YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 34:1-18

२ इतिहास 34:1-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

योशीया राज्य करू लागला तेव्हा तो आठ वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत एकतीस वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले; ज्या मार्गांनी त्याचा पूर्वज दावीद चालला त्यांनीच तोही चालला; उजवीडावीकडे वळला नाही. आपल्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी तो अल्पवयी असतानाच आपला पूर्वज दावीद ह्याच्या देवाच्या भजनी लागला; बाराव्या वर्षी तो उच्च स्थाने, अशेरा मूर्ती आणि कोरीव व ओतीव मूर्ती यहूदा व यरुशलेम ह्यांतून काढून टाकू लागला. लोकांनी त्याच्यासमक्ष बआल मूर्तींच्या वेद्या मोडून टाकल्या; त्यांच्या वरच्या भागी असलेल्या सूर्यमूर्ती त्याने फोडूनतोडून टाकल्या; अशेरामूर्ती आणि कोरीव व ओतीव मूर्ती त्याने फोडून त्यांचे चूर्ण केले व ते चूर्ण जे त्यांना यज्ञ करीत असत त्यांच्या कबरांवर पसरले. पुजार्‍यांच्या अस्थी त्याने त्यांच्याच वेद्यांवर जाळून टाकल्या; ह्याप्रमाणे त्याने यहूदा व यरुशलेम ही शुद्ध केली. त्याने मनश्शे, एफ्राईम, शिमोन व नफताली येथपर्यंतच्या शहरांत व त्यांच्या सभोवतालच्या ओस पडलेल्या जागी तसेच केले. त्याने वेद्या मोडून टाकल्या, अशेरामूर्ती व कोरीव मूर्ती कुटून त्यांचे चूर्ण केले आणि इस्राएल देशातल्या सर्व सूर्यमूर्ती त्याने तोडूनफोडून टाकल्या आणि मग तो यरुशलेमेस परत आला. आपल्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी योशीयाने देशाची व मंदिराची शुद्धी केल्यावर आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिराची दुरुस्ती करण्यास शाफान बिन असल्या, नगराचा कारभारी मासेया आणि योवाह बिन योवाहाज अखबारनवीस ह्यांना पाठवले. ते मुख्य याजक हिल्कीया ह्याच्याकडे गेले आणि द्वारपाळ लेवी ह्यांनी मनश्शे, एफ्राईम, इस्राएलाचे अवशिष्ट लोक, सर्व यहूदा व बन्यामीन आणि यरुशलेमनिवासी ह्या सर्वांकडून जो पैसा लेव्यांनी जमा करून देवाच्या मंदिरात आणला होता तो त्यांनी त्याच्या स्वाधीन केला. त्यांनी तो परमेश्वराच्या मंदिराची देखरेख करणार्‍या कामगारांच्या हाती दिला, आणि त्या मंदिराची जी मोडतोड झाली होती ती दुरुस्त करण्याकडे तो त्या कामगारांनी लावला. तासलेले चिरे, कैच्यांसाठी लाकूड आणि यहूदाच्या राजांनी मोडून टाकलेल्या घरांसाठी कडीपाट विकत घेण्यास त्यांनी तो पैसा सुतार व बांधकाम करणारे ह्यांना दिला. त्या माणसांनी ते काम सचोटीने केले; त्यांच्यावर देखरेख करण्यास नेमलेले मरारी वंशातील लेव्यांपैकी यहथ व ओबद्या, आणि कहाथी वंशातील जखर्‍या व मशुल्लाम हे होते; गायनवादनाचे मर्म जाणणारे लेवी हेही होते. बोजे वाहणार्‍यांवरही ते देखरेख करीत आणि हरप्रकारचे काम करणार्‍यांकडून ते काम करवून घेत; लेव्यांपैकी काही लेखक, कारभारी व द्वारपाळ होते. परमेश्वराच्या मंदिरात आणलेला पैसा बाहेर आणत असता मोशेच्या द्वारे दिलेला परमेश्वराच्या नियमशास्त्राचा ग्रंथ हिल्कीया याजकाला सापडला. हिल्कीयाने शाफान चिटणीस ह्याला सांगितले की, “परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” मग हिल्कीयाने तो ग्रंथ शाफानास दिला. शाफान तो ग्रंथ घेऊन राजाकडे गेला आणि त्याला त्याने अशी खबर दिली की, “तुझ्या दासांना जे काही काम सोपवले होते ते ते करीत आहेत; आणि परमेश्वराच्या मंदिरात जो पैसा मिळाला तो थैल्यांत भरून देखरेख करणारे व कामगार ह्यांच्या हवाली केला आहे.” शाफान चिटणीसाने राजाला आणखी असे सांगितले की, “हिल्कीया याजकाने मला एक ग्रंथ दिला आहे.” शाफानाने तो राजाला वाचून दाखवला.

सामायिक करा
२ इतिहास 34 वाचा

२ इतिहास 34:1-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

योशीया, राजा झाला तेव्हा आठ वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेमध्ये एकतीस वर्षे राज्य केले. त्याने वर्तन योग्य प्रकारचे होते परमेश्वराची त्याच्याकडून जशी अपेक्षा होती तसेच तो वागला आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणे त्याने सत्कृत्ये केली. सन्मार्गावरुन तो ढळला नाही. आपल्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षीच तो आपला पूर्वज दावीद याच्या परमेश्वराच्या भजनी लागला. योशीयाने लहान वयातच हा मार्ग पत्करला आणि कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी यहूदा आणि यरूशलेमेला शुद्ध केले, उंचस्थाने, अशेरा देवीचे खांब, कोरीव आणि ओतीव मूर्ती यांची मोडतोड केली. लोकांनी त्याच्या समोरच बआलदेवतांच्या मूर्ती फोडून टाकल्या. वरच्या भागात असलेल्या धूप जाळण्याच्या वेद्या योशीयाने उद्ध्वस्त केल्या. अशेराच्या मूर्ती ओतीव आणि कोरीव मूर्तीचाही त्याने पार चुराडा करून टाकला आणि हे चूर्ण, ज्या लोकांनी बआल देवतांसाठी यज्ञ केले त्यांच्या कबरीवर पसरले. बआल देवतांची पूजा करणाऱ्या याजकांच्या अस्थी देखील त्याने त्यांच्याच वेद्यांवर जाळून टाकल्या. अशाप्रकारे त्याने यहूदा आणि यरूशलेमला शुद्ध केले. मनश्शे, एफ्राइम, शिमोन, नफताली येथपर्यंतच्या शहरांतून आणि त्यांच्या आसपासच्या पडीक जागेत त्याने हेच केले. त्याने वेद्या मोडून टाकल्या, अशेरा खांबांची मोडतोड करून चूर्ण केले धूपाच्या वेद्या उखडणे ही इस्राएलभरची मोहीम उरकल्यावर योशीया यरूशलेमेला परतला. योशीयाने राज्याची सूत्रे हाती घेतल्याच्या अठराव्या वर्षी शाफान, मासेया, आणि योवाह यांना परमेश्वर देवाचे मंदिर दुरुस्तीसाठी पाठवले. शाफानच्या पित्याचे नाव असल्या, मासेया हा नगराचा कारभारी होता आणि योवाहाचे पिता योवाहाज. योवाह हा बखरकार होता. यहूदा आणि मंदिर यांच्या शुद्धीकरणासाठी मंदिराच्या डागडुजीचे हे काम योशीयाने अंगावर घेतले. ही माणसे हिल्कीया या मुख्य याजकाकडे गेली. मनश्शे, एफ्राइम आणि उर्वरित सर्व इस्राएलातून लोकांनी देवाच्या मंदिरासाठी दिलेला पैसा लेवी द्वारपालांनी जमा केला होता. सर्व यहूदा प्रांत, बन्यामिनचा प्रदेश आणि यरूशलेमेतून देखील त्यांनी पैसे जमा केले होते. ही रक्कम हिल्कीयाकडे त्यांनी सुपूर्त केली. मग, परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामावर देखरेख करणाऱ्यांना लेवींनी हे पैसे दिले आणि परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी कामगारांना दिले. तासलेले चिरे, लाकूड यांच्या खरेदीसाठी गवंडी, सुतार या लोकांस पैसे देण्यात आले. मंदिराच्या दुरुस्तीसाठी आणि कडीपाटासाठी लाकूड लागले. यहूदाचा राजांनी यापूर्वी मंदिराची योग्य देखभाल न केल्यामुळे मंदिराच्या इमारती जीर्ण झाल्या होत्या. कामगारांनी मन लावून काम केले. यहथ व ओबद्या हे मरारी कुळातील लेवी देखरेख करत होते. कहाथी वंशातील जखऱ्या आणि मशुल्लाम हे ही देखरेखीच्या कामावर होते. वाद्ये वाजवण्यात निपुण असलेले लेवीसुध्दा होते. ते कारागिरांवर आणि मजुरांवर देखरेख करत होते. चिटणीस, कारभारी आणि द्वारपाल म्हणून काही लेवी काम करत होते. परमेश्वराच्या मंदिरातील पैसा लेवी बाहेर आणत असताना हिल्कीया या याजकाला मोशेद्वारे आलेला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला. हिल्कीयाने शाफान चिटणीसास असे सांगितले कि, “परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” मग हिल्कीयाने शाफानाला तो ग्रंथ दिला. शाफानने तो योशीयाकडे आणला. राजाला तो म्हणाला, “तुझे सेवक तुझ्या आज्ञेप्रमाणे वागत आहेत. परमेश्वराच्या मंदिरातील पैसा घेऊन त्यातून ते देखरेख करणाऱ्यांना आणि मजुरांना वेतन देत आहेत” शाफान पुढे राजाला म्हणाला, “याजक हिल्कीयाने मला हे पुस्तक दिले आहे.” शाफानने मग राजाला पुस्तकातील मजकूर वाचून दाखवला.

सामायिक करा
२ इतिहास 34 वाचा

२ इतिहास 34:1-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

वयाच्या आठव्या वर्षी योशीयाह राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये एकतीस वर्षे राज्य केले. याहवेहच्या दृष्टीने जे योग्य तेच त्याने केले आणि उजवीकडे किंवा डावीकडे न वळता त्याने त्याचे पूर्वज दावीदाच्या मार्गांचे पालन केले. त्याच्या राज्यकाळाच्या आठव्या वर्षी, तो लहान असतानाच त्याचे पूर्वज दावीदाच्या परमेश्वराचा त्याने शोध घेण्यास सुरुवात केली. त्याच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी त्याने यहूदीया आणि यरुशलेम येथील उच्च स्थाने, अशेराचे स्तंभ आणि तिथे असलेल्या मूर्ती काढून शुद्धीकरण करण्यास सुरुवात केली. त्याच्या मार्गदर्शनाखाली बआल दैवतांच्या वेद्या पाडण्यात आल्या; त्याने त्यावर ज्या धूपवेद्या होत्या, त्यांचे तुकडे केले आणि अशेराचे स्तंभ आणि मूर्ती जमिनीवर पाडून फोडल्या. त्याचे त्याने बारीक तुकडे केले आणि ज्यांनी त्यांना बलिदान केले होते, त्यांच्या कबरेवर ते विखरून टाकले. त्याने याजकांची हाडे त्यांच्या वेदींवर जाळली आणि अशाप्रकारे त्याने यहूदीया आणि यरुशलेम यांचे शुद्धीकरण केले. मनश्शेह, एफ्राईम आणि शिमओन या गोत्रांच्या नगरांमध्ये, नफतालीपर्यंत आणि त्यांच्या सभोवतालच्या भग्नावशेषांमध्ये, त्याने वेद्या आणि अशेराचे स्तंभ मोडून टाकले आणि मूर्तींचा चुरा करून पूड केली आणि संपूर्ण इस्राएलमधून सर्व धूपवेद्यांचे तुकडे केले. नंतर तो यरुशलेमकडे परत गेला. योशीयाहच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी, भूमी आणि मंदिर शुद्ध करण्यासाठी, त्याने अजल्याहचा पुत्र शाफान आणि त्या नगराचा अधिपती मासेयाह यांना, नोंद करणारा यहोआहाजचा पुत्र योवाहला त्याचे परमेश्वर याहवेहच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी पाठविले. ते मुख्य याजक हिल्कियाहकडे गेले व परमेश्वराच्या मंदिरात आलेले पैसे, जे लेव्यांनी व द्वारपालांनी मनश्शेह, एफ्राईम आणि इस्राएलच्या अवशिष्ट लोकांकडून आणि यहूदाह व बिन्यामीनच्या लोकांकडून, तसेच यरुशलेमच्या रहिवाशांकडून गोळा केले होते ते राजाला दिले. नंतर त्यांनी ते याहवेहच्या मंदिराच्या कामावर देखरेख करण्यासाठी नेमलेल्या माणसांच्या हाती सोपविले. या पुरुषांनी याहवेहच्या मंदिराची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करणाऱ्या कामगारांना ते पैसे दिले. ज्या इमारती नाश होण्यासाठी यहूदीयाच्या राजांनी पडू दिल्या होत्या, त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी बांधकाम करणारे व सुतार यांना घडीव दगड आणि इमारतीचे वासे व तुळईची लाकडे खरेदी करण्यासाठीसुद्धा पैसे दिले. कामगारांनी विश्वासयोग्यतेने काम केले. यहथ आणि ओबद्याह, मरारी वंशजातून आलेले लेवी आणि कोहाथी वंशजातून आलेले जखर्‍याह आणि मशुल्लाम हे त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी तिथे नियुक्त केले होते. सर्व लेवीय लोकांना—कुशल वाद्य वादक— त्यांच्याकडे मजुरांची जबाबदारी आणि प्रत्येक कामावरील सर्व कामगारांवर मुकादम म्हणून देखरेख करण्याचे काम दिले होते. काही लेवी लोकांना सचिव, शास्त्री आणि द्वारपाल असे काम दिले. जेव्हा हिल्कियाह याजक याहवेहच्या मंदिरात नेण्यात आलेले पैसे बाहेर काढत होता तेव्हा त्याला मोशेच्याद्वारे देण्यात आलेला याहवेहच्या नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला. हिल्कियाह शाफान या सचिवाला म्हणाला, “मला याहवेहच्या मंदिरात नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” तो त्याने शाफानकडे दिला. तेव्हा शाफान याने तो ग्रंथ राजाकडे नेला आणि त्याला अहवाल दिला: “तुमचे अधिकारी ज्याकाही गोष्टी करण्यास वचनबद्ध आहेत, त्या सर्व गोष्टी ते करीत आहेत. त्यांना जो पैसा याहवेहच्या मंदिरात मिळाला, त्यांनी तो मंदिराचे कामगार व कामाची देखरेख करणार्‍यांच्या हाती दिला आहे.” नंतर सचिव शाफान याने राजाला कळविले, “हिल्कियाह याजकाने मला एक पुस्तक दिले आहे.” आणि शाफानाने त्यामधून राजाच्या समोर वाचले.