इय्योब 42
42
इय्योब
1मग इय्योबाने याहवेहला म्हटले,
2“तुम्हाला सर्वगोष्टी शक्य आहेत हे मला माहीत आहे;
तुमचा कोणताही उद्देश निष्फळ होत नाही.
3तुम्ही विचारले, ‘हा कोण आहे जो अज्ञानी शब्दांनी माझ्या योजना अस्पष्ट करतो?’
खरोखर अद्भुत आणि माझ्या समजबुद्धीत नसणार्या गोष्टी,
त्याविषयी मी बोललो.
4“तुम्ही म्हणाला, ‘आता ऐक आणि मी बोलणार;
मी तुला प्रश्न करणार,
आणि तू मला उत्तर देशील.’
5माझ्या कानांनी तुमच्याविषयी ऐकले होते
परंतु आता माझ्या डोळ्यांनी तुम्हाला पाहिले आहे.
6म्हणून मी माझाच तिरस्कार करतो,
आणि धूळ व राखेत बसून पश्चात्ताप करतो.”
समारोप
7याहवेह या गोष्टी इय्योबाशी बोलल्यानंतर, ते एलीफाज तेमानीला म्हणाले, “मी तुझ्यावर व तुझ्या दोन्ही मित्रांवर रागावलो आहे, कारण माझा सेवक इय्योब बोलला, त्याप्रमाणे तुम्ही माझ्याबद्दल जे सत्य ते बोलला नाहीत. 8म्हणून आता सात बैल व सात मेंढे घेऊन माझा सेवक इय्योब याच्याकडे जा आणि स्वतःसाठी होमबलीचे अर्पण करा. माझा सेवक इय्योब तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि मी त्याची प्रार्थना स्वीकारेन व तुमच्या मूर्खतेनुसार तुमच्याशी वागणार नाही. माझा सेवक इय्योब माझ्याबद्दल जसे यथार्थ बोलला तसे तुम्ही माझ्याबद्दल बोलला नाही.” 9मग एलीफाज तेमानी, बिल्दद शूही व सोफर नामाथी यांनी याहवेहनी त्यांना सांगितल्याप्रमाणे केले आणि याहवेहने इय्योबाची प्रार्थना मान्य केली.
10इय्योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केल्यानंतर, याहवेहने त्याची मालमत्ता पुनर्स्थापित केली आणि त्याच्याकडे होते त्यापेक्षा दुप्पट त्याला परत दिले 11त्याचे सर्व भाऊ, बहिणी व ते सर्वजण जे त्याला पूर्वी ओळखत होते त्यांनी त्याच्या घरी येऊन त्याच्याबरोबर भोजन केले. त्यांनी त्याचे सांत्वन केले आणि याहवेहने त्याच्यावर आणलेल्या प्रत्येक संकटाविषयी सहानुभूती दाखविली, आणि प्रत्येकाने त्याला चांदीचे नाणे#42:11 किंवा केसिताह, जे त्या काळातील पैसे होते ज्याचे वजन किंवा मोल अज्ञात आहे व सोन्याची अंगठी दिली.
12याहवेहने इय्योबाच्या जीवनाच्या सुरवातीच्या दिवसांपेक्षा त्याच्या उतार वयात त्याला अधिक आशीर्वादित केले. त्याच्याजवळ चौदा हजार मेंढरे, सहा हजार उंट, बैलांच्या हजार जोड्या व हजार गाढवे होती. 13आणि त्याला सात मुले व तीन मुली होत्या. 14त्याने त्याच्या पहिल्या मुलीचे नाव यमीमा, दुसरीचे कसीया व तिसरीचे केरेन-हप्पूक असे ठेवले. 15संपूर्ण देशामध्ये इय्योबाच्या मुलींएवढ्या सुंदर मुली कुठेही नव्हत्या; त्यांच्या पित्याने त्यांच्या भावांबरोबर त्यांनाही वतन दिले.
16त्यानंतर इय्योब एकशेचाळीस वर्षे जगला; त्याने आपली लेकरे व त्यांची लेकरे अशा चार पिढ्या पाहिल्या. 17इय्योब वयस्कर व पूर्ण परिपक्व होऊन मरण पावला.
सध्या निवडलेले:
इय्योब 42: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.