YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 23:31-37

२ राजे 23:31-37 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

यहोआहाज तेव्हा तेवीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर तीन महिने राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल लिब्नाच्या यिर्मया याची ती मुलगी. यहोआहाज परमेश्वराच्या दृष्टीने गैर वागला. त्याचे वर्तन आपल्या पूर्वजांसारखेच होते. फारो-नखोने हमाथ देशातील रिब्ला येथे यहोआहाजाला बेड्या घातल्या. त्यामुळे यहोआहाजाला यरूशलेमामध्ये राज्य करता येईना. फारो-नखोने यहूदाकडून एक हजार किक्कार चांदी आणि एक किक्कार सोने जबरदस्तीने वसूल केले. फारो-नखोने योशीयाचा मुलगा एल्याकीम याला राजा केले एल्याकीम गादीवर आला. एल्याकीमचे नाव फारो-नखोने बदलून यहोयाकीम केले; आणि यहोआहाजाला मिसरला नेले. यहोआहाज तेथे मरण पावला. यहोयाकीमाने फारोला सोनेचांदी दिले तरी फारो नखोयास देण्यासाठी सामान्य लोकांवर कर बसवला. तेव्हा प्रत्येकाला आपल्या वाटचे थोडे सोने रुपे द्यावे लागले. यहोयाकीमाने मग फारो नखोयास पैसे दिले. यहोयाकीम राजा झाला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर अकरा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव जबूदा. ती रुमा येथील पदाया याची मुलगी. यहोयाकीमचे वर्तन परमेश्वरास न पटणारे होते. आपल्या पूर्वजांप्रमाणेच तो गैर वागला.

सामायिक करा
२ राजे 23 वाचा

२ राजे 23:31-37 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

वयाच्या तेविसाव्या वर्षी यहोआहाज राजा झाला आणि त्याने तीन महिने यरुशलेमात राज्य केले, त्याच्या आईचे नाव हमूटल असे होते; ती लिब्नाह येथील यिर्मयाहची कन्या होती. त्याने आपल्या पूर्वजांच्या प्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले. त्याने यरुशलेमात राज्य करू नये म्हणून फारोह नखोने त्याला हमाथातील रिब्लाह येथे बेड्या घालून ठेवले. फारोह नखोने यहूदीयावर शंभर तालांत चांदी आणि एक तालांत सोने असा कर लादला. फारोह नखोने योशीयाहचा पुत्र एल्याकीमला त्याच्या पित्याच्या जागी राजा केले आणि एल्याकीमचे नाव बदलून यहोयाकीम ठेवले. परंतु त्याने यहोआहाजाला इजिप्तमध्ये नेले आणि तिथे तो मरण पावला. यहोयाकीमने फारोह नखोने मागितलेले सोने आणि चांदी दिली. असे करण्यासाठी त्याने जमिनीवर कर लावला आणि तेथील लोकांकडून चांदी व सोने वसूल केले. वयाच्या पंचविसाव्या वर्षी यहोयाकीम राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये अकरा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव जबूदाह होते; ती रुमाह येथील पदायाहची कन्या होती. त्याच्या पूर्वजांच्या प्रमाणे त्याने याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.

सामायिक करा
२ राजे 23 वाचा

२ राजे 23:31-37 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

यहोआहाज राज्य करू लागला तेव्हा तो तेवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत तीन महिने राज्य केले; त्याच्या आईचे नाव हमूटल; ही लिब्नाकर यिर्मया ह्याची कन्या. त्याच्या वाडवडिलांनी केले होते त्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. यरुशलेमेत त्याला राज्य करता येऊ नये म्हणून फारो-नखो ह्याने हमाथ देशातले रिब्ला येथे त्याला बेड्या घालून ठेवले आणि त्याच्या देशावर शंभर किक्कार1 चांदी व एक किक्कार सोने एवढी खंडणी बसवली. मग फारो-नखो ह्याने योशीयाचा पुत्र एल्याकीम ह्याला त्याच्या बापाच्या जागी राजा केले, त्याने त्याचे नाव बदलून यहोयाकीम असे ठेवले; यहोआहाज मिसर देशाला गेल्यावर मरण पावला. यहोयाकीम ह्याने फारोला सोने व रुपे दिले; पण हा पैसा फारोच्या हुकमाप्रमाणे देण्यासाठी त्याला देशावर कर बसवावा लागला; देशातल्या सर्व लोकांवर कर बसवून फारो-नखो ह्याला देण्यासाठी त्याने प्रत्येकाकडून सोने व रुपे वसूल केले. यहोयाकीम राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत अकरा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव जबूदा; ती रुमा येथला पदाया ह्याची कन्या. त्याने आपल्या पूर्वजांच्या सर्व करणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले.

सामायिक करा
२ राजे 23 वाचा