YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 101

101
स्तोत्र 101
दावीदाची रचना. एक स्तोत्र.
1हे याहवेह, तुमची प्रीती आणि न्याय याविषयी मी गीत गाईन;
मी तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.
2सुज्ञपणाने जीवन जगणे हे माझे लक्ष्य आहे—
तुम्ही माझ्याकडे कधी येणार?
माझ्या घरातील माझा व्यवहार
मी निष्कलंक तर्‍हेने करेन.
3मी कुठल्याच अनुचित वस्तूकडे
नजर टाकणार नाही.
मला विश्वासहीन लोकांच्या व्यवहारांचा तिरस्कार आहे.
त्यांच्यापासून मी अलिप्त राहीन.
4कुटिल हृदय माझ्यापासून दूर राहील;
अनीतीच्या कुठल्याच गोष्टीशी मी संबंध ठेवणार नाही.
5आपल्या शेजार्‍यांची गुप्तपणे निंदानालस्ती करणार्‍यास,
मी नष्ट करेन;
दुसर्‍यांकडे तुच्छतेने पाहणार्‍याचा व अहंकारी हृदयाच्या मनुष्याचा
सहवास मला असह्य वाटेल.
6देशातील निष्ठावान लोकांवर मी माझी दृष्टी लावेन,
जेणेकरून ते माझ्या सहवासात राहतील;
ज्यांचे आचरण दोषरहित असेल,
असेच लोक माझी सेवा करतील.
7परंतु जे इतरांची फसवणूक करतात,
अशांना मी माझ्या घरात राहू देणार नाही,
आणि जे असत्य बोलतात,
ते माझ्यापुढे उपस्थित राहणार नाहीत.
8दररोज सकाळी
मी आपल्या राज्यातील दुर्जनांना नष्ट करेन;
याहवेह देवाच्या या नगरीतील
प्रत्येक दुष्टाचा मी नायनाट करेन.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 101: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन