१ इतिहास 11:1-3
१ इतिहास 11:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग सर्व इस्राएल लोक हेब्रोन येथे दाविदाकडे जमा होऊन म्हणू लागले, “पाहा, आम्ही आपल्या हाडामांसाचे आहोत; गतकाळी शौल आमच्यावर राजा असताना इस्राएलाची ने-आण करणारे अग्रणी आपणच होता; आणि आपला देव परमेश्वर आपणाला म्हणाला होता की, ‘माझी प्रजा इस्राएल ह्यांचा मेंढपाळ व अधिपती तूच होशील.”’ ह्या प्रकारे इस्राएल लोकांचे सर्व वडील जन हेब्रोनात राजाकडे आले, आणि दाविदाने त्यांच्याशी परमेश्वरासमोर हेब्रोनात करार केला आणि परमेश्वराने शमुवेलाच्या द्वारे सांगितले होते त्या वचनानुसार त्यांनी दाविदाला अभिषेक करून इस्राएलाचा राजा नेमले.
१ इतिहास 11:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग सर्व इस्राएल लोक हेब्रोन येथे दावीदाकडे आले व ते त्यास म्हणाले, “पहा, आम्ही तुझ्याच मांसाचे व हाडाचे आहोत. मागील दिवसात, शौल जेव्हा आमच्यावर राजा होता, तेव्हा लढाईत तू इस्राएलाचे नेतृत्व केले आहेस. परमेश्वर तुझा देव तुला म्हणाला, ‘तू माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ होशील आणि माझ्या इस्राएल लोकांवर राज्य करशील.” असे इस्राएल लोकांचे सर्व वडील राजाकडे हेब्रोन येथे आले आणि दावीदाने परमेश्वरासमोर त्यांच्याशी हेब्रोनात करार केला. तेव्हा त्यांनी दावीदाला इस्राएलावर राजा होण्यास अभिषेक केला. याप्रकारे शमुवेलाने सांगितलेले परमेश्वराचे वचन खरे ठरले.
१ इतिहास 11:1-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग इस्राएलचे पुढारी एकत्र आले व हेब्रोन येथे दावीदाकडे आले आणि त्याला म्हणाले, “आम्ही तर तुमचेच मांस आणि रक्त आहोत. मागील काळात, जेव्हा शौल राजा होता, तेव्हा इस्राएलला त्यांच्या युद्धात चालविणारे तुम्हीच तर होता. आणि याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला म्हटले, ‘माझ्या इस्राएली लोकांचा मेंढपाळ व त्यांचा अधिकारी तू होशील.’ ” जेव्हा इस्राएलचे सर्व वडील लोक हेब्रोनात दावीद राजाकडे आले होते, तेव्हा त्याने याहवेहसमोर हेब्रोन येथे त्यांच्याशी एक करार केला आणि त्यांनी दावीदाचा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला, जसे याहवेहने शमुवेलद्वारे वचन दिले होते.