YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 33

33
इस्राएली लोकांच्या प्रवासातील टप्पे
1मोशे आणि अहरोन यांच्या नेतृत्वाखाली इस्राएली लोक आपल्या तुकडीनुसार इजिप्तमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या प्रवासाचे टप्पे असे होते. 2याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने त्यांच्या प्रवासाच्या टप्प्यांची नोंद केली. टप्प्यानुसार त्यांचा प्रवास असा होता:
3पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, वल्हांडणाच्या दुसर्‍या दिवशी इस्राएली लोक रामसेस येथून निघाले. सर्व इजिप्ती लोकांदेखत ते मोठ्या धैर्याने चालत बाहेर पडले, 4त्यावेळी इजिप्तचे लोक आपल्या सर्व प्रथम जन्मलेल्या मुलांना ज्यांना याहवेहने जिवे मारले होते त्यांना दफन करीत होते; कारण याहवेहने त्यांच्या दैवतांवरही न्याय आणला होता.
5इस्राएली लोकांनी रामसेस सोडले व सुक्कोथ येथे तळ दिला.
6त्यांनी सुक्कोथ सोडले आणि वाळवंटाच्या काठावरील एथाम येथे तळ दिला.
7त्यांनी एथाम सोडले व बआल-सफोनच्या पूर्वेकडे पी-हाहीरोथ कडे वळले आणि मिग्दोलकडे तळ दिला.
8त्यांनी पी-हाहीरोथ सोडले व समुद्र पार रानात गेले आणि एथाम रानातील तीन दिवसांचा प्रवास केल्यानंतर माराह येथे त्यांनी तळ दिला.
9त्यांनी माराह सोडले व एलीम येथे गेले, त्या ठिकाणी पाण्याचे बारा झरे व खजुरीची सत्तर झाडे होती. तिथे त्यांनी तळ दिला.
10त्यांनी एलीम सोडले व तांबड्या समुद्राजवळ तळ दिला.
11त्यांनी तांबडा समुद्र सोडून सीनच्या रानात तळ दिला.
12सीनचे रान सोडून त्यांनी दोफकाह येथे तळ दिला.
13त्यांनी दोफकाह सोडले व अलूश येथे तळ दिला.
14नंतर त्यांनी अलूश सोडले व रफीदीम येथे तळ दिला. या ठिकाणी लोकांना पिण्यासाठी पाणी नव्हते.
15रफीदीम सोडल्यावर त्यांनी सीनायच्या रानात तळ दिला.
16मग सीनायच्या रानातून निघून त्यांनी किब्रोथ-हत्ताव्वा येथे तळ दिला.
17नंतर त्यांनी किब्रोथ-हत्ताव्वा सोडले आणि हसेरोथ येथे तळ दिला.
18त्यांनी हसेरोथ सोडले आणि रिथमाह येथे तळ दिला.
19मग त्यांनी रिथमाह सोडल्यावर रिम्मोन-पेरेस येथे तळ दिला.
20त्यांनी रिम्मोन-पेरेस सोडले व लिब्नाह येथे तळ दिला.
21मग त्यांनी लिब्नाह सोडले व रिस्साह येथे तळ दिला.
22त्यांनी रिस्साह सोडले आणि केहेलाथाह येथे तळ दिला.
23त्यांनी केहेलाथाह सोडले आणि शेफर पर्वतावर तळ दिला.
24नंतर त्यांनी शेफर पर्वत सोडला आणि हारादाह येथे तळ दिला.
25त्यांनी हारादाह सोडले आणि माखेलोथ येथे तळ दिला.
26माखेलोथ सोडल्यावर त्यांनी तहथ येथे तळ दिला.
27तहथ सोडून त्यांनी तेराह येथे तळ दिला.
28नंतर त्यांनी तेराह सोडले व मितखाह येथे तळ दिला.
29त्यांनी मग मितखाह सोडले व हशमोनाह येथे तळ दिला.
30त्यांनी हशमोनाह सोडले आणि मोसेरोथ येथे तळ दिला.
31त्यांनी मोसेरोथ सोडले आणि बेने-याकन येथे तळ दिला.
32त्यांनी बेने-याकन सोडले आणि होर-हग्गीदगाद येथे तळ दिला.
33त्यांनी होर-हग्गीदगाद सोडले आणि याटबाथह येथे तळ दिला.
34त्यांनी याटबाथह सोडले आणि आबरोनाह येथे तळ दिला.
35नंतर त्यांनी आबरोनाह सोडले आणि एजिओन-गेबेर येथे तळ दिला.
36त्यांनी एजिओन-गेबेर सोडले आणि सीनच्या वाळवंटातील कादेश येथे तळ दिला.
37त्यांनी कादेश सोडले आणि एदोमच्या सीमेवरील होर पर्वतावर तळ दिला. 38याहवेहच्या आज्ञेनुसार अहरोन याजक होर पर्वतावर गेला आणि इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आल्यानंतर चाळिसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तो तिथे मरण पावला. 39अहरोन होर पर्वतावर मरण पावला तेव्हा तो एकशे तेवीस वर्षांचा होता.
40कनानी अरादचा राजा कनानाच्या नेगेव येथे राहत होता, त्याने इस्राएली लोक आपल्या देशाकडे येत आहेत असे ऐकले.
41मग त्यांनी होर डोंगर सोडून जालमोनाह येथे तळ दिला.
42नंतर त्यांनी जालमोनाह सोडले व पूनोन येथे तळ दिला.
43पूनोन सोडल्यानंतर त्यांनी ओबोथ येथे तळ दिला.
44त्यांनी ओबोथ सोडले व मोआबच्या सीमेवरील ईये-अबारीम येथे तळ दिला.
45नंतर ईये-अबारीम सोडून त्यांनी दिबोन-गाद येथे तळ दिला.
46दिबोन-गाद सोडल्यावर त्यांनी आलमोन-दिबलाथाइम येथे तळ दिला.
47त्यांनी आलमोन-दिबलाथाइम सोडले व नबोजवळ अबारीम डोंगराजवळ तळ दिला.
48मग त्यांनी अबारीम डोंगर सोडून मोआबाच्या मैदानात यार्देन नदीजवळ यरीहो समोर तळ दिला. 49तिथे मोआबाच्या मैदानात यार्देनजवळ बेथ-यशिमोथापासून आबेल-शित्तीमपर्यंत तळ दिला.
50मोआबाच्या मैदानात यार्देनजवळ यरीहोजवळ याहवेह मोशेला म्हणाले, 51“इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: ‘यार्देन पार करून तुम्ही जेव्हा कनान देशात जाल, 52तेव्हा तिथे राहणार्‍या लोकांना तुमच्यापुढून घालवून द्या, त्यांच्या सर्व कोरीव आकृत्या व ओतीव मूर्त्यांचा नाश करा व त्यांची सर्व उच्च स्थाने नष्ट करा. 53देशाचा ताबा घ्या व त्यात वस्ती करा, कारण तुम्ही त्यात वस्ती करावी म्हणून हा देश मी तुम्हाला दिला आहे. 54तुमच्या कुळानुसार चिठ्ठ्या टाकून जमीन वाटप करावी. संख्येने मोठ्या असलेल्या गटाला मोठे वतन व लहान गटाला लहान वतन. चिठ्ठीद्वारे जे निघेल ते त्यांचे वतन होईल. तुमच्या पूर्वजांच्या गोत्रानुसार त्याची वाटणी करावी.
55“ ‘पण त्या ठिकाणच्या रहिवाशांना तुम्ही जर घालवले नाही, व त्यांना तुम्ही तिथेच राहू दिले, तर ते तुमच्या डोळ्यांना कुसळांसारखे आणि तुमच्या कूशीला काट्यांसारखे होतील. ज्या देशात तुम्ही राहाल त्यामध्ये ते तुम्हाला त्रास देतील. 56आणि मग जसे मी त्यांचे करण्याचे योजले आहे, तसे तुमचे करेन.’ ”

सध्या निवडलेले:

गणना 33: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन