YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 इति. 11:1-3

1 इति. 11:1-3 IRVMAR

मग सर्व इस्राएल लोक हेब्रोन येथे दावीदाकडे आले व ते त्यास म्हणाले, “पहा, आम्ही तुझ्याच मांसाचे व हाडाचे आहोत. मागील दिवसात, शौल जेव्हा आमच्यावर राजा होता, तेव्हा लढाईत तू इस्राएलाचे नेतृत्व केले आहेस. परमेश्वर तुझा देव तुला म्हणाला, ‘तू माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ होशील आणि माझ्या इस्राएल लोकांवर राज्य करशील.” असे इस्राएल लोकांचे सर्व वडील राजाकडे हेब्रोन येथे आले आणि दावीदाने परमेश्वरासमोर त्यांच्याशी हेब्रोनात करार केला. तेव्हा त्यांनी दावीदाला इस्राएलावर राजा होण्यास अभिषेक केला. याप्रकारे शमुवेलाने सांगितलेले परमेश्वराचे वचन खरे ठरले.