YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 114

114
स्तोत्र 114
1जेव्हा इस्राएल इजिप्तमधून,
परकीय भाषेच्या लोकातून याकोब बाहेर पडला,
2यहूदाह परमेश्वराचे पवित्रस्थान,
आणि इस्राएल त्यांचे सार्वभौमत्व झाले.
3तांबड्या समुद्राने हे पाहून पळ काढला,
आणि यार्देन नदी माघारी गेली;
4पर्वतांनी मेंढ्यांप्रमाणे आणि टेकड्यांनी कोकरांसारख्या
उड्या मारल्या.
5हे समुद्रा, तू पलायन का केले?
अगे यार्देने, तू मागे का फिरलीस?
6पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांप्रमाणे,
टेकड्यांनो, तुम्ही कोकरांसारखे का बागडलात?
7अगे पृथ्वी, तू परमेश्वराच्या समक्षतेत,
याकोबाच्या देवासमोर, थरथर काप.
8कारण त्यांनीच खडकाचे झर्‍यात रूपांतर केले,
अत्यंत कणखर खडकास जलाचे स्त्रोत बनविले.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 114: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन