वयाच्या तेविसाव्या वर्षी यहोआहाज राजा झाला आणि त्याने तीन महिने यरुशलेमात राज्य केले, त्याच्या आईचे नाव हमूटल असे होते; ती लिब्नाह येथील यिर्मयाहची कन्या होती. त्याने आपल्या पूर्वजांच्या प्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले. त्याने यरुशलेमात राज्य करू नये म्हणून फारोह नखोने त्याला हमाथातील रिब्लाह येथे बेड्या घालून ठेवले. फारोह नखोने यहूदीयावर शंभर तालांत चांदी आणि एक तालांत सोने असा कर लादला. फारोह नखोने योशीयाहचा पुत्र एल्याकीमला त्याच्या पित्याच्या जागी राजा केले आणि एल्याकीमचे नाव बदलून यहोयाकीम ठेवले. परंतु त्याने यहोआहाजाला इजिप्तमध्ये नेले आणि तिथे तो मरण पावला. यहोयाकीमने फारोह नखोने मागितलेले सोने आणि चांदी दिली. असे करण्यासाठी त्याने जमिनीवर कर लावला आणि तेथील लोकांकडून चांदी व सोने वसूल केले. वयाच्या पंचविसाव्या वर्षी यहोयाकीम राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये अकरा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव जबूदाह होते; ती रुमाह येथील पदायाहची कन्या होती. त्याच्या पूर्वजांच्या प्रमाणे त्याने याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.
2 राजे 23 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 2 राजे 23:31-37
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ