स्तोत्रसंहिता 1
1
पुस्तक 1
स्तोत्रसंहिता 1–41
स्तोत्र 1
1धन्य ते लोक,
जे दुष्टांच्या मसलतीने चालत नाहीत,
किंवा पापी लोकांच्या मार्गात उभे राहत नाहीत,
आणि थट्टा करणार्यांच्या संगतीमध्ये बसत नाहीत.
2पण ज्यांचा आनंद याहवेहच्या नियमांचे पालन करणे,
आणि त्यांच्या नियमावर रात्रंदिवस ध्यान करणे असतो.
3ते अशा वृक्षासारखे आहेत जे सतत वाहणार्या जलप्रवाहाजवळ लावलेले असते,
जे आपल्या ऋतूमध्ये फळ देते
आणि ज्यांची पाने कोमेजत नाहीत.
त्यांनी हाती घेतलेले प्रत्येक काम सिद्धीस जाते.
4परंतु दुष्ट तसे नाहीत.
ते वार्याने उडून जाणार्या
भुश्यासारखे आहेत.
5म्हणून दुष्ट न्यायसभेत,
किंवा पापी लोक नीतिमानांच्या सभेमध्ये उभे राहणार नाहीत.
6कारण नीतिमानांच्या मार्गावर याहवेह दृष्टी ठेवतात,
परंतु दुष्टांचा मार्ग सर्वनाशाकडेच ओढून नेतो.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 1: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.