YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 53

53
स्तोत्र 53
संगीत दिग्दर्शकासाठी. माहलथवर आधारित, दावीदाचे मासकील.
1मूर्ख आपल्या मनात म्हणतो,
“परमेश्वर अस्तित्वात नाही.”
ते बहकलेले आहेत आणि त्यांची कृत्ये दुष्टच समजावी,
कारण सत्कर्म करणारा कोणी नाही.
2मानवांमध्ये कोणी समंजस आहे का
परमेश्वराचा शोध करणारे कोणी आहे का
हे पाहण्यासाठी परमेश्वर स्वर्गातून
खाली पाहतात.
3प्रत्येकजण भटकून गेलेला आहेत;
प्रत्येकजण भ्रष्ट झाला आहे;
सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.
4दुष्कृत्य करणार्‍यांना हे ठाऊक नाही काय?
भाकरी खाण्यासारखे ते माझ्या लोकांना गिळून टाकतील.
ते कधीही परमेश्वराला हाक मारत नाहीत.
5पण पाहा, जिथे भिण्याचे कारण नव्हते, तिथे ते भयाने भरले.
परमेश्वराने त्यांची हाडे विखरून टाकली,
ज्यांनी तुमच्याविरुद्ध तळ दिला होता;
तुम्ही त्यांची फजिती केली, कारण ते परमेश्वराद्वारे लज्जित झाले आहेत.
6अहाहा! सीयोनातून इस्राएलची सुटका होईल!
जेव्हा परमेश्वर त्यांच्या प्रजेची पुनर्स्थापना करतील,
तेव्हा याकोब हर्ष करो आणि इस्राएल आनंद करो!

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 53: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन