलेली धान्ये, शेंगा व डाळी, मध व दही, मेंढरे आणि गाईच्या दुधाचा खवा, हे सुद्धा आणले. कारण ते म्हणाले, “रानात दावीद आणि त्याचे लोक थकलेले, भुकेले व तहानलेले झाले असतील.”