YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 115

115
स्तोत्र 115
1आमचे नको, हे याहवेह, आमचे नको,
तुमची प्रेमदया आणि तुमच्या विश्वसनीयते निमित्त,
तुमचेच नाव गौरवित होवो.
2इतर राष्ट्र असे का म्हणतात,
“यांचा परमेश्वर कुठे आहे?”
3आमचे परमेश्वर तर स्वर्गात आहेत;
त्यांना जे योग्य वाटते, तेच ते करतात.
4पण त्या तर मानवी हातांनी बनविलेल्या
चांदीच्या व सोन्याच्या मूर्ती आहेत.
5त्यांना तोंडे आहेत, पण बोलता येत नाही,
त्यांना डोळे आहेत, पण ते बघू शकत नाहीत.
6त्यांना कान आहेत, पण ऐकू येत नाही,
नाक असून वासही येत नाही.
7त्यांना हात असून स्पर्श करता येत नाही,
पाय आहेत पण चालता येत नाही;
त्यांच्या कंठातून कुठलाही ध्वनी बाहेर पडत नाही.
8मूर्ती घडविणारे त्यांच्यासारखेच होतील,
आणि त्यांच्यावर भरवसा ठेवणारेही तसेच होतील.
9हे समस्त इस्राएला, याहवेहवर भरवसा ठेव—
तेच त्यांचा साहाय्यकर्ता आणि ढाल आहेत.
10अहो अहरोनाच्या वंशजांनो, याहवेहवर भरवसा ठेवा—
तेच त्यांचा साहाय्यकर्ता आणि ढाल आहेत.
11अहो देवाचे भय मानणारे लोकहो, याहवेहवर भरवसा ठेवा—
तेच त्यांचा साहाय्यकर्ता आणि ढाल आहेत.
12याहवेह आमची आठवण ठेवतात, ते आम्हाला आशीर्वाद देतील:
ते इस्राएली लोकांना आशीर्वाद देतील,
ते अहरोनाच्या वंशजांना आशीर्वाद देतील,
13आणि जे याहवेहचे भय बाळगतात त्यांना आशीर्वाद देतील—
सर्व लहानथोरांना एकसमान.
14याहवेह तुम्हाला समृद्ध करो,
तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांनाही.
15याहवेह, ज्यांनी आकाश व पृथ्वी निर्माण केली तेच,
तुम्हाला आशीर्वादित करोत.
16सर्वोच्च स्वर्ग याहवेहचा आहे,
परंतु त्यांनी पृथ्वी मानवजातीला दिलेली आहे.
17मृतक व चिरनिद्रा घेणारे,
याहवेहची स्तुतिस्तोत्रे गात नसतात.
18परंतु आम्हीच याहवेहची स्तोत्रे गातो,
आता आणि सदासर्वकाळ.
याहवेहचे स्तवन करा.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 115: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन