YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 100

100
स्तोत्र 100
एक स्तोत्र. उपकारस्तुतीचे गीत
1हे समस्त पृथ्वी, याहवेहसाठी जयघोष कर.
2आनंदाने याहवेहची आराधना करा;
हर्षगीतांसह त्यांच्या उपस्थितीत प्रवेश करा.
3याहवेह हेच परमेश्वर आहेत, हे जाणून घ्या.
ते आपले निर्माणकर्ते आहेत व तेच आपले स्वामी आहेत;#100:3 किंवा आम्ही त्यांच्या मालकीचे आहोत
आपण त्यांचे लोक, त्यांच्या कुरणातील मेंढराप्रमाणे आहोत.
4उपकारस्तुती करीत त्यांच्या द्वारातून आत जा;
स्तुती करीत त्यांच्या अंगणात प्रवेश करा;
त्यांचे उपकार माना, त्यांच्या नावाला महिमा द्या.
5कारण याहवेह चांगले आहेत आणि त्यांची प्रीती सनातन आहे;
त्यांचा विश्वासूपणा पिढ्यान् पिढ्या टिकून राहतो.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 100: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन