YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 11:1-3

१ इतिहास 11:1-3 MARVBSI

मग सर्व इस्राएल लोक हेब्रोन येथे दाविदाकडे जमा होऊन म्हणू लागले, “पाहा, आम्ही आपल्या हाडामांसाचे आहोत; गतकाळी शौल आमच्यावर राजा असताना इस्राएलाची ने-आण करणारे अग्रणी आपणच होता; आणि आपला देव परमेश्वर आपणाला म्हणाला होता की, ‘माझी प्रजा इस्राएल ह्यांचा मेंढपाळ व अधिपती तूच होशील.”’ ह्या प्रकारे इस्राएल लोकांचे सर्व वडील जन हेब्रोनात राजाकडे आले, आणि दाविदाने त्यांच्याशी परमेश्वरासमोर हेब्रोनात करार केला आणि परमेश्वराने शमुवेलाच्या द्वारे सांगितले होते त्या वचनानुसार त्यांनी दाविदाला अभिषेक करून इस्राएलाचा राजा नेमले.