YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 95

95
स्तोत्रसंहिता 95
1या हो या, आपण याहवेहचा जयजयकार करू या;
आपल्या तारणाच्या खडकासाठी आनंदाने जयघोष करू या.
2कृतज्ञ अंतःकरणांनी त्यांच्यापुढे येऊ;
आणि वाद्यसंगीतासह स्तुतिस्तोत्रे गाऊन स्तवन करू.
3कारण याहवेह हे महान परमेश्वर आहेत;
समस्त दैवतांवर ते सर्वोच्च राजा आहेत.
4पृथ्वीची खोल स्थळे त्यांच्या नियंत्रणात आहेत,
आणि पर्वताची शिखरेही त्यांचीच आहेत.
5समुद्र त्यांचेच आहेत, कारण ते त्यांनी उत्पन्न केले,
आणि कोरडी भूमीही त्यांचीच हस्तरचना आहे.
6या हो या, आपण नतमस्तक होऊन आराधना करू या,
आपले उत्पन्नकर्ता याहवेह, यांच्यापुढे गुडघे टेकू;
7कारण ते आपले परमेश्वर आहेत.
आपण त्यांच्या कुरणातील प्रजा
आणि त्यांचा संरक्षित मेंढरांचा कळप आहोत.
आज जर तुम्ही त्यांची वाणी ऐकली, तर किती बरे!
8“मरीबाह#95:8 मरीबाह अर्थात् भांडण येथे असताना केली तशी,
जसे मस्सा#95:8 मस्सा परीक्षा च्या दिवशी तुम्ही रानामध्ये केले तसे, तुमची अंतःकरणे कठीण करू नका.
9माझे अनेक चमत्कार पाहिलेले असतानाही,
तुमच्या पूर्वजांनी माझी परीक्षा घेऊन मला कसोटीस लावले.
10चाळीस वर्षे त्या पिढीवर मी फार संतापलो;
मी म्हणालो, ‘या लोकांची हृदये भटकलेली आहेत
आणि त्यांना माझे मार्ग कळलेच नाही.’
11मग मी रागाने शपथ घेतली की,
‘ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.’ ”

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 95: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन