YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 97

97
स्तोत्र 97
1याहवेह राज्य करतात, सर्व पृथ्वी उल्हासित होवो;
दूर असलेले तटवर्ती क्षेत्रही हर्ष करोत.
2मेघ व गडद अंधकार यांनी ते वेढलेले आहेत;
धार्मिकता आणि न्याय त्यांच्या राजासनाचा पाया आहे.
3अग्नी त्यांच्यापुढे चालतो,
आणि त्यांच्या शत्रूंना तो सर्व बाजूने भस्म करतो.
4त्यांच्या विजा जगाला प्रकाश देतात;
हे पाहून पृथ्वी कंपित होते.
5याहवेहच्या उपस्थितीत, समस्त पृथ्वीचे सत्ताधीश
व सगळे पर्वत मेणाप्रमाणे वितळतात.
6आकाश मंडल त्यांची नीतिमत्ता जाहीर करते;
संपूर्ण मानवजात त्यांचे गौरव पाहते.
7जे प्रतिमांची प्रौढी मिरवित होते,
ते मूर्तींचे सर्व उपासक फजीत झाले.
सर्व दैवतांनो, त्यांची आराधना करा!
8सीयोन ऐकते व उल्हासित होते,
याहवेह, तुमच्या निर्णयामुळे,
यहूदीयातील गावे हर्षभरित होतात.
9कारण याहवेह तुम्हीच पृथ्वीवर परमश्रेष्ठ आहात;
सर्व दैवतांहून तुम्ही अत्यंत थोर आहात.
10याहवेहवर प्रीती करणारे वाईटाचा द्वेष करोत,
कारण ते त्यांच्या भक्तांच्या जिवाचे रक्षण करतात
आणि दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवितात.
11नीतिमानांवर प्रकाश उजळतो
आणि निष्ठावंताची हृदये हर्ष पावतात.
12सर्व नीतिमान, याहवेहच्या ठायी आनंद करा,
आणि त्यांच्या पवित्र नावाला गौरव द्या.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 97: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन