YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 3:1-12

२ राजे 3:1-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अहाबाचा पुत्र यहोराम शोमरोनात राज्य करू लागला; त्याने बारा वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, तरी आपल्या आईबापाइतके केले नाही; कारण त्याच्या बापाने केलेला बआलमूर्तीचा स्तंभ त्याने काढून टाकला. तरी जी पापकर्मे नबाटाचा पुत्र यराबाम ह्याने इस्राएलाकडून करवली त्यांचे त्याने अवलंबन केले; ती त्याने सोडली नाहीत. मवाबाच्या राजा मेशा हा मेंढरांचे कळप बाळगून होता; तो इस्राएलाच्या राजाला एक लाख कोकरांची व एक लाख एडक्यांची लोकर खंडणी म्हणून देत असे. अहाब मेल्यावर मवाबाचा राजा इस्राएलाच्या राजावर उलटला. त्या वेळी यहोराम राजाने शोमरोनातून बाहेर निघून सर्व इस्राएलाची जमवाजमव केली. त्याने जाऊन यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याला असा निरोप पाठवला की, “मवाबाचा राजा माझ्यावर उलटला आहे, तर त्याच्याशी लढायला आपण माझ्याबरोबर येता काय?” तो म्हणाला, “हो, मी येतो; आपण आणि मी एकच; माझे लोक ते आपले लोक; माझे घोडे ते आपले घोडे.” त्याने विचारले, “कोणत्या मार्गाने आपण जावे?” त्याने म्हटले, “अदोमी रानाच्या वाटेने.” त्याप्रमाणे इस्राएलाचा राजा, यहूदाचा राजा आणि अदोमाचा राजा ह्यांनी कूच केले; त्यांनी वळसा घेऊन सात मजला केल्यानंतर सर्व सेना व त्यांच्याबरोबर असलेली जनावरे ह्यांना प्यायला पाणी मिळेना. तेव्हा इस्राएलाचा राजा म्हणाला, “अरेरे! ह्या तिघा राजांना मवाबाच्या हाती द्यावे म्हणूनच परमेश्वराने त्यांना एकत्र केले आहे.” तेव्हा यहोशाफाट म्हणाला, “ज्याच्या द्वारे आपल्याला परमेश्वराला प्रश्‍न करता येईल असा परमेश्वराचा कोणी संदेष्टा येथे नाही काय?” इस्राएलाच्या राजाच्या सेवकांपैकी एकाने सांगितले, “एलीयाच्या हातावर पाणी घालणारा शाफाटाचा पुत्र अलीशा येथे आहे.” यहोशाफाट म्हणाला, “परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त होत असते.” मग इस्राएलाचा राजा, यहोशाफाट व अदोमाचा राजा हे त्याच्याकडे गेले.

सामायिक करा
२ राजे 3 वाचा

२ राजे 3:1-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

यहूदाचा राजा यहोशाफाट याच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी, अहाबाचा मुलगा योराम शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला; त्याने बारा वर्षे राज्य केले. यहोरामाने परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट अशी कृत्ये केली, पण आपल्या आई-वडिलांसारखे त्याने केले नाही; त्याने त्याच्या वडिलांनी बआलमूर्तीच्या पूजेसाठी केलेला स्तंभ काढून टाकला. असे असले तरी नबाटचा मुलगा यराबाम ज्याने इस्राएलास पाप करायला लावले, त्याच्या पापास तो चिकटून राहिला. ती त्याने सोडली नाहीत. आता मवाबाचा राजा मेशा कळपांचा धनी होता. तो इस्राएलाच्या राजाला एक लक्ष मेंढया आणि एक लक्ष एडके लोकरींसूद्धा देत असे. पण अहाबाच्या मूत्यूनंतर, मवाबाच्या राजाने इस्राएलाच्या राजाविरूद्ध बंड केले. त्या वेळेस राजा योराम शोमरोन मधून बाहेर पडला आणि त्याने सर्व इस्राएल लोकांस एकत्र केले. यहूदाचा राजा यहोशाफाट याच्याकडे त्याने असा निरोप पाठवला की, “मवाबाच्या राजाने माझ्याविरुध्द बंड केले आहे. तू माझ्याबरोबर मवाबाविरूद्ध लढाईला येशील काय?” यहोशाफाटाने सांगितले, “होय, मी जरुर येईन, जसा तू तसा मी, जसे तुझे लोक तसे माझे लोक, जसे तुझे घोडे तसे माझे घोडे.” नंतर तो बोलला “कोणत्या वाटेने हल्ला करायला जायचे?” यावर, “अदोमच्या वाळवंटाच्या दिशेने” असे यहोशाफाट ने सांगितले. मग इस्राएलचा राजा, यहूदा आणि अदोमाच्या राजाबरोबर चालत सात दिवसाच्या वाटेचा फेरा केल्यावर, तिथे त्यांच्या सैन्याला, घोड्यांना, तसेच त्यांच्याबरोबरची जनावरे याकरिता पाणी सापडले नाही. तेव्हा इस्राएलाचा राजा यहोराम म्हणाला, “हे काय आहे? मवाबांच्या हातून पराभव पत्करावा म्हणून परमेश्वराने आम्हा तीन राजांना एकत्र आणले काय?” परंतू यहोशाफाट म्हणाला, “ज्याच्याकडून आपण परमेश्वराचा सल्ला घ्यावा असा येथे परमेश्वराचा एखादा संदेष्टा नाही काय?” तेव्हा इस्राएलाच्या राजाच्या एका सेवकाने उत्तर दिले, “शाफाटाचा मुलगा अलीशा इथेच आहे, जो एलीयाच्या हातावर पाणी घालत असे.” यहोशाफाट म्हणाला, “परमेश्वराचे वचन त्याच्या सोबत आहे.” तेव्हा इस्राएलाचा राजा व यहोशाफाट आणि अदोमचा राजा खाली त्याच्याकडे गेले.

सामायिक करा
२ राजे 3 वाचा

२ राजे 3:1-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

यहूदीयाचा राजा यहोशाफाटच्या शासनकाळात अठराव्या वर्षी अहाबाचा पुत्र यहोराम हा शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला. त्याने बारा वर्षे राज्य केले. याहवेहच्या दृष्टीत त्याने जे वाईट ते केले, परंतु त्याने आपल्या आई वडिलांसारखे केले नाही. त्याने त्याच्या पित्याने उभारलेला बआलचा मूर्तिस्तंभ पाडून टाकला. तरीपण, नेबाटाचा पुत्र यरोबोअमने इस्राएली लोकांना जे पाप करावयाला लावले, त्या पापास तो चिकटून राहिला; त्याने ती पापे सोडली नाही. मोआबाचा राजा मेशा हा मेंढरांचे कळप बाळगून होता आणि तो इस्राएली राजास कर म्हणून दरवर्षी एक लाख मेंढरे आणि एक लाख मेंढ्याची लोकर देत असे. परंतु अहाबाच्या मृत्यूनंतर मोआबाच्या राजाने इस्राएलविरुद्ध बंड पुकारले. तेव्हा यहोराम राजा शोमरोनातून बाहेर निघाला आणि सर्व इस्राएली लोकांना एकत्र केले. यहूदीयाचा राजा यहोशाफाटला हा निरोप पाठविला: “मोआबाच्या राजाने माझ्याविरुद्ध बंड पुकारले आहे. तेव्हा त्याच्याविरुद्ध लढण्यास माझ्यासोबत येशील काय?” यहोशाफाटने उत्तर दिले, “मी तुझ्यासोबत येईन. जसा तू तसा मी, जे माझे लोक ते तुझे लोक, जे माझे घोडे ते तुझे घोडे.” यहोशाफाटने विचारले, “आपण कोणत्या मार्गाने हल्ला करावा?” योरामाने उत्तर दिले, “एदोमाच्या वाळवंटाकडून.” त्याप्रमाणे इस्राएलाचा राजा, यहूदीयाचा राजा आणि एदोमाचा राजा यांच्यासोबत निघाला. सात दिवसाच्या फेरीनंतर, सैनिकांजवळ त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासोबत असलेल्या प्राण्यांसाठी पाणी उरले नाही. “हे काय!” इस्राएलाचा राजा म्हणाला. “याहवेहने आम्हा तीन राजांना मोआबाच्या हातात देण्यासाठी एकत्र केले आहे का?” परंतु यहोशाफाटने विचारले, “याहवेहचा एखादा संदेष्टा इथे नाही काय, म्हणजे आपण याहवेहला विचारू शकू?” तेव्हा इस्राएलाच्या राजाच्या अधिकार्‍याने उत्तर दिले, “शाफाटाचा पुत्र अलीशा इथे आहे. जो एलीयाहच्या हातावर पाणी घालत असे.” यहोशाफाटने म्हटले, “याहवेहचे वचन त्याच्यासोबत आहे.” मग इस्राएलाच्या राजा आणि यहोशाफाट व एदोम हे राजे त्याला भेटण्यास गेले.