YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 113

113
स्तोत्र 113
1याहवेहचे स्तवन करा.
हे याहवेहच्या सेवकांनो, याहवेहचे स्तवन करा;
याहवेहच्या नावाची स्तुती करा.
2याहवेहच्या नामाचे स्तवन होत राहो,
आता आणि सदासर्वकाळ.
3सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत,
याहवेहच्या नामाचे स्तवन होवो.
4याहवेह सर्व राष्ट्रांहून उच्च आहेत;
त्यांचे गौरव गगनमंडळाहून उंच आहे.
5आमचे परमेश्वर याहवेह, यांच्या समान कोण आहे,
जे सर्वोच्च स्थानी सिंहासनावर विराजमान असतात,
6जे वरून ओणवून,
गगनमंडळ आणि पृथ्वीचे अवलोकन करतात?
7ते दीनांस धुळीतून वर काढतात,
आणि गरजवंतास राखेच्या ढिगार्‍यातून वर उचलून घेतात;
8ते त्यांना राजपुत्रांबरोबर,
आपल्या प्रजेच्या प्रधानांसह बसवितात.
9ते निपुत्रिक गृहिणीला तिच्या घरात स्थिरावतात,
आणि तिला मुले देऊन आनंदी माता बनवितात.
याहवेहचे स्तवन करा.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 113: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन