YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 96

96
स्तोत्र 96
1याहवेहप्रीत्यर्थ एक नवे गीत गा;
हे सर्व पृथ्वी, याहवेहला समर्पित गीत गा.
2याहवेहसाठी स्तुतिस्तोत्रे गा; त्यांच्या नावाचा महिमा करा;
दररोज त्यांच्या तारणाची घोषणा करा.
3सर्व राष्ट्रांमध्ये त्यांचे गौरव,
सर्व लोकांमध्ये त्यांची अद्भुत कृत्ये जाहीर करा.
4कारण याहवेह थोर आणि स्तुतीस पात्र आहेत;
सर्व दैवतांपेक्षा त्यांचे भय बाळगणे यथायोग्य आहे.
5इतर देशांची दैवते केवळ मूर्ती आहेत.
परंतु याहवेहनी आकाशमंडलांची रचना केली आहे.
6राजवैभव आणि ऐश्वर्य त्यांच्या पुढे चालतात.
त्यांच्या उपस्थितीत सामर्थ्य आणि महिमा असतो.
7अहो राष्ट्रातील सर्व कुळांनो याहवेहला गौरव द्या,
याहवेहला गौरव आणि सामर्थ्य द्या.
8याहवेहच्या नावाला योग्य ते गौरव द्या;
अर्पणे आणून त्यांच्या समक्षतेत या.
9त्यांच्या पवित्रतेच्या ऐश्वर्याने याहवेहची उपासना करा;
त्यांच्या उपस्थितीत हे पृथ्वी कंपित हो!
10राष्ट्रांमध्ये म्हणा, “याहवेह राज्य करतात.”
सर्व सृष्टी दृढपणे स्थिर झालेली आहे; ती डळमळत नाही
सर्व लोकांचा ते न्यायीपणाने न्याय करतील.
11आकाशे हर्ष करो, पृथ्वी उल्लास करो;
सागर व त्यातील सर्वकाही त्यांच्या गौरवाची गर्जना करोत.
12शेते व त्यातील सर्वकाही अति आनंदाने नाचू लागोत;
वनातील सर्व झाडे हर्षाने गुणगान करो.
13सर्व सृष्टी याहवेहच्या सानिध्यात उल्हासित होवो, कारण ते येत आहेत,
पृथ्वीचा न्याय करण्यास ते येत आहेत;
ते धार्मिकतेने राष्ट्रांचा व
विश्वासूपणाने लोकांचा न्यायनिवाडा करतील.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 96: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन