स्तोत्रसंहिता 54
54
स्तोत्र 54
संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्यांच्या साथीने गायचे दावीदाचे मासकील. जेव्हा जिफी लोकांनी जाऊन शौलाला कळविले: “दावीद आमच्याजवळ लपला आहे.”
1परमेश्वरा, तुम्ही आपल्या नावाने माझे तारण करा;
आपल्या सामर्थ्याने मला निर्दोष जाहीर करा.
2परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐका.
माझ्या मुखातील शब्दांकडे कान द्या.
3कारण परकी माणसे माझ्याविरुद्ध उठली आहेत;
परमेश्वराचा आदर न करणारे निर्दयी लोक—
माझा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. सेला
4परंतु परमेश्वर निश्चितच माझे साहाय्यकर्ता आहेत;
परमेश्वरच आहेत, जे मला मदत करतात.
5माझ्या शत्रूंच्या दुष्ट कृत्त्यांचा मोबदला त्यांना मिळो;
परमेश्वरा, तुम्ही आपल्या विश्वासूपणाने त्यांचा नाश करा.
6मी स्वेच्छेने माझे यज्ञ तुम्हाला अर्पण करणार;
याहवेह, तुमच्या नावाची महिमा मी गाईन, कारण तुमचे नाव उत्तम आहे.
7तुम्ही मला माझ्या सर्व संकटातून सोडविले आहे,
आणि माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा पराजय पहिला आहे.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 54: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.